ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#KKK10 – ‘खतरों के खिलाडी’मध्ये यावेळी दिसणार 3 मराठमोळे चेहरे

#KKK10 – ‘खतरों के खिलाडी’मध्ये यावेळी दिसणार 3 मराठमोळे चेहरे

‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो चा दहावा सीझन लवकरच सुरु होणार असून याच्या चित्रीकरणाला बल्गेरियामध्ये सुरुवात झाली आहे. यावर्षीदेखील हा शो स्टंटचा बादशाह असणारा रोहित शेट्टी होस्ट करत आहे. रोहित शेट्टीचा हा शो नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये नंबर 1 राहिला आहे. यावर्षी या सीझनमध्ये नक्की कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकता ताणली गेली होती. आता या 10 स्पर्धकांची नावं कळली आहेत. त्यापैकी 3 मराठमोळे चेहरे या सीझनमध्ये दिसणार असून विजेता नक्की कोण होणार या चर्चांनाही आता सुरुवात झाली आहे. उंचीवरून उड्या मारण्यापासून ते अगदी किड्यांमध्ये झोपण्यापर्यंत अनेक स्टंट्स या शो मध्ये केले जातात. आपल्या मनातील भीतीवर मात करणारा स्पर्धकच या स्पर्धेत टिकतो आणि दमदार कामगिरी करत पुढे येतो. यावर्षी असा स्पर्धक नक्की कोण असेल हे तर येणारा काळच ठरवेल. पण आपण जाणून घेऊया यावर्षी कोणकोणते स्पर्धक या शो मध्ये सहभागी होत आहेत. 

1. करण पटेल

Instagram

टीव्हीवरील रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा करण पटेल हा या स्पर्धेतील पहिला स्पर्धक आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावरूनही याची माहिती दिली होती. एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बते’ मधून रमण भल्लाची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकणारा करण आता हे सगळे खतरा पार करणार का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. गेले सहा वर्ष ही मालिका करण करत होता. पण #KKK10 साठी करणने ही मालिकाही सोडली.

ADVERTISEMENT

2. करिश्मा तन्ना

Instagram

करिश्मा तन्नाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. नागिन 3 आणि कयामत की रात सारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तसंच तिने आधीही रियालिटी शो केले आहेत. ‘बिग बॉस 8’, ‘नच बलिये’ आणि ‘झलक दिखला जा’ अशा शो मधून तिने आपली ओळख निर्माण केली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून उत्तम डान्सर असल्याचंही तिने सिद्ध केलं आहे. आता या शो मध्ये ती कशी परफॉर्म करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

3. धर्मेश येलांडे

ADVERTISEMENT

Instagram

एका रियालिटी शो मधून डान्सर म्हणून सुरुवात केलेल्या धर्मेशने आपल्या डान्सने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. बरेच जण त्याला आपला आदर्श मानतात. त्यानंतर त्याने काही चित्रपटातून आपल्या अभिनयाचीही ओळख करून दिली. मागच्या सीझनमध्ये धर्मेशचा जवळचा मित्र पुनीत पाठक होता. त्याने हा शो जिंकला होता. त्यामुळे आता धर्मेशकडूनही त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

4. अमृता खानविलकर

Instagram

ADVERTISEMENT

टीव्ही, चित्रपट, वेबसिरीज या सगळ्या माध्यमात सध्या राज्य करत असलेला मराठमोळा चेहरा म्हणजे अमृता खानविलकर. यावर्षीच्या सीझनमध्ये अमृताने आपला सहभाग सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. त्यासाठी आपण गेल्या एक महिन्यापासून तयारी करत असल्याचंही तिने सांगितलं. अमृता आता एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाली असून या सीझनमध्ये ती नक्की कसं परफॉर्म करेल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

5. तेजस्वी प्रकाश

Instagram

तेजस्वी हादेखील एक मराठमोळा चेहरा यावर्षी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तेजस्वी मराठी असली तरीही तिने आतापर्यंत हिंदी मालिकांमधूनच काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. यावेळी अशा तगड्या स्पर्धकांबरोबर तेजस्वीदेखील टफ फाईट देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेजस्वी या आधी करत असलेल्या शो ची बरीच चर्चा होऊन हा शो बालविवाहाला प्रोत्साहन देणारा असल्याचं प्रेक्षकांचं मत झाल्याने लवकर बंद करावा लागला होता. 

ADVERTISEMENT

6. अदा खान

Instagram

नागिनच्या पहिल्या भागातून आपल्या अदांनी घायाळ केलेली अभिनेत्री अदा खानदेखील या सीझनमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. अदाने याआधी कोणत्याही रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला नव्हता. आपण हा रिलालिटी शो करत असून पहिल्यांदाच अशा स्पर्धेत उतरत असल्याचं अदाने सांगितलं आहे. तसंच स्वत:लाच आव्हान करायचं असल्यानेही हा शो करत असल्याचं अदाने सांगितलं आहे. अदाने या इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता या आव्हानांचा सामना ती कशी करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?

ADVERTISEMENT

7. बलराज सान्याल

Instagram

आपल्या कॉमिक टायमिंगमुळे ओळखला जाणारा बलराज सान्याल यावर्षीच्या सीझनमध्ये सहभागी होत आहे. मागच्या वर्षी कॉमेडीचा तडका लावण्यासाठी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी बलराज सान्याल कसा परफॉर्म करणार आणि कॉमेडीचा काय तडका लावणार हे बघणं प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर ठरणार आहे. 

8. मलिष्का मेंडोका (RJ Malishka)

ADVERTISEMENT

Instagram

मुंबईची राणी म्हणून ओळखली जाणारी रेडिओ जॉकी मलिष्काही यावेळी प्रेक्षकांना दिसणार आहे. रेडिओवर आपल्या आवाजाने आणि सामाजिक भान ठेऊन नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मलिष्का खऱ्या आयुष्यात कशी आहे हे या रियालिटी शो च्या निमित्ताने तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. मलिष्काचे लाखो चाहते असून तिने या शो मध्ये जास्त वेळ टिकावं अशीच त्यांची इच्छा आहे. 

बाॅलीवूड सेलिब्रिटीज ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न मोडलं

9. शिवीन नारंग

ADVERTISEMENT

Instagram

‘वीरा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेला शिवीन नारंग हा अजून एक स्पर्धक यावेळी दिसणार आहे. शिवीनला आतापर्यंत प्रेक्षकांनी अतिशय हळव्या भूमिकेतून पाहिलं आहे. पण खऱ्या आयुष्यात शिवीन कसा आहे हे खतरो के खिलाडीमधून समोर येईल. शिवीनचादेखील हा पहिलाच रियालिटी शो आहे. शिवाय त्याच्याबरोबरील स्पर्धक हे तगडे असल्याची त्यालाही जाणीव आहे. त्यामुळे सर्व तयारीनिशी आपण या शो मध्ये उतरत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. 

10. राणी चटर्जी

Instagram

ADVERTISEMENT

भोजपुरी स्टार असणारी राणी चटर्जी सध्या चर्चेत आहे ती, बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून जाणार असल्याने. पण त्याआधी तिने खतरों के खिलाडी हा शो साईन केला आहे. तीदेखील बल्गेरियाला रवाना झाली असून आपल्या अन्य स्पर्धकांसह सध्या वेळ घालवत आहे. राणी ही भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री असून तिचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. 

कपिल शर्मा आणि गिन्नीच्या बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

08 Aug 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT