ADVERTISEMENT
home / सौंदर्य
know-which-color-lipstick-would-suit-with-a-blue-dress

निळ्या रंगाच्या कपड्यांवर आकर्षक दिसतात या लिपस्टिक्स

निळा रंग असा रंग आहे जो दिसायला अत्यंत रॉयल दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा पार्टी, सणासुदीला अथवा लग्नसमारंभात लालव्यक्तिरिक्त दिसणारा रंग असतो तो निळा. निळा रंग हा एक वायब्रंट रंग असून हा नेहमीच आकर्षक दिसतो. पण या रंगाचे कपडे घातल्यानंतर तुम्हाला तुमचा लुक अधिक चांगला करायचा असेल आणि अधिक आकर्षक दिसायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य शेड्सच्या लिपस्टिक माहीत असणेदेखील गरजेचे आहे. एखादा ड्रेस चांगला असेल तर त्यावर उत्तम मेकअप आणि मिनिमल मेकअप लुक नेहमीच उठावदार दिसतो. निळ्या रंगासह नक्की कोणत्या रंगाची लिपस्टिक लावायची याबाबत नेहमीच गोंधळ उडतो. पण तुम्ही नक्की कोणत्या कार्यक्रमाला जात आहात यावरही कोणती लिपस्टिक मॅच करायची हे ठरते. तुम्ही सकाळच्या वेळात निळ्या रंगाचे आऊटफिट घालणार असाल आणि अत्यंत लाईट लुक हवा असेल तर तुम्ही लाईट आणि न्यूड रंगाच्या लिपस्टिक्सचा वापर करावा. तर रात्रीच्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही गडद रंगाच्या लिपस्टिक्सचा वापर करू शकता. कपड्याच्या रंगानुसार तुम्ही लिपस्टिक शेड्स निवडा. निळ्या रंगासह वापरा अशा लिपस्टिक्स – 

न्यूड शेड लिपस्टिक्स (Nude Shade Lipsticks)

तुम्ही गडद अथवा रॉयल ब्लू ड्रेस वा साडी नेसली असेल आणि तुम्हाला तुमचा लुक सिंपल आणि एलिगंट हवा असेल तर तुम्ही त्यासाठी न्यूड शेड लिपस्टिकचा वापर करू शकता. न्यूड शेड लिपस्टिक एक अशी लिपस्टिक आहे जी निळ्या रंगाच्या ड्रेससह उत्तम दिसते. तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार योग्य न्यूड शेड लिपस्टिक निवडून तुमच्या ओठांवर लावा. 

पिची रेड लिपस्टिक (Peachy Red Lipstick)

तुमचा स्किन टोन थोडासा सावळा आहे आणि तुम्हाला निळ्या रंगाच्या ड्रेससह एक सटल मात्र सुंदर लुक कॅरी करायचा असेल तर तुम्ही पीची रेड लिपस्टिक ओठांना लावा. लालसह हलकासा पिची शेड तुमचा लुक संतुलित करतो आणि तुमचे सौंदर्य हायलाईट करण्यास मदत करतो. तसंच तुमचा हा लुक अधिक आकर्षक दिसण्यास मदत मिळते. 

हलकीशी गुलाबी लिपस्टिक (Pink Lipstick)

गुलाबी लिपस्टिक करायची असेल खरेदी तर हे शेड्स आहेत बजेटमध्ये

गुलाबी ही लिपस्टिकमधील अशी शेड आहे जी कोणत्याही आऊटफिटवर छानच दिसतो. तुम्ही निळ्या रंगाचे आऊटफिट घालणार असाल तर त्यावर गुलाबी रंगाच्या लिपस्टिक शेड्सचा विचार करू शकता. मात्र यामध्ये योग्य शेड निवडण्याची गरज आहे. तुम्ही जर आलमंड, कॅरेमल अथवा ऑलिव्ह स्किनटोनच्या व्यक्ती असाल तर तुम्हाला हलका गुलाबी रंग सुंदर दिसतो. स्किनटोननुसार शेड निवडा. हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक गडद अथवा लाईट निळ्या रंगासह अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. तुम्ही लाईट गुलाबी लिपस्टिकसह स्मोकी आय मेकअप लुकदेखील क्रिएट करू शकता. 

ADVERTISEMENT

रॉयल रेड लिपस्टिक (Royal Red Lipstick)

तुम्ही त्या महिलांपैकी आहात का? ज्यांना नाईट फंक्शनमध्ये निळ्या रंगाच्या ड्रेससह एक स्टेटमेंट लुक क्रिएट करायचा असतो. असं असेल तर तुम्हाला यासाठी रेड लिपस्टिक हा चांगला पर्याय आहे. वास्तविक रेड लिपस्टिक शेड ही तुमच्या स्किनटोननुसार तुम्ही निवडावी. तुमची स्किन गोरी असेल तर तुम्ही रॉयल रेड लिपस्टिक वापरा. यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही मेकअपची गरज भासणार नाही. 

वेलवेट पिंक लिपस्टिक (Velvet Pink Lipstick)

वेलवेट पिंक लिपस्टिक अत्यंत सुंदर शेड आहे. ही केवळ रात्रीच्या पार्टीतच नाही तर अगदी दिवसादेखील तुम्ही वापरू शकता. तुम्ही एखादा रॉयल ब्ल्यू आऊटफिट घालणार असाल तर बोल्ड मेकअपऐवजी तुम्ही साधा मेकअप करून एक स्टेटमेंट लुक क्रिएट करा आणि त्यावर वेलवेट पिंक लिपस्टिक शेड वापरा. तुम्हाला बाकी मेकअप साधा ठेऊन वेलवेट पिंक लिपस्टिकची शेड गडद करायला हवी. हा लुक अप्रतिम दिसतो. 

तुम्ही यासाठी आमच्या POPxo मेकअप कलेक्शनमधील मिनी लिपस्टिक्सचादेखील वापर करू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT