ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
kitchen hacks

लिंबू, मिरची आणि आल्याचे सोपे हॅक्स, करा उपयोग

आपल्याकडे सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापरले जाणारे पदार्थ म्हणजे लिंबू, आलं आणि मिरची. भले घरात काही जण कांदा लसूणचा वापर करत नसतील पण पण लिंबू, मिरची आणि आले या तीन गोष्टींचा वापर करण्यात येत नाही असं अजिबातच होत नाही. पण या तिन्ही पदार्थांच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत. हे पदार्थ कसे टिकवून ठेवायचे आणि काही सोप्या हॅक्स या आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. तुम्ही या सोप्या कुकिंग हॅक्सचा उपयोग (Easy cooking hacks) नेहमी करू शकता. या तिन्ही पदार्थांबाबत सोपे हॅक्स जाणून घेऊया.

लिंबू (Lemon)

lemon juice

लिंबू एक असा पदार्थ आहे जो केवळ खाण्यापिण्यासाठीच नाही तर स्वच्छता, त्वचेची काळजी आणि केसांसाठीही वापरण्यात येतो. लिंबूच नाही तर लिंबाच्या सालींचाही उपयोग होतो. लिंबाचे काही हॅक्स जाणून घ्या.

  • तुम्ही सफरचंद कापून खात असाल तर थोड्याशा पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही सफरचंदाला लाऊन खा. असे केल्याने सफरचंद काळे पडत नाही आणि अधिक वेळ ताजे राहण्यास मदत मिळते 
  • तुम्ही कटिंग बोर्डाचा वापर करत असाल तर त्याला अनेकदा डाग लागतात. हे डाग मिटविण्यासाठी लिंबाचा वापर करावा. तुम्ही लिंबू यावर घासा आणि तसंच 20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा. तुमचा कटिंग बोर्ड सहज स्वच्छ होतो 
  • कांदा आणि लसूण सोलल्यावर अथवा कापल्यावर हाताला येणारा वास घालविण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता 
  • बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही स्वयंपाघरातील सिंकमध्ये घाला आणि त्याची स्वच्छता करा. भाजी अथवा अन्य पदार्थांचा वास सिंकला येणार नाही 
  • मटण बनविण्यासाठी लिंबाचा वापर होतो. मॅरिनेट करताना लिंबाचा वापर केल्यास, मसाला लावताना त्रास होत नाही आणि चवही चांगली लागते 

हिरवी मिरची आणि लाल मिरची (Green Chilly and Red Chilly) 

chilly

हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा उपयोग हा जेवणात तिखटपणाचा स्वाद आणण्यासाठी असतो आणि खाण्याच्या पदार्थात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. पण तुम्हाला याच्या काही हॅक्स माहीत आहेत का? रोजच्या कामामध्ये या हॅक्स तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. 

  • ज्या मिरचीवर ब्राऊन रंगाचा डाग तुम्हाला दिसत असेल ती मिरची बाजूला काढून ठेवा. कारण अशी मिरची सर्वात पहिले खराब होते पण तुम्हाला जर कुंडीत मिरचीचे झाड लावायचे असेल तर तुम्ही अशाच मिरचीचा वापर करा. कारण अशी मिरची सर्वात लवकर झाड येण्यास मदत करते. या मिरचीची बी काढून 1-2 तास पंख्याखाली सुकवा आणि मग सरळ ही बी तुम्ही मातीत रूजत घाला. थोड्याच दिवसात मिरचीचे झाड आलेले तुम्हाला दिसून येईल
  • हिरवी मिरची असो अथवा लाल मिरची जर टिकवायची असेल तर तुम्ही त्याचे देठ काढून ती मिरची स्टोअर करा
  • खाण्याच्या कोणत्याही पदार्थात हिरवी मिरची अथवा लाल मिरचीचे प्रमाण जास्त झाले असेल तर तुम्ही त्या पदार्थात लिंबाचा रस अथवा तुपाचा वापर करा. ज्यामुळे तिखटपणा कमी होतो. सुक्या भाजीतील मिरचीचा तिखटपणा कमी करण्यसाठी ही पद्धत पटकन कामी येते
  • सर्वात सोप्या पद्धतीने मिरचीची चटणी बनविण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची, लसूण थोडीशी तेलात भाजून घ्या आणि त्यावर मीठ घालून याचे वाटण करा. ही चटणी अनेक दिवस तुम्ही खाऊ शकता

आले

ginger

बऱ्याच लोकांना आल्याचा स्वाद चहाबरोबर अधिक आवडतो. पण आल्यामुळे अनेक कामं होतात. याचा तुम्ही इतर गोष्टीतही वापर करू शकता. आले खाण्याचे फायदेही अनेक आहेत.

ADVERTISEMENT
  • तुम्ही आलं जर चाकूने सोलत असाल तर त्यापेक्षा जेव्हा फ्रिजमधून आलं बाहेर काढता तेव्हा चमच्याने याचे साल काढा. हे अधिक सोपे आहे
  • जेवण करताना आले किसून घालण्याऐवजी जर तुम्ही ते कुटून घातलंत तर तुम्हाला त्याचा पदार्थामध्ये अधिक स्वाद लागतो 
  • आपल्या डाएटमध्ये आल्याचा समावेश करून घेताना तुम्ही सुंठ आणि आल्याच्या पावडरचे पाणी करून पिऊ शकता 
  • आले साठवताना त्याची मुळे वेगळी करा आणि लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर एअर टाईट बॅगेत भरून ते स्टोअर करा. यामुळे आले जास्त दिवस टिकते

या तिन्ही पदार्थांचा वापर आपण नियमित करतो त्यामुळे या सोप्या टिप्स आणि हॅक्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. याचा वापर करून आम्हाला नक्की कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT