Advertisement

बॉलीवूड

परिणीती चोप्रा ने शेअर केलं तिचं शूज कलेक्शन, अशी होते पाच मिनीटात तयार

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Sep 14, 2021
परिणीती चोप्रा ने शेअर केलं तिचं शूज कलेक्शन, अशी होते पाच मिनीटात तयार

बॉलीवूड अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. ज्यामुळे तिचे खास फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या परिणीती काही दिवसांपासून तिचे डेली रूटिन आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतंच परिणीती काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामधून तिने चक्क तिचं शू कलेक्शनच चाहत्यांसमोर सादर केलं आहे. विशेष हे कलेक्शन पाहून अनेक सेलिब्रेटीजदेखील थक्क झाले आहेत. 

परिणीती होते पाच मिनीटात तयार

परिणीतीने शू कलेक्शनचे फोटो शेअर करत कॅप्शन दिली आहे “पाच मिनीटात तयार, माझे आश्वासन आहे” पहिल्या फोटोत तिचं अवाढव्य शू कलेक्शन दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत शूज परिधान करत ती पटकन तयार होत पोझ देताना दिसत आहे. या पोस्टसाठी परिणीतीने बाथरोब घातलेला आहे. परिणीतीचे शू कलेक्शन पाहून टेनिस खेळाडू सानिया मिर्झालाही हेवा वाटत आहे. तिने या पोस्टवर कंमेट केली आहे की, “मला तुझे शूज पाहून जळायला होत आहे. मला पण ते हवेत….” तर परिणीतीचा भाऊ शिवांद चोप्राने परिणीतीला “मला तुझा अभिमान आहे अशी कंमेट केली आहे” परिणीतीच्या शू वॉर्डरोबमध्ये सफेद रंगाचे अनेक शूज असल्यामुळे चाहत्यांना इतक्या सफेद रंगाच्या शूजचं परिणीती काय करते असा प्रश्न पडला आहे. एका चाहत्याने तर परी तुझ्याकडे शूजचं म्युझियमच आहे असं म्हटलं आहे. काहींना मात्र हा पैशांचा अपव्यय वाटत असल्यामुळे त्यांनी परिणीतीला यावरून ट्रोलही केलं आहे. 

या कारणासाठी बदलली बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटाची रिलीज डेट

परिणीती चोप्राचे आगामी चित्रपट

परिणीती गेली दोन वर्ष बॉलीवूडपासून दूर होती. मात्र या वर्षी तिचे लागोपाठ तीन तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ओटीटी माध्यमावर या चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. दी गर्ल ऑन दी ट्रेन चा हिंदी वर्जन फेब्रुवारीत प्रदर्शित झाला होता. मार्चमध्ये आलेल्या संदीप और पिंकी फरारला ही चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यानंतर आलेल्या सायनामधून परिणीतीच्या अभिनयाची एक वेगळी झलक पाहायला मिळाली. सायना चित्रपट सायना नेहवालची बायोपिक होती. आता चाहते परिणीतीच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत. परिणीती लवकरच रणबीर कपूरसोबत एनिमल या चित्रपटातून चाहत्यांसमोर येणार आहे. 

मुनमुन दत्ताची संतापजनक प्रतिक्रिया, भारताची मुलगी असल्याची लाज वाटत असल्याचं वक्तव्य

रिया चक्रवर्तीने शेअर केली ग्लॅमरस पोस्ट, सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच पोस्ट