ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कविता कौशिकला नाही व्हायचं आई, कारण ऐकून व्हाल थक्क

कविता कौशिकला नाही व्हायचं आई, कारण ऐकून व्हाल थक्क

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक आणि उद्योगपती रोनित विश्वास तीन वर्षापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकले. दोघांनी केदारनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह केला. आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याकडून आईबाबा होण्याची खुशखबर हवी आहे. मात्र कविता आणि रोनितला आईबाबा व्हायचं नाही. कविताने एका मुलखतीत याबाबत खुलासा केला आहे. कविताचं आई न होण्यामागचं कारण वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल.

या कारणासाठी बदलली बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटाची रिलीज डेट

कविताने स्वतः केला याबाबत खुलासा

आईबाबा होणं हे प्रत्येक सुखी आणि एकमेकांवर नितांत प्रेम असलेल्या जोडप्याचे स्वप्न असते. आजकाल  करिअरचा ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हे स्वप्न इच्छा असूनही पूर्ण करता येत नाही. उशीरा प्रयत्न करणाऱ्यांच्या स्वप्नात वंधत्व समस्यांमुळे अनेक अडचणी येतात. मात्र तरिही आजकाल यावर अनेक वैद्यकीय उपचार आहेत. ज्यामुळे कोणतंही सुखी जोडपं आईबाबा होण्याचं स्वप्न सहज पूर्ण करू शकतं. मात्र कविता कौशिकची समस्या थोडी वेगळी आहे. कविताने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिच्या कडे सध्या एक कुत्रा आणि एक मांजर आहे. हेच तिचे कुटुंब आहेत. शिवाय आपल्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात आणखी एक बाळ जन्माला घालून समस्या वाढवण्याची तिची इच्छा नाही. आई होऊन तिला कोणत्याही नव्या जीवाच्या बाबत गोंधळ घालायचा नाही. कारण तिच्या मते ती आता चाळीस वर्षांची आहे. या वयात जर तिने बाळाला जन्म दिला तर जेव्हा ते बाळ वीस वर्षांचे असेल तेव्हा ती वयस्कर झालेली असेल. कविताला असं मुळीच वाटत नाही की भविष्यात तिच्या वीस वर्षांच्या मुलावर म्हाताऱ्या आईबाबांना सांभाळण्याची जबाबदारी पडावी. यापेक्षा ती म्हणते की जग सुंदर बनवूया…या धावपळीच्या आणि प्रचंड गर्दी असलेल्या जगात मला माझ्या मुलाला आणायचे नाही. कारण आमच्या नंतर आम्हाला त्याला एकट्याला या जगात संघर्ष करत सोडून जावं लागेल. 

परिणीती चोप्रा ने शेअर केलं तिचं शूज कलेक्शन, अशी होते पाच मिनीटात तयार

ADVERTISEMENT

कविता कौशिकची नवी मालिका

कविता कौशिक लग्नानंतर बरेच वर्ष टेलीव्हिजनपासून दूर होती. कविता कौशिकला याआधी बिग बॉस 13 मध्ये पाहिलं होतं. त्या सीझनमध्ये मनोरंजनाचा चांगलाच तडका तिने प्रेक्षकांना दिला होता. मात्र इतर स्पर्धकांसोबत वाद झाल्यामुळे ती स्वतःच शोमधून बाहेर पडली होती. त्यावेळी तिने अपुरी झोप आणि भुक सहन न झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. आता लवकरच ती लक्ष्मी घर आई मधून परत पुनरागमन करत आहे. कविताला कॅनियोसाठी विचारण्यात आलं होतं.तिच्या भुमिकेचं नाव बक्सा मासी म्हणजे मावशी असं आहे. तिच्या आतापर्यंच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असेल. कविताने आजवर अनेक हिंदी, पंजाबी मालिका, चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. मात्र तिला मालिकांमध्ये काम करणं आजही खूप आवडतं. कारण चित्रपटांपेक्षा मालिकांचा प्रेक्षक कलाकारांवर सर्वात जास्त प्रेम करतो. 

मुनमुन दत्ताची संतापजनक प्रतिक्रिया, भारताची मुलगी असल्याची लाज वाटत असल्याचं वक्तव्य

15 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT