ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मनी हाईस्ट लवकरच

प्रतिक्षा संपली, Money Heist चा होणार शेवट

एखादी चोरी जगाला वेड लावते याची साक्ष असलेली वेबसिरिज म्हणजे ‘Money Heist’ आता या सीरिजचा शेवट होणार आहे. शेवटची चोरी जिथे येऊन थांबली होती. त्यानंतर आता पुढे काय होईल अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. पण आता याचे उत्तर 3 डिसेंबरला सगळ्यांना मिळणार आहे. कारण आता याचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे. टोकियो, मनिला, बर्लिन, रिओ, हेलसिंगी या सगळ्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. सध्या सगळ्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण ही चोरी नक्की शेवटची असेल का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

प्रोफेसर वाचवू शकणार का?

 जो सीझन येऊन गेला त्यामध्ये आता प्रोफेसरवर सगळ्यांना वाचवायची जबाबदारी येऊन पडली आहे. चोरांची रणणिती पोलिसांना समजून येत असल्यामुळे आता प्रोफेसरला त्यांना कसे वाचवता येईल असा प्रश्न पडला आहे. या चोरीचा अंत होताना आणखी किती जणांना आपले प्राण गमवावे लागतील अशी भिती आहे. कारण टोकियो आधीच गेली आहे. तिच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आता सगळे शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहे. प्रोफेसरची गर्लफ्रेंड अर्थात रकेल मोरियो ती आता पोलिसांशी कसा लढा देणार? हे सगळे पाहणे रंजक ठरणार आहे.

झळकणार काही नवे चेहरे

आता येणारा सीझन हा शेवटचा सीझन आहे. त्यामुळे बऱ्याच नव्या चेहऱ्यांना यामध्ये झळकण्याची संधी मिळणार आहे. अनेक दिग्गज कलाकार यामध्ये आधीही येऊन गेले आहेत.  आता या नव्या भागांमध्येही काही लेटेस्ट चेहरे दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांची उत्सुकता कॅमियो आणि काही नवे खेळाडू यांच्यासाठी आहे. हा पाचवा भाग ‘एस्केप व्हॉल्व’ नावाने येणार आहे. यामधील प्रत्येक एपिसोडची नावे अशाप्रकारे आधीच दिलेली आहे.  त्यामुळे अर्थातच ही आता चोरीतून सुखरुप बाहेर पडण्याची वेळ आहे. असे दिसून येत आहे. या पाचव्या सीझनमध्ये एकूण 10 एपिसोड सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत.

असेल का ही शेवटची चोरी?

एखादी सीरिज आवडली की, संपावी अशी इच्छा कोणालाच नसते. ‘Money Heist’ बद्दल प्रेक्षकांचे असेत काहीसे झाले आहे. Bella ciao म्हणत ते जसे हे सगळं पार पाडतात. त्यामुळे होणारे मनोरंजन आणि वेगळं काहीतरी पाहिल्याचे समाधान असल्यामुळे ही सिरीज संपावी असे कोणालाही वाटत नाही. हा शेवटचा सीझन असल्यामुळे आधीच लोकांमध्ये नाराजी आहे. आतापर्यंतच्या भागांमध्ये दाखवण्यात आलेल्या दोन चोऱ्या या खूप मोठ्या आणि दोन सीझनपर्यत चाललेल्या आहेत. त्यामुळे आता या शेवटच्या सीझनची उत्कंठा अधिक वाढवण्यासाठी एखादा आणखी सीझन येईल का? किंवा काही बोनस पाहायला मिळतंय का या शोधात अनेक जण आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, तुम्ही जर ‘Money Heist’ चे फॅन असाल तर 3 डिसेंबरला तुम्हाला याचे लेटेस्ट एपिसोड पाहता येणार आहेत. 

अधिक वाचा

नागिन 6′ मध्ये महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री

Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष

ADVERTISEMENT

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेच्या येण्याने हादरले पूर्ण घर

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT