विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी असलेल्या दोन मुख्य महाएकादशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जातात. त्यातील एक असते आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी आणि दुसरी असते कार्तिकी एकादशी…आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते तर कार्तिकी एकादशीचा उत्सव आळंदीत रंगतो. थोडक्यात आषाढीला जसे वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जमा होतात तसाच वारकऱ्यांचा मेळा कार्तिकीला आळंदीत जमा होतो. या दोन्ही एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांची मांदीयाळी असते. विठ्ठल नामघोषात आणि अभंगाच्या तालावर पंढरी आणि आळंदी अक्षरशः दुमदुमून निघते. कार्तिकी आणि एकादशीला वारकऱ्यांच्या आनंदाला पारावरच नसतो. विठ्ठल भक्त पांडूरंगाच्या नामघोषात इतके रंगतात की त्यांना त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाचा सहज विसर पडतो. या दोन्ही एकादशीच्या दिवशी सर्व वातावरणच जणू भक्तीमय आणि मंगलमय होतं. कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक एकादशी म्हणून ओळखली जाते. काहीजण या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात. या एकादशीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्तिक एकादशी चे महत्व (kartiki ekadashi information in marathi) माहीत असायला हवं. अशा पवित्र वातावरणात तुमच्या प्रियजनांना द्या या विठ्ठलमय कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा (kartiki ekadashi chya hardik shubhechha).
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha)
कार्तिकी एकादशी चे महत्व आणि कार्तिकी एकादशी कधी आहे | Importance Of Kartiki Ekadashi
दक्षिणायन ही देवांची रात्र तर उत्तरायण देवांचा दिवस समजला जातो. आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिक एकादशीला ते पुन्हा जागृत अवस्थेत येतात अशी एक समजूत आहे. म्हणूनच कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं. कार्तिकी एकादशीनंतर विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. पुराणात कार्तिकी एकादशीला पूजा आणि नामस्मरण करणाऱ्या भक्तांची पातके नष्ट होतात असे सांगण्यात आलेले आहेत. म्हणूनच कार्तिकी एकादशी मनोभावे साजरी करण्याची पद्धत आहे. अशी पुण्याईची प्राप्ती करून देणारी कार्तिकी एकादशी कधी आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यंदा 14 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे यावर्षी एकादशीला करा नामस्मरण आणि तुमच्यासह इतरांना नामाची गोडी लावण्यासाठी त्यांना पाठवा या कार्तिकी एकादशी शुभेच्छा (kartiki ekadashi shubhechha in marathi).
आषाढी एकादशी माहिती मराठी (Ashadhi Ekadashi Information In Marathi)
कार्तिकी एकादशी शुभेच्छा | Kartiki Ekadashi Shubhechha)
कार्तिकी एकादशीच्या या मंगलमय वातावरणात सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी खास कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा (kartiki ekadashi chya hardik shubhechha).
1.कार्तिकी एकादशीच्या सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा!!!
2.कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा!
3.बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल|
करावा विठ्ठल जीवभाव||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
4.सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनियां||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
5.रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी|
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा||
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी|
सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!!!
दत्त जयंती कोट्स मराठी, साजरी करा दत्त जयंती (Datta Jayanti Quotes In Marathi)
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Kartiki Ekadashi Chya Hardik Shubhechha
कार्तिकी एकादशी म्हणजे विठूरायाच्या चरणी लीन विठ्ठलभक्तांसाठी आनंदोत्सवच… अशा वातावरणाला आणखी मंगलमय करण्यासाठी खास कार्तिकी एकादशी शुभेच्छा (kartiki ekadashi shubhechha in marathi).
1.विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली रे…
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
2.भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तु आम्हा
लेकरांची विठुमाऊली….
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
3.पंढरीसी जावे ऐसे माझे मनी
विठाई जननी भेटे केव्हा…
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
सावळे सुंदर, रूप मनोहर|
राहो निरंतर ह्रदयी माझे||
कार्तिकी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
4. कानडा राजा पंढरीचा…
||विठ्ठल||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
5. पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला
हीच प्रार्थना करतो पांडुरंगाला||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
कार्तिक एकादशी स्टेटस | Kartiki Ekadashi Whatsapp Status
आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे तेव्हा आज कार्तिकी एकादशीनिमित्त सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्यासाठी खास कार्तिक एकादशी स्टेटस (kartiki ekadashi whatsapp status).
1.नाम विठोबाचे घ्यावे |
मग पाऊल टाकावे ||
2.डोळा दिसावा विठ्ठल|
व्हावं आयुष्य एकादस||
पुऱ्या जिंदगीला जोड|
शब्द अभंग अभंग||
3.वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू|
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनि निःसंग||
4.आम्हा नादी विठ्ठल
आम्हा छंदी विठ्ठल
ह्रदयी विठ्ठल मिळतसे||
5. सगुण निर्गुण गुणांचे अगुण|
हरिविण मज व्यर्थ जाय||
कार्तिकी एकादशी संदेश मराठीतून | Kartiki Ekadashi Wishes In Marathi
कार्तिकी एकादशीला एकमेकांना मोबाईलवरून भक्तिमय मेसेज पाठण्यासाठी कार्तिकी एकादशी संदेश (kartiki ekadashi wishes in marathi) तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील.
1.घेई घेई माझे वाचे
गोड नाम विठोबाचे||
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
2.भेटीची आवडी उताविळ मन
लागतसे ध्यान जीवीं जीवा||
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
3.बा पांडुरंगा केव्हा भेट देशी
झालो मी परदेशी तुजविण ||
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
4.पावलों पंढरी वैकुंठभुवन
धन्य आजि दिन सोनियाचा ||
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
5.विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
जाइन त्याच्या गांवा भेटावया||
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!