ADVERTISEMENT
home / मनोरंजन
aggabai sasubai

‘लग्न सासूचं, पुन्हा करवली सुनबाईच’- अग्गबाई सासूबाई आता कन्नडमध्ये

साऊथच्या किंवा परदेशातील उत्तम कलाकृतींचा रिमेक हिंदी किंवा मराठीत होण्याचा ट्रेंड अनेक गेली अनेक वर्षे सुरु आहे. कधी कधी असेही होते की ज्या कलाकृती मराठीत खूप यशस्वी झाल्या व लोकांनी डोक्यावर  घेतल्या त्यांचा हिंदी किंवा इतर भाषेत रिमेक होतो. सध्या मराठीतील  स्टार प्रवाह चॅनेलवरील‘आई कुठे काय करते’ या  मालिकेचा हिंदी रिमेक असलेली ‘अनुपमा’  ही स्टार प्लसवरील मालिका सध्या हिंदीत खूप गाजते आहे. आई कुठे काय करते या मालिकेलाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. आता अश्याच एका लोकप्रिय मराठी मालिकेचा कन्नड भाषेत रिमेक केला जाणार आहे. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरीश ओक यांच्या अभिनयाने नटलेली झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ मालिका एक वेगळा विषय घेऊन आली होती. 

ज्येष्ठ नागरिकांनी सर्व जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर स्वतःच्या आयुष्यातील  एकटेपणा घालवण्यासाठी परत लग्न करणे हा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. एक सून जेव्हा मैत्रीण बनून सासूच्या आयुष्यात येते तेव्हा ती  सासूच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणण्यासाठी कसे प्रयत्न करते, तिचे लग्न कसे लावून देते आणि तिच्या पाठीशी कसे ठामपणे उभी राहते अशी आगळीवेगळी कथा या मालिकेत आपण बघितली. यात सुनेची भूमिका तेजश्री प्रधानने केली होती तर प्रेमळ सासू निवेदिता सराफ यांनी रंगवली होती. आता या मालिकेचा रिमेक कन्नड भाषेत केला जाणार आहे अशी चर्चा कानांवर पडते आहे. 

अधिक वाचा – ‘रॉकेट बॉईज’ आधुनिक भारत घडवणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना – सिद्धार्थ रॉय कपूर

मालिकेचे नाव अजून निश्चित नाही 

‘अग्गबाई सासूबाई’ चा रिमेक असलेली ही मालिका सध्या सुरुवातीच्याच टप्प्यात असल्याने अजून या  कन्नड मालिकेचे नाव काय असेल हे अजून निर्मात्यांनी जाहीर केलेले नाही.  विशेष म्हणजे अग्गबाई सासूबाई मालिकेचा या आधी तामिळ भाषेत देखील रिमेक झाला आहे. सध्या ही मालिका चॅनेलवर सुरु आहे आणि मराठीप्रमाणेच तामिळ रसिक प्रेक्षकांनाही ही मालिका आवडते आहे. तामिळ मालिकेचे नाव ‘पुधू पुधू अर्थंगल असे आहे.यातही सासू सुनेचं प्रेमळ नातं दिसतंय. 

ADVERTISEMENT

पूर्वी इतर मालिकांमध्ये जशी सासू सुनांची भांडणं , कटकारस्थानं दाखवली आहेत ती या मालिकेत नाहीत. इथे सासू-सुनेच्या नात्याच्या पुढे जाऊन दोघींमध्ये मैत्रिणींचे नाते कसे तयार होते हे दाखवले आहे. तेजश्री प्रधान व निवेदिता सराफ यांच्याबरोबरच आशुतोष पत्कीने सुद्धा त्याच्या ‘बबड्या’ या भूमिकेला चांगला न्याय दिला होता. त्याने रंगवलेल्या स्वार्थी बेजाबदार ‘बबड्या’ वरून अनेक मजेदार विनोदी मिम्स देखील प्रसिद्ध झाले.दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांची ही बहुदा शेवटचीच मालिका होती. त्यांनी या मालिकेत कडक शिस्तीचे पण प्रेमळ सासरे/ आजोबांची भूमिका   केली होती. लॉकडाऊन मध्ये रवी पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतला व नंतर त्यांची भूमिका मोहन जोशींनी रंगवली. आता या मालिकेचे कन्नड व्हर्जन सुद्धा लोकांना आवडेल अशी निर्मात्यांना आशा आहे. 

अधिक वाचा – अभिजीत आमकर आणि कयादू यांची जोडी ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून भरणार प्रेमाचे रंग

तेजश्री प्रधानाची रिमेक होणारी ही दुसरी मालिका 

तेजश्री प्रधान ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोचली. या मालिकेत देखील सासू सुनांचे प्रेमळ नाते दाखवले होते. जेव्हा एकाच सासूशी जमवून घेणे किती अवघड असते हे मालिकांतून दाखवतात त्याच वेळी ‘होणार सून’ मध्ये सुनेचं स्वागत करायला घरात एक नाही तर चक्क पाच सासवा असतात आणि या सगळ्यांशी तिचे अगदी खेळीमेळीचे प्रेमाचे नाते असते असे या मालिकेत दाखवले होते. या मालिकेचा हिंदीत ‘सतरंगी ससुराल’ या नावाने रिमेक झाला होता. ही मालिका झी टिव्ही वर प्रदर्शित झाली होती. 

आता कन्नड सुनबाई भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – अनुपम खेर यांच्या आईनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका, व्हिडिओ झाला व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT