सुक्या मेव्यामधील राजा अशा ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’. ज्याच्या नावातच इतका राजेशाहीपणा आहे तो प्रकार खायलाही तितकाच चविष्ट लागतो. काजूचा गर तोंडात टाकला की, साक्षात मधाळ गर खाल्ल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. पुलाव, बिर्याणी, चिकन, गोडाचे पदार्थ या सगळ्यांमध्ये काजूचा गर वापरला जातो. काजू हा अगदी कोणत्याही डिशमध्ये परफेक्ट फिट होणारा असा प्रकार आहे. त्यामुळे काजू हा प्रत्येक घरात असतो. भारतात मुख्यत्वे कोकणात काजूचे पीक घेतले जाते. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर अगदी खरेदी करण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘काजू’ काजूची नुसती चवच चांगली नाही तर काजू हा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जेवणात नाही तर तुम्ही सहजही कधीही काही काजूचे गर तोंडात टाकू शकता. पण काजू खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया काजू घेण्याचे फायदे
काजूमधील पोषकत्वे (Nutritional Value Of Cashew Nut In Marathi)
काजू हे फळ उष्ण कटीबंधीय प्रदेशात होते. काजूची झाडे ही बुटकी पण डेरेदार असतात. त्याला सफरचंदाच्या आकाराची फळ लागतात. त्याच्या खाली असलेला गर हा काजूगर असतो. त्याचे फळ हे मीठ-मसाला लावून खाल्ले जाते. तर काजूच्या बिया वाळवून त्या भाजल्या जातात. त्यानंतर त्याचा पांढरा गर मिळतो. हल्ली काजूचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. सालंवाले काजू हे कोकणात हमखास मिळतात. पण काजू सोलण्याचे कष्ट नको म्हणून सोललेले काजू याशिवाय वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही काजू मिळतात. पाहूया काजूच्या पोषकत्व तक्ता
- वैज्ञानिक नाव: Anacardium occidentale
- प्रमाण: 100 ग्रॅम
- एकूण कॅलरिज: 157 कॅलरिज
- कार्बोदक: 8.56 ग्रॅम
- साखर: 1.68 ग्रॅम
- फायबर: 0.9 ग्रॅम
- एकूण फॅट: 12.43 ग्रॅम
- कॅल्शिअम: 10 मिलिग्रॅम
- प्रोटीन: 5.17 ग्रॅम
- कॅल्शिअम: 10 मिलिग्रॅम
- आर्यन: 1.89 मिली ग्रॅम
- मॅग्नेशीअम: 83 मिली ग्रॅम
- फॉस्फरस: 168 मिली ग्रॅम
- पोटॅशिअम: 187 मिली ग्रॅम
- सोडियम: 3 मिली ग्रॅम
- झिंक: 1.64 मिली ग्रॅम
या शिवाय काजूमध्ये व्हिटॅमिन C,B असेही काही घटक असतात.
काजू खाण्याचे फायदे (Kaju Benefits In Marathi)
काजूमधील पोषकत्वे जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊया काजू खाण्याचे नेमके फायदे काय आहेत ते. त्यानुसार तुम्ही आहारात काजूचे सेवन करु शकता.
ह्रदयासाठी चांगले (Good For Heart)
फॅट हे शरीरासाठी चांगले नसले तरी काही फॅट हे शरीरासाठी चांगले असतात. काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. या फॅटमुळे शरीरासाठी खराब असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे ह्रदयविकाराच्या आजारापासून तुम्ही दूर राहता. पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे गरजेचे असते. कारण काजूच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. काजूप्रमाणेच खारीक खाण्याचे फायदे ही आरोग्यासाठी फारच लाभदायक असतात.
वजन नियंत्रणात ठेवते (Manage Weight )
काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळ्ण्यास मदत मिळते. पण वजन नियंत्रणात ठेवण्याचे मुख्य कारण म्हजणे काजू हा फायबरचा साठा आहे. फायबरयुक्त पदार्थ हे शरीरासाठी फारच चांगले असतात. काजूच्या सेवनामुळे पोट भरते. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात. ज्यामुळेही शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहते. काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत मिळते.
केस आणि त्वचेसाठी चांगले (Good For Skin And Hair)
काजूमध्ये झिंक, आर्यन, फॉस्फरस खच्चून भरलेले असते. यासोबतच काजूमध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. जे त्वचा आणि केसांच्या वाढींना चालना देण्याचे काम करतात. काजूचे गर आणि काजूचे तेल या दोन्हीच्या वापरामुळे केस आणि त्वचेला फायदे मिळतात. काजूमुळे मेलनिनची उत्पत्ती होण्यास मदत मिळते. काजूच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. खूप ठिकाणी काजूच्या गरापासून तेल काढले जाते याचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठीही हमखास केला जातो.त्वचेवर याचा वापर केल्यामुळे त्वचाही अधिक चांगली दिसू लागते. कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे.
मेंदूचे कार्य करते सुरळीत (Improve Brain Function)
काजूमध्ये योग्य प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते. काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. काजूमध्ये काही प्रमाणात कॉपर देखील असते. जे शरीरात उर्जेची निर्मिती, मेंदूचे सुरळीत कार्य आणि प्रतिकारशक्ती वाढवते. एकूणच शरीराचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी काजू कार्य करते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने ही फायद्याची ठरतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले (Good For Eye Health)
काजूमध्ये ओमेगा ३ नावाचे फॅटी अॅसिड असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन E हे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूगर करतात. त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजू गराचे सेवन करावे.
मायग्रेन करते कमी (Regulate Migrain)
डोकेदुखीशी निगडीत असा आजार म्हणजे मायग्रेन…, मायग्रेनची डोकेदुखी ही असह्य असते.मायग्रे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचा त्रास कमी करण्यासाठी काजू खाण्याचा सल्ला दिला जातो. काजूमध्ये असलेले मॅग्नीझ नावाचे घटक डोकेदुखीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांना कमी करुन मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करते. काजू रक्तामधील नसांना मोकळे करण्याचे काम करते ज्यामुळे मायग्रेनचे अटॅक आपोआप कमी होऊ लागतात.
थायरॉईडसाठी चांगले (Thyroid Function)
काजूमध्ये सेलिनिअम नावाचे द्रव्य असते जे थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. शरीरातील थायरॉईडची पातळी योग्य करुन त्याचे कार्य सुरळीत चालण्यास ते मदत असल्यामुळे काजू हे फारच फायदेशीर आहे. महिलांना थायरॉईडचा त्रास आणि लक्षणे हा अधिक असतो. त्यांच्या थायरॉईड टिश्यूंना रिलॅक्स करण्याचे काम काजू करते. त्यामुळे काजूचे सेवन हे थायरॉईडसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला थायरॉईड असेल योग्य सल्ला घेऊन तुम्ही काजूचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही.
हाडांना बळकटी (Bone Health)
काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम हे हाडांसाठी फारच महत्वाचे असते. मॅग्नेशीअम हे कॅल्शिअमची निर्मिती करण्यास मदत करते. काजूमध्ये असलेले आणखी एक मिनरल्स म्हणजे मॅग्नीझ, त्यामुळेही हाडांची बळकटी मिळण्यास मदत होते. हाडांशी निगडीत आजारांना दूर ठेवायचे असेल तर आहारात काजू असायला हवे. योग्य सल्ला घेऊन तुम्ही काजू खा म्हणजे तुमच्या हाडांना बळकटी मिळण्यास मदत मिळेल.
पुढे वाचा –
Benefits of Eating Cashew Nuts in Hindi
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)
हो, काजूच्या अति सेवनामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात काजूचे सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. इतकेच नाही. तर शरीरात फॅट वाढवण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे शरीर सुटल्यासारखे आणि वागण्यात थोडासा आळशीपणाही नक्की येईल. त्यामुळे काजूचे सेवन प्रमाणात करा.
वजन वाढणे, शरीरात उष्णता वाढणे, शरीरात फॅट वाढणे हे काही काजूचे दुष्परिणाम आहेत. काजूचे अतिसेवन केले तर लघवी करताना जळजळ, बद्धकोष्ठता असा काहीसा त्रासही होण्याची शक्यता असते.
हो, काजूचे अति सेवन केले तर पोट गच्च होण्याची शक्यता असते. जर काजू तुम्ही सतत खात असाल तर पोटाचे कार्य बिघडते. पोटाचे कार्य बिघडले की, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. शरीरात हिट वाढल्यामुळे पोटदुखी आणि शौचास कडक होण्याचा त्रास होतो. . याशिवाय पाईल्सचा त्रास होण्याचीही शक्यता असते.