न्यूमरोलॉजीचा अर्थ तसा तर सर्वांनाच माहीत आहे. अंकज्योतिष म्हणजे न्यूमरोलॉजी. आपल्या आयुष्याशी निगडीत असणारे हे अंक आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी दर्शवतात असं म्हटलं जातं. तुमचं व्यक्तीमत्व, तुमचा स्वभाव, तुमची सवय हे सर्व या अभ्यासातून दर्शवता येतं असं म्हटलं जातं. तुम्हाला तुमच्या जन्मदिवसाबाबत माहिती आहे का? नसेल तर या लेखाद्वारे तुम्ही तुमच्या जन्मदिवसाबाबत जाणून घ्या. तुमचा जन्मदिवस एक विशिष्ट अंक असतो आणि त्याप्रमाणे तुमचं व्यक्तीमत्व असतं. त्याचा नक्की अर्थ काय हे जाणून घेऊया.
जाणून घ्या तुमचा शुभ अंक – Birthday Numerology In Marathi
यासाठी तुम्हाला नीट गणित येण्याचीही गरज आहे. एक ते दहामध्ये तुमची जन्मतारीख असल्यास, काहीच अडचण नाही. पण त्यानंतरच्या तारखेला तुमची जन्मतारीख असल्यास, तुम्हाला दोन्ही क्रमांकांची बेरीज करून जो क्रमांक येतो तो तुमचा शुभ अंक असतो आणि आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
उदा. तुमचा जन्म 16 जानेवारीला झाला असेल तर 1+6 = 7, त्यामुळे तुमचा शुभ अंक आहे – 7
तुमचा जन्म 19 सप्टेंबरला झाला असेल तर, 1+9 = 10, 1+0 = 1, तुमचा शुभ अंक आहे – 1
वास्तविक अंकज्योतिष अर्थात न्यूमरोलॉजी केवळ 1 ते 9 पर्यंत काम करतं. त्यामुळे 9 पेक्षा मोठा क्रमांक दिसल्यास त्याची बेरीज करून एक आकडा यावा लागतो. तुमच्या जन्मदिवसाची तारीख त्यामुळे नीट बेरीज करून मग तुमचा शुभ अंक काढा. आता आपण पाहूया नक्की या क्रमांकांचं वैशिष्ट्य काय आहे –
एक (1)
1, 10, 19 आणि 28 या तारखेला जन्म होणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक हा 1 आहे. अशा व्यक्तींमध्ये लीडरशीप कौशल्य खूप चांगलं असतं आणि आपल्या प्रिय माणसांसाठी या व्यक्ती अगदी जीव ओतून देतात. अशा व्यक्ती कायम चांगली प्रगती होताना दिसते तसंच आयुष्याप्रती कोणतीही तडजोड या व्यक्ती करत नाहीत. आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना आपल्या गोष्टी पटवून देणं या व्यक्तींना खूपच चांगलं जमतं. यांच्या अंकज्योतिषाप्रमाणे प्रेम आणि करिअर या दोन्ही गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीची निवड करायची झाल्यास, या व्यक्ती नेहमीच करिअरची निवड करतात. करिअरवर यांचा
दोन (2)
2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 2 असतो. या व्यक्ती अतिशय भावनात्मक असल्या तरीही मनाने मजबूत असतात. शिवाय यांचं व्यक्तीमत्व अतिशय बोल्ड असतं. यांना सोशलाईज होणं आणि फिरणं प्रचंड आवडतं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी बऱ्याचदा यांना वेळ काढणं शक्य होत नाही. प्रत्येक एका महिन्यानंतर आपली लाईफस्टाईल बदलणं या व्यक्तींना अजिबात मान्य नाही. जसं आयुष्य जगत आहोत त्याचप्रमाणे ते जगायला या व्यक्तींना आवडतं. कोणतीही तडजोड करत कोणत्याही नात्यात राहण्यापेक्षा अशा व्यक्तींना एकटं राहणं जास्त आवडतं. या व्यक्तींना स्वतःला व्यवस्थित हाताळता आणि सांभाळता येतं. दुसऱ्या कोणाचीही या व्यक्तींना जास्त गरज भासत नाही.
तीन (3)
3, 12, 21 आणि 30 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 3 आहे. या व्यक्ती अतिशय उत्साही आणि सकारात्मक असतात. तसंच या व्यक्ती अतिशय धार्मिक असतात आणि कोणतीही गोष्ट वेगळ्या दृष्टीकोनातून या व्यक्ती पाहू शकतात. या व्यक्तींचे बरेच मित्रमंडळी असू शकतात पण त्या सर्वांशी भावनात्मकरित्या या व्यक्ती जोडलेल्या नसतात. जास्तीत जास्त मेहनत घेण्यावर या व्यक्तींचा विश्वास असतो. या व्यक्तींना इतरांच्या भावनाही चांगल्या समजून घेता येतात. तुमच्या अंकज्योतिषाप्रमाणे पैसे आणि हुद्दा हा कायम महत्त्वाचा भाग आहे. तसंच कायम पुढे जात राहण्यावर या व्यक्तींचा भर असतो.
चार (4)
4, 13, 22 आणि 31 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 4 आहे. आयुष्यात कितीही वाईट दिवस बघितले तरही या व्यक्ती कधीही खचत नाहीत. या व्यक्ती अतिशय स्वतंत्र विचाराच्या असतात. तसंच लगेच निर्णय घेणं या व्यक्तींना जास्त आवडतं. कोणत्याही प्रकारे वेळ दवडणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. भूतकाळात केलेल्या गोष्टींमधून शिकून या व्यक्ती पुढे जातात. प्रत्येक गोष्टीतून धडा घेऊन मग त्याप्रमाणेच वागण्यावर या व्यक्तींचा जास्त भर असतो. या व्यक्तींना बऱ्यापैकी अॅटीट्यूड असतो पण मनाने या व्यक्ती चांगल्या असतात.
पाच (5)
5, 14 आणि 23 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 5 आहे. या व्यक्ती अतिशय हुशार आणि डोक्याने ब्रलियंट अशा असतात. कोणाचाही अहंकार या व्यक्तींना अजिबात सहन होत नाही. तसंच भावनेपेक्षा या व्यक्ती लॉजिकवर जास्त भर देतात. भावनेपेक्षा आयुष्यात रिअॅलिस्टिक राहणं या व्यक्तींना जास्त भावतं. या व्यक्तींचं सर्वांबरोबर खूपच चांगलं पटतं पण या व्यक्ती इतर व्यक्तींच्या प्रगतीवर मात्र जळतात. फिरणं या व्यक्तींना खूपच आवडतं आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा या व्यक्ती फिरायला बाहेर पडतात. अगदी कितीही दमलेल्या असूनही या व्यक्ती फिरायला म्हटलं की, एका पायावर तयार होतात. कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये या व्यक्ती कधीही येत नाही.
सहा (6)
6, 15 और 24 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 6 आहे. या व्यक्तींसाठी सेक्स अपील हे जास्त महत्त्वाचं असतं. या व्यक्तींना ट्रेंडी, स्टायलिश आणि आकर्षक गोष्टी जास्त आवडतात. या व्यक्तींना आपण स्वतः मटेअरिलिस्टिक असल्याचं वाटतं आणि बऱ्याच अंशी या व्यक्ती तशा असतातही. बऱ्याच व्यक्तींवर या व्यक्तींची जादू अशा प्रकारे असते की, वेगळं अटेंशन घेण्याची गरज या व्यक्तींना भासतच नाही. यांच्या आकर्षक व्यक्तीमत्वामुळे इतर लोक यांच्याकडे आकर्षिक होतात. तसंच या व्यक्ती आर्ट आणि निसर्गाशीदेखील खूपच जवळचं नातं निर्माण करतात. तसंच या व्यक्तींना कोणादरम्यान गैरसमज झाले असल्यास, ते दूर करायला आवडतं.
सात (7)
7, 16 आणि 25 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 7 आहे. या व्यक्ती अतिशय शांतताप्रिय आणि क्रिएटिव्ह विचाराच्या असतात. अजिबात आक्रस्ताळेपणा यांच्याकडे नसतो आणि या व्यक्तींचा निरागसपणाच सर्वांना भावतो. त्यामुळेच या व्यक्ती सर्वांना खूप आपल्याशा वाटतात. पण या व्यक्तींमध्ये लीडरशिप खूपच चांगली असते. अतिशय सोपी आणि भावणारी अशी लाईफस्टाईल या व्यक्तींना आवडते. नशीब कधीही या व्यक्तींच्या बाजूने नसलं तरीही या व्यक्ती कधीही नशीबावर अवलंबून राहात नाहीत. अतिशय मेहनती आणि स्वतःच्या मेहनतीने या व्यक्ती आयुष्यात सर्व काही मिळवतात. यांचं आयुष्य खूपच सोशल असून अतिशय भावनिक असतात.
आठ (8)
8, 17 आणि 26 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 8 आहे. या व्यक्तींना भावनाशून्य आणि कठोर समजण्यात येतं. पण मनाने या व्यक्ती अतिशय हळव्या असतात. या व्यक्ती आपलं व्यावसायिक आयुष्य आणि खासगी आयुष्य, भावना यांची एकत्र गफलत कधीही करत नाहीत. त्यामुळे या व्यक्ती कोणाशीही जास्त फ्रेंडली नसतात. यांच्या अंकज्योतिषाप्रमाणे या व्यक्ती इतरांना त्यांचा हुद्दा आणि प्रतिभा यावरून ओळखतात आणि त्याप्रमाणेच मैत्री करतात. आयुष्य गंभीर न घेणाऱ्या व्यक्ती या व्यक्तींना अजिबात आवडत नाहीत.
नऊ (9)
9, 18 आणि 27 या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक 9 आहे. या व्यक्तींना प्रेम, पॉवर आणि फेम या तिनही गोष्टी अतिशय प्रिय आहेत. हे मिळवण्यासाठी या व्यक्ती बरीच मेहनत घेतात. या व्यक्तींमध्ये धैर्य कमी असलं तरीही या व्यक्ती अतिशय जिद्दी असतात. मित्रांबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्ती क्वांटिटीपेक्षा दर्जावर जास्त विश्वास ठेवतात. वेळेनुसार या व्यक्ती परिस्थितीशी झगडतात. जुन्या गोष्टींवर रडत राहायची यांची सवय नाही. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत आणि कोणत्याही प्रकारची बांधिलकी या व्यक्तींना जास्त सहन होत नाही. या व्यक्तींनी आपलं आयुष्य थोडं मजेने जगावं असा सल्ला आहे.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’