‘कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेशु कदाचन’ हा भगवद् गीतेमधील श्लोक सर्वांनाच माहीत आहे. तर ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ या पांडुरंगाच्या भक्तीगीताबाबतही सर्वांना माहीत आहे. खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसं कर्म करतो त्याची फळं आपल्याला याच आयुष्यात इथे भोगायची असतात. अथवा काही जणांच्या तोंडून असंही ऐकायला येतं की, ‘मागच्या जन्माच्या कर्माची फळं या जन्मी भोगावी लागत आहेत’. ही सगळं वाक्य आपण नेहमीच ऐकतो. तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की, कर्म म्हणजे नक्की काय? असेच कर्मावर काही अर्थपूर्ण आणि प्रेरणात्मक कोट्स (Karma Quotes In Marathi) आपल्याला या लेखातून आम्ही देत आहोत. आजकाल व्हॉट्स अपच्या युगात अनेकदा कर्मावर स्टेटस (Karma Status In Marathi) ठेवता येतात. त्यासाठी तुम्हाला हे कोट्स आणि स्टेटस (Karma Marathi Status) नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलींसाठी कर्म कोट्स | Karma Quotes In Marathi For Girl
मुलामुलींचे भांडण झाल्यावर मुली जास्त व्यक्त होतात आणि मुलांना आपल्या मनातलं बोलतात. त्यामध्ये बऱ्याच वेळा कर्माची फळं तुला भोगावीच लागतील अशा स्वरूपाचे बोलणेही (Quotes On Karma In Marathi) असते. असेच मुलींच्या बाजूने विचार करायला लावणारे काही कर्म कोट्स (Karma Quotes In Marathi). बुद्धाची शिकवणही आपल्याला अशावेळी प्रेरणा देते.
1. तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल.
2. कर्माचे फळ नेहमीच मिळते.
3. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.
4. जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे.
5. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.
6. जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका.
7. इतरांच्या भल्यासाठी कर्म करा. यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल.
8. कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका.
9. कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगलेच कर्म करा.
10. उशीरा का होईन कर्माचे फळ हे मिळतेच.
वाचा – Marathi quotes On Life
मुलांसाठी कर्म स्टेटस | Karma Status In Marathi For Boy
आजकाल काहीही झालं तरी व्हॉट्स अप स्टेटस ठेवले जातात. विशेषतः आपल्या बॉयफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर मुली सहसा स्टेटस ठेवताना दिसतात. असेच काही स्टेटस (Karma Status In Marathi). वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी कोट्स (Quotes On Happiness) नक्की कामी येतात. असेच तुम्हाला कर्म स्टेटसही मदत करतात.
1. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही.
2. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते, मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव आणि कर्मच ठरवतो.
3. नात्यांची गरज असावी पण गरजेपुरते नाते नसावे. हे सर्व तुमच्या कर्मावरच ठरते.
4. जे तुम्ही एखाद्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, मग इज्जत असो वा धोका. तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागते.
5. भोग आहेत नशीबाचे भोगावे लागतीलच, आज पेरलेली रोपटी ही कधीतरी उगणारच. याला कर्म म्हणतात.
6. देव देतो आणि कर्म नेतं.
7. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार.
8. या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा ही याच जन्मात मिळते आणि याला म्हणतात कर्म.
9. देवापेक्षा कर्माची भीती अधिक बाळगावी. एक वेळ देव माफ करेल. पण कर्म कधीही माफ करणार नाही.
10. कर्माची परतफेड ही करावीच लागते.
आयुष्यात केलेल्या कर्मावरील कोट्स | Quotes On Karma In Marathi For Life
आयुष्यावर बोलू काही अशी वेळ अनेकदा येते. आयुष्यात आपण अनेकदा चुकीचे वागत असतो. तर काहीच्या चुकींची शिक्षा नकळत आपल्यालाही मिळत असते. आपण अनेकदा आपल्या चुकीची शिक्षा भोगतो तर काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षाही आपल्याला मिळते आणि आपल्या आयुष्याची यामध्ये होरपळ होत असते. यामध्ये आपण केलेल्या कर्माचीच नाही तर आयुष्यामध्ये अनेकदा दुसऱ्यांच्या कर्माचाही जाब आपल्याला द्यावा लागतो. आयुष्यात केलेल्या कर्मावरील कोट्स खास तुमच्यासाठी.
1. कर्म करताना नेहमी सजग राहूनच करा. कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते.
2. ब्रम्हांडातील कोणताही नियम बदलू शकतो, हे खरं आहे. मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
3. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि हेच त्रिवार सत्य आहे.
4. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो.
5. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दवडू नका. कारण तुमच्याजागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात याची फळं भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते.
6. कोणाचाही सूड कधीच उगवू नका. कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नाही.
7. ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही राग ठेऊ नका. कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहेत.
8. कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नसते.
9. आयुष्यात काहीतरी चांगलं मिळविण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं. मग ते तुमचे कर्म असो अथवा कुणा दुसऱ्याचे.
10. शांत राहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या.
चांगले कर्म कोट्स मराठीत | Changle Karma Quotes In Marathi
चांगल्या गोष्टी करत राहिलात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात. म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते. केवळ आताच नाही तर अगदी इतिहासातही नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे. तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या फळाची अपेक्षा करू नका. पण तुम्हाला चांगल्याच्या बदल्यात चांगलेच मिळणार. असेच काही चांगले कर्म कोट्स तुमच्यासाठी.
1. नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगले फळच मिळेल.
2. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील.
3. चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठीदेखील चांगले बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा.
4. वेळेची वाट पाहा. कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच या जन्मात मिळणार आहे हे नक्की!
5. चांगले कर्म केल्याने बाकी काही असो नवा नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते.
6. जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात, त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात.
7. धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे हे माणूस आपोआप नरम होतो, अन्यथा बोललेले वर्मावर बसते.
8. कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसून आपला वेळ अजिबातच घालवू नका. कारण कर्म त्याचे काम करणारच आहे.
9. चांगलं करा किंवा वाईट, तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळेल.
10. कर्म म्हणते, तुम्ही कधीही कर्म करायचे थांबवू नका, कारण तुम्ही जे करत आहात, त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे.
कर्माचे प्रेमळ कोट्स | Karma Love Quotes In Marathi
प्रेमामध्ये सर्वात जास्त मन दुखावते अथवा मनाला आनंद मिळतो. कर्माचे प्रेमळ कोट्स खास तुमच्यासाठी. कर्म म्हणजे नक्की काय हे प्रत्येक माणसाला कळलेले असते. मात्र त्यावर विचारपूर्वक कधीच वागले जात नाही. तुम्हीही यावर विचार करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा.
1. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी कमीच पडते, म्हणून चांगले कर्म करणे कधीही सोडू नका.
2. तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे. नाहीतर एकाच नावामध्ये सर्व जग सामावलेले आहे आणि तो म्हणजे देव.
3. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका. कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते.
4. दुसऱ्यासाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, त्यामुळेच कर्म त्यांना साथ देते.
5. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची नाही.
6. लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या!
7. कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे. किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं.
8. आपल्या धर्मावर आपले प्रेम असते. पण आपला धर्म निभावण्यापेक्षा आपले कर्म निभावणे अधिक महत्त्वाचे असते.
9. कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते.
10. वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहातात. त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. त्यामुळेच त्यांचे नेहमी चांगले होते.
कर्मावरील काही उत्तेजना देणारे आणि प्रोत्साहीत करणारे कोट्स आम्ही तुम्हाला दिले आहेत. जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल अथवा दुःखी व्हाल तेव्हा नक्कीच हे कोट्स तुम्हाला प्रेरणादायी ठरतील आणि आयुष्यात तुम्हाला नक्की पुढे जाण्यास मदत करतील.