Advertisement

बॉलीवूड

बॉलीवूड सेलेब्सनंतर आता कंगनाचा मीडियाशी ‘पंगा’

Aaditi DatarAaditi Datar  |  Jul 8, 2019
बॉलीवूड सेलेब्सनंतर आता कंगनाचा मीडियाशी ‘पंगा’

Advertisement

बॉलीवूडमध्ये क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी कंगणा रणौत खरोखरच क्वीन असल्याप्रमाणे वागू लागली आहे. सतत काही ना काही विवादामुळे कंगना आणि तिची बहीण रंगोली चर्चेत असतात. चर्चेत राहण्यासाठी रणौत बहिणी नेहमीच वादग्रस्त विधानं करत असतात, मग ते नेपोटीझम असो, हृतिक आणि कंगनाचं जुनं अफेयर असो वा आदित्य पंचोलीसोबतचा जुना वाद असो त्या नेहमीच टीकास्त्र घेऊन तयारच असतात. पण यावेळी तिने थेट मीडियाशीच पंगा घेतला. 

कंगनाने घातला पत्रकाराशी वाद

सध्या कंगना तिच्या आगामी जजमेंटल है क्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलरवर केलेल्या कमेंटमुळे कंगनाची बहिण रंगोलीने तापसी पन्नू आणि वरूण धवनवर टिका केली होती. त्यानंतर आता याच चित्रपटाच्या रीमिक्स प्रमोशनल साँगच्या लाँचदरम्यान कंगनाने पत्रकारावरच हल्लाबोल केलं.

या इव्हेंटला चित्रपटाची हिरोईन कंगना, हिरो राजकुमार राव, लेखिका कनिका ढिल्लन, दिग्दर्शक प्रकाश कोवलामुडी आणि निर्माती एकता कपूर उपस्थित होते. जेव्हा पत्रकार जस्टीन रावने कंगनाला प्रश्न विचारण्यासाठी त्याचं नाव सांगितलं तेव्हा कंगनाला आठवलं त्याने लिहिलेल्या बातमीबद्दल. हा बातमी या पत्रकाराने मणिकर्णिका चित्रपटाच्यावेळी लिहीली होती. कंगनाने मागचा पुढचा विचार न करता या पत्रकारांवर हल्लाबोल केला. कंगनाने भर प्रेस कॉन्फरन्समध्ये रिपोर्टरचा अपमान करायला सुरूवात केली. 

या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. तेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये एकच हंगामा सुरू झाला. कंगनाने पत्रकारावर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. पत्रकाराने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि सगळे आरोप फेटाळले. तरीही कंगना थांबली नाही. कंगनाने पत्रकाराला हेही सांगितलं की, मणिकर्णिकाच्या वेळी याच पत्रकाराला इंटरव्ह्यू देण्यासाठी तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास वेळ दिला होता आणि त्याच्यासोबत लंचही केला होता. तरीही त्याने तिच्याविरूद्ध बातमी केली आणि चुकीच्या गोष्टी लिहील्या. एवढंच नाहीतर हा पत्रकार तिला मेसेजेसही करायचा. यावर त्या पत्रकाराने याचा पुरावा मागितला तेव्हा मात्र तिने नंतर शेअर करेन असं सांगितलं. 

पत्रकाराची गळचेपी

दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात कार्यक्रमाच्या होस्टने पत्रकाराला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्याच्यावर हल्लाबोल केला आणि या वादात न पडण्याचा सल्ला दिला.

एकता कपूरने केला वाद रोखण्याचा प्रयत्न

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निर्माती एकता कपूरने हा वाढत असलेला वाद थांबवण्याचाही प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काहीही असो कंगनाने क्वीन हे संबोधन एवढंही मनावर घेऊ नये. नाहीतर या क्वीनला बॉलीवूडमधून पायउतार होण्याची वेळ येईल, तुम्हाला काय वाटतं?

हेही वाचा – 

तापसी पन्नू कंगनाची स्वस्तातली कॉपी….कंगनाच्या बहिणीने पुन्हा उधळली मुक्ताफळ

कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ चं ट्रेलर रद्द, सेन्सॉर बोर्डचा चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप