ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Kareena Kapoor Essentially Played Twinkle Khanna In Good Newwz Film in Marathi

करिना कपूरने ‘गुडन्यूज’ चित्रपटात साकारली होती ट्विंकल खन्नाची भूमिका

बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्यातील अनेक रहस्य बऱ्याचदा एखाद्या चॅट शोमधून उघड होताना दिसतात.  नुकताच ट्विंकल खन्नाच्या चॅट शोमध्ये करिना कपूर संवाद साधण्यासाठी आली होती. ट्विंकल खन्ना युट्यूबवर ‘ट्विक इंडिया’ नावाचा चॅट शो सादर करते. या दरम्यान शोमध्ये काही रहस्य बेबोने ट्विंकल खन्नासोबत शेअर केली. एवंढच नाही तर बोलता बोलता ट्विंकलनेही तिच्या आयुष्यातील काही गुपिते बेबोला सांगितली.

एस एस राजमौलीचा ‘आरआरआर’ आता या तारखेला होणार प्रदर्शित

ट्विंकलने सर्वांसमोर केली अक्षय कुमारची पोल खोल

‘गुडन्यूज’ चित्रपटात अक्षय कुमार आणि करिना कपूर यांची जोडी झळकली होती. ट्विंकलने शेअर केलं की या  चित्रपटात करिनाने चक्क ट्विंकलची खरीखुरी भूमिका साकारली होती. ती म्हणाली, मी जेव्हा गुडन्यूज चित्रपट पाहिला तेव्हा मला अक्षरशः धक्काच बसला. कारण तू चक्क माझी खऱ्या आयुष्यातील भूमिका पडद्यावर साकारत होतीस. तेव्हा करिनाने हसत हसत उत्तर दिलं की, होय अजून अनेकांना माहीतच नाही आहे की ती तू होतीस. पुन्हा ट्विंकलने उघड केलं की, “या चित्रपटात अर्धे अधिक संवाद तर ते होते जे मी माझ्या खऱ्या आयुष्यात अक्षयला बोलली होती. सर्वात मजेशीर म्हणजे या चित्रपटात तुमच्या लग्नाचा जो फोटो होता तो माझ्या खऱ्या लग्नातला होता. फक्त त्यामध्ये माझा चेहरा काढून करिना तुझा चेहरा लावण्यात आला होता. एक दिवस मी अक्षयला म्हणाले की, महिलांना सर्व कामं करावी लागतात, तुम्ही पुरूष काय करता. मुलाला जन्म देण्यात तुमचं काय योगदान आहे तुम्ही फक्त चेहरे बनवता आणि झालं. अक्षयने चक्क माझं बोलणं तुमच्या चित्रपटात वापरलं.”

समंथा रूथ प्रभूने केले सान्या मल्होत्राच्या डान्सचे कौतुक

ADVERTISEMENT

ट्विंकलच्या बोलण्यामुळे करिनाही झाली हैराण

ट्विंकलने अक्षयची केलेली पोलखोल ऐकून करिना म्हणाली की, “मला जेव्हा अक्षयने तुझे संवाद म्हणायला सांगितले तेव्हा मी खरंच हैराण झाली होती. कारण हे सर्व स्क्रिप्टमध्ये नव्हतं आणि मी मोनोलॉग तयार केले होते. जेव्हा मी मोनोलॉग तयार करायची अक्षय म्हणायचा की नाही आता मी लाईन यात अॅड केली आहे ती तू घे. मी माझे संवाद तयार करून अनेक आठवडे सराव केला होता. मात्र अक्षय सेटवर ऐकायलाच तयार नव्हता तो सारखा म्हणत होता की, नाही नाही तू हेच संवाद शूट दरम्यान घे कारण ते बेस्ट आहेत आणि टीनापण अशीच बोलायची. तेव्हा मला समजायचं की तू अशी का म्हणाली असशील आणि तुमचं कशावरून भांडण झालं असेल”

झिम्मा’ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी, दुसऱ्या भागाची चर्चा सुरू

02 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT