Advertisement

बॉलीवूड

रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा

Dipali NaphadeDipali Naphade  |  Mar 28, 2019
रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा

Advertisement

बॉलीवूडमध्ये कंगना रणौत म्हणजे एक तुफानच आहे. ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झासी’ चित्रपटाला यश मिळाल्यानंतर कंगनाने बऱ्याच लोकांवर निशाणा साधायला सुरूवात केली. पण त्यातही ती जास्तीत जास्त सध्या आलिया भटच्या मागे लागलेली दिसून येत आहे. पण या सगळ्यात एकदाही आलियाने आपली पातळी सोडली नसून कधीही कंगनाला उलट उत्तर दिलेलं नाही. वास्तविक कंगनाने आपल्या चित्रपटाच्या प्रिमियरला सर्वांना आमंत्रण पाठवलं होतं. पण बऱ्याच सेलिब्रिटींना या प्रिमियरला जाता आलं नाही. पण यानंतर कंगना सतत काहीना काही बोलतच आली आहे. आता पुन्हा एकदा रणबीर आणि आलियावर कंगनाने निशाणा साधला आहे. पण यावेळी मुद्दा कोणताही चित्रपट नाही तर त्या दोघांचं वय आहे.

दोघांच्या वयाबद्दल कंगनाची बकबक

ranbir alia6 %281%29

रणबीर आणि आलियाला कोणीही यंग अॅक्टर म्हटलेलं आलियाला अजिबातच मंजूर नाहीये. या गोष्टीवर कंगना पुन्हा एकदा उखडली आहे. ‘37 वर्षाच्या रणबीर कपूरला लोक यंग अॅक्टर म्हणतात. तर आलिया पण आता 27 वर्षांची झाली आहे. माझी आई जेव्हा 27 वर्षांची होती तेव्हा तिला तीन मुलं झाली होती. या दोघांनाही यंग अॅक्टर्स म्हणणं हे चुकीचं आहे. दोघेही बच्चे आहेत का, हे तर मूर्खपणाचं आहे. यंग अॅक्टर अशा लोकांना म्हणणं हे त्यांच्या वयाच्या मनाने खूपच जास्त होतंय’ अशी बकबक यावेळी कंगनाने केली आहे.

कंगना दुसऱ्यांदा उखडली

ranbiralia FB

अर्थात ही काही कंगनाने रणबीर आणि आलियाबद्दल बोलण्याची पहिली वेळ नाही. याआधी देखील कंगना या दोघांबद्दल गरळ ओकून मोकळी झाली आहे. ‘जेव्हा देशाच्या बाबतीत बोलायचं असतं तेव्हा मी कधीही मागे हटत नाही. काही दिवसांपूर्वीच रणबीरला राजकारणविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत तो म्हणाला होता की, मी का बोलू, माझ्या घरात वीज, पाणी सगळं व्यवस्थित येत आहे. तर मला वाटतं हा पैसा देशाचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये वीज आणि पाणी येतं. तुम्ही ज्या मर्सिडीजमधून फिरता तीदेखील देशाच्या पैशाचीच आहे. असं बोलणं म्हणजे तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून दूर जाणं आहे’ असं रणबीरबाबत स्पष्ट मत कंगनाने मांडलं होतं आणि त्यानंतरही आलियाने प्रत्येकाचं आपलं मत असून आम्ही राजकारणावर बोलायला घाबरतो असं मत मीडियासमोर व्यक्त केलं होतं. ‘माझ्याजवळ कंगना इतकं बिनधास्त होऊन बोलण्याची क्षमता नाही आणि त्यासाठी मला कंगनाबद्दल आदर आहे. कदाचित तिने जे म्हटलं ते योग्य आहे. कधीकधी आम्ही नाही बोलत मागे हटतो. कशाला बोलायचं असा विचार करतो. कंगना खूप चांगलं बोलते आणि त्यासाठी मी तिचा आदर करते.’ असं यावेळी आलियाने स्पष्ट केलं होतं.

रणबीर आणि आलियाची चुप्पी

ranbir alia3 %281%29

यावर आता पुन्हा आलिया आणि रणबीरचं काय मत असणार हे लवकरच कळेल. पण आतापर्यंत कंगना जितके वेळा आलिया अथवा रणबीरला काही बोलली आहे. दोघांनीही यावर कोणतंही उलट उत्तर दिलेलं नाही अथवा कंगनाला कोणतेही खडे बोलही सुनावलेले नाहीत. आलियाने तर अगदी सभ्यपणाने हा विषय हाताळला असून कंगना दुखावली जाईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. रणबीरने तर यावर कधीच काहीही बोलल्याचं अजूनपर्यंत ऐकिवात नाही.

फोटो सोजन्य – Instagram

हेदेखील वाचा – 

आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली – कंगना राणौत

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग पार्टीमध्ये ‘रणबीर-आलिया’ लाईमलाईटमध्ये

रणबीरने सर्वांसमोर दिली आलियाला प्रेमाची कबुली