अजय देवगनच्या तानाजीः दी अनसंग वॉरियर या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय देवगन तर तानाजींची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका अभिनेत्री काजोलने साकारली होती. अभिनेता सैफ अली खानने स्वराज्याचा शत्रू उदय भान राठौड अगदी हुबेहुब साकारला होता. ज्यामुळे या तिघांच्याही अभिनयाचे सगळीकडे कौतुकच झाले. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवा वाद समोर आला आहे. सैफने केलेल्या एका विधानावरून त्याच्यात आणि या चित्रपटाचा निर्माता अजय देवगन यांच्यातील वाद वाढल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये आता काजोलने मध्यस्थी केली आहे.
सैफ आणि अजयमध्ये का निर्माण झाला वाद
अभिनेता सैफ अली खानने तानाजी चित्रपटाबाबत शेअर केलेल्या एका वाक्यावरून हा वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. सैफने तानाजी चित्रपटातील इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचं विधान केलं होतं. काही दिवसांपासून अजय आणि सैफमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता अजयची पत्नी आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री या नात्याने काजोलने या वादात मध्यस्थी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ आणि अजयमध्ये झालेल्या वादाला गंभीरपणे घेण्याची मुळीच गरज नाही असं काजोलने सांगितलं आहे. कारण खरंतर असा कोणताही वादच अस्तित्वात नाही. याचं कारण काजोलच्या मते या दोन्ही अभिनेत्यांकडे चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे. दोघंही हुशार आणि स्वतंत्र मताची व्यक्तीमत्वे आहेत. त्यामुळे ते सतत काहीना काहीतरी बोलतच असतात. आता त्यांच्या या बोलण्यामधील काय घ्यायचं हे तुमच्या हातात आहे.
अजय देवगन काय म्हणाला होता सैफच्या विधानावर
काही दिवसांपूर्वी सुर्यवंशीच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या दरम्यान सैफने केलेल्या विधानावर अजयने आपलं मत व्यक्त केलं होतं. अजयला या कार्यक्रमात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अजयने हसत हसत उत्तर दिलं होतं की, होय मी त्याच्या घरी गेलो आणि त्याने केलेल्या या विधानाबद्दल त्याला खूप मारलं. आता तर तो चालूदेखील शकणार नाही अशी त्याची अवस्था मी केलेली आहे. पुढे अजयने आणखी खुलासा करत सांगितलं की, “आमच्या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. आमच्या दोघांचं नातं अगदी परफेक्ट आहे. आमच्यातील वादाच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत. त्यामुळे या अफवेला कोणताच आधार नाही.”
सैफ अली खानने काय दिली होती प्रतिक्रिया
अभिनेता सैफ अली खानने केलेल्या एका विधानावरून हा वाद निर्माण झाल्याची चर्चा निर्माण झाली होती. सैफने विधान केलं होतं की, ” तानाजी चित्रपटात इतिहासाची चुकीची व्याख्या केलेली आहे. चित्रपटाच्या यशात चित्रपटाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. याच्याशी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा राजकारणाचा कोणताही संबंध नाही. मी केवळ एक अभिनेता या नात्याने नाही तर एक भारतीय या नात्याने हे माझं मत मांडत आहे. मी या विषयावर आधीही माझं मत मांडलं आहे. यापुढे मी अशा कथानकांबाबत नक्कीच सावध राहीन.”
फोटोसौजन्य – इन्स्टाग्रामट
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
‘अंग्रेजी मिडीयम’मधील नवीन गाण्यात आघाडीच्या आठ बॉलीवूड अभिनेत्रींचा समावेश
Womens Day Special : हिरकणी येतेय तुमच्या घरी