कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

 कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

कंगना रनौत आणि ह्रतिक रोशन यांच्या लव अफेअर्सनंतर झालेल्या कॉन्ट्राव्हर्सीज आता सगळ्यांना माहीत झाल्या आहेत. इतके सगळे होऊन देखील ह्रतिकच्या पूर्वपत्नी म्हणेज सुझेन रोशनने आपल्या नवऱ्याला पाठिंबा देत सगळा प्रकार सांभाळून घेतला. पण आता घरातीलच एक व्यक्ती ह्रतिकविरोधात बंड करण्यासाठी उभी राहिली आहे. ती म्हणजे ह्रतिकची बहीण सुनैना रोशन…कंगनाला पाठिंबा देत सुनैनाने ह्रतिकवर गंभीर आरोप लावले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

Instagram

ह्रतिकच्या बहिणीने एक वादग्रस्त ट्विट करुन घरातील भांडणं चव्हाट्यावर आणले. झालं असं की, सुनैना हिचे एका मुस्लिम मुलासोबत प्रेम आहे. घरातील लोकांना तिचे हे नसावे. पण हे प्रकरण सुनैनाने नाही तर कंगनाची बहीण रंगोली हिने ट्विट करुन लोकांसमोर आणले. ती ट्विटमध्ये म्हणाली की, सुनैनाचे मुस्लिम मुलाशी प्रेम असणे त्यांच्या घरातील लोकांना मान्य नाही. त्यामुळे तिला घरी मारहाण करण्यात येते. रंगोलीने तिच्या ट्विटमध्ये हा दावा देखील केला आहे की, ह्रतिकचे कुटुंब तिला या गोष्टीवर सतत त्रास देते. रंगोलीने ट्विटमध्ये इतकेच नाही सांगितले तर तिने असे ट्विट केले की, सुनैनाने ह्रतिक जे वागला त्या संदर्भात माफी मागितली असून माझी मदत करा.. अशी याचना तिने कंगनाकडे केली आहे. त्यामुळेच ह्रतिक विरुद्ध सुनैना असे चित्र सध्या आहे.

जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे,पाहा त्यांचे फोटो

रंगोलीचे ट्विट म्हणजे सत्यपरिस्थिती

एरव्ही कायमच बरळणारी कंगनाची बहीण रंगोली  आता खरं बोलत आहे. कारण सुनैनाने रंगोली हिचे ट्विट वाचले असून ती जे म्हणतेय ते अगदी खरं आहे, अशी कबुली तिने एका मुलाखतीदरम्यान दिला आहे. रंगोली आणि सुनैना यांनी या संदर्भात वारंवार ट्विट करत सगळ्या लोकांसमोर तिची ही समस्या आणून ठेवली आहे.

धर्मामुळे घरातील करत आहेत विरोध

Twitter

कंगनाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचे एका मुस्लिम मुलासोबत प्रेम आहे. रुहेल अमिन असे त्या मुलाचे नाव असून तो एक पत्रकार आहे. सुनैना आणि त्याची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली.घरातील लोकांच्या भीतीने तिने त्या मुलाचा फोन नंबरही सेव्ह केला नाही. तो मुस्लिम असल्यामुळे तो आतंकवादी असेल अशी भिती राकेश रोशन यांना वाटते. पण जर तो आतंकवादी असता तर तो मीडिया क्षेत्रात काय करतोय. माझ्या कुटुंबाने त्याचा स्वीकार करावा अन्यथा माझे आयुष्य नरकात जगल्याप्रमाणेच आहे.

या कारणासाठी आलिया भटला सोडावे लागले 'ब्रम्हास्त्र'चं शुटींग

ह्रतिक घरात कटपुतली

Instagram

सुनैनाचे हे नाते ह्रतिकला मान्य नाही कारण तो वडिलांच्या हातातील कटपुतली आहे. तो त्यांच्या संमतीशिवाय काहीही करु शकत नाही, असे तिचे म्हणणे आहे. शिवाय ह्रतिकने तिला मुंबईत स्वत:चे घर घेऊन देतो असे वचन दिले, पण अद्याप ह्रतिकने ते वचन पूर्ण केलेले नाही. मला वेगळे राहण्यासाठी घर भाड्याने घेताना देखील ते पैशांसाठी कुरकुर करतात. मला महिना खर्चालाही अगदी तुटपुंजा पैसा दिला जातो. त्यामुळे मला आता कंटाळा आला आहे.

सुनैना मानसिक रुग्ण

Instagram

ह्रतिकची पूर्वपत्नी सुझेन खान नेहमीच कुटुंबाच्या कठीण काळात त्यांच्यासोबत राहिली आहे. आताही तिने एक पाऊल उचलत. सुनैनाची मानसिक स्थिती सध्या चांगली नाही. इतक कोणत्याही कुटुंबाप्रमाणे आमच्या कुटुंबामध्येही काही हेवेदावे सुरु आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करत आम्हाला आमची समस्या सोडवायला थोडा एकांत द्या.असे सांगितले आहे. 

आता या सुनैना प्रकरणानंतर नेमकं काय होणार हे पाहावे लागेल. शिवाय ह्रतिकवर लावलेल्या आरोपांविषयी रोशन कुटुंबीय नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष  आहे.

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय