ADVERTISEMENT
home / आरोग्य
Lahan Mulanchya julabasathi upay

लहान मुलांचे जुलाब उपाय | Remedies For Baby Diarrhea In Marathi

लहान मुलांना बऱ्याचदा जुलाबाचा त्रास होतो. वातावरणातील बदल, पोटातील इनफेक्शन, आहारात झालेला बदल, दात येणे अशी अनेक कारणं त्यामागे असू शकतात. मग बाळ एक वर्षाचे तान्हे बाळ असो वा दहा वर्षाखाली लहान मुलं प्रत्येक आईवडिलांना बाळाच्या आजारपणाची चिंता वाटू लागते. कारण लहान मुलांना त्यांचा त्रास मोठ्यांप्रमाणे व्यक्त करता येत नाही. लहान मुलांच्या हावभाव, चिडचिड, रडणं यातून पालकांना त्यांचा त्रास समजून घ्यावा लागतो. पालकांना मुलांना जुलाब होण्याची कारणं, त्याची लक्षणे आणि उपाय आधीच माहीत असायला हवी. यासाठी आम्ही तुमच्यासोबत एका वर्षाच्या बाळापासून ते दहा वर्षांच्या लहान मुलांपर्यंत जुलाब होण्यामागची कारणे आणि काही घरगुती उपाय – Lahan Mulanche Julab Gharguti Upay शेअर करत आहोत. ज्याचा तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच वाचा बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi, आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

पाच वर्षाखालील बाळाला जुलाब होण्याची कारणे | Causes Of Diarrhea In Babies In Marathi

घरात लहान बाळ असेल तर वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याची विशेष काळजी पालकांना घ्यावी लागते. यासाठी जाणून घ्या पाच वर्षाखालील मुलांना जुलाब होण्याची कारणे 

पाच वर्षाखालील बाळाला जुलाब होण्याची कारणे | Causes of Diarrhea in Babies In Marathi
Lahan Mulanchya julabasathi upay

व्हायरल इनफेक्शन – Viral infections

अगदी तान्ह्या बाळाला व्हायरल इनफेक्शनमुळे जुलाब होण्याची शक्यता असू शकते. दोन वर्षांपर्यंत बाळाला इनफेक्शनमुळे जुलाब होऊ शकतात. पण जर मुलांना या इनफेक्शनसाठी आधीच प्रतिबंधनात्मक लस दिलेली असेल तर जुलाब होण्याच्या त्रासापासून वाचवता येऊ शकते. लस घेतलेल्या बाळालाही कधी कधी व्हायरल इनफेक्शन होते मात्र त्याची लक्षणे आणि त्रास इतरांपेक्षा कमी असतो. त्यामुळे बाळाला वातावरणात झालेल्या बदलांमुळेही जुलाबाचा त्रास होतो ही शक्यता नाकारता येत नाही.

दुधाची अॅलर्जी – Milk allergy

काही मुलांना डेअरी प्रॉडक्ट प्रमाणे स्वतःच्या आईच्या दुधाचीही अॅलर्जी असते. मिल्क प्रोटीन्सची अॅलर्जी असल्यामुळे मुलं दूध प्यायल्यावर उलटी करतात आणि त्यांना जुलाबाचाही त्रास जाणवतो. जर तुमच्या मुलांना मिल्क प्रोटीन्सची अॅलर्जी असेल तर बालरोग तज्ञ्ज त्यांना स्पेशल फॉर्म्युला फूड देण्याचा सल्ला देतात. बऱ्याचदा स्तनपान देणाऱ्या मातांना त्यांच्या आहारातून दूध अथवा बाळाला अॅलर्जी असलेले पदार्थ सोडण्याचा सल्ला दिला जातो. 

ADVERTISEMENT

आहार – Diet

सहा महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबतच इतर पदार्थ भरवण्यास सुरुवात केली जाते. ज्यामध्ये गाईचे दूध, डाळीचे पाणी, भरडी, मऊ वरण भात, पेज, भाज्यांचे सूप, केळं अशा पदार्थांचा समावेश असतो. बाळाला अन्नपदार्थ खाऊ घालण्याचा अन्नप्राशन विधीच सहा महिन्यानंतर अनेकांकडे केला जातो. मात्र अचानक आहारात आलेल्या जड पदार्थामुळे बऱ्याचदा मुलांना जुलाबाचा त्रास होतो. कधी कधी मुलांना असे पदार्थ पटकन पचत नाहीत. मात्र कालांतराने पचनशक्ती सुधारल्यामुळे मुलांना आहारातील बदल सहन होऊ लागतात.

दात येणे – Teething

लहान बाळाला दात येत असतील तर त्याला जुलाबाचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. अनेक लहान मुलांना दात येताना जुलाब होण्याचा त्रास होतो. लहान बाळाला साधारणपणे पाचव्या महिन्यापासून एक वर्षापर्यंत दात येतात. दात येताना मुलांच्या हिरड्या शिवशिवू लागतात. ज्यामुळे मुलं चिडचिड करतात आणि मिळेल ती वस्तू तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे खेळणी अथवा खाद्यपदार्थांमधून बाळाच्या तोंडात थेट विषाणू प्रवेश करतात आणि बाळाला जुलाब होण्याची शक्यता वाढते. 

पाच वर्षावरील लहान मुलांना जुलाब होण्याची कारणे | Causes of Diarrhea In Kids In Marathi

पाच वर्षावरील मुलांनाही अनेक कारणांमुळे जुलाब होऊ शकतात. यासाठी जाणून यामागचं कारण ज्यामुळे तुम्हाला उपचार करणं सोपं जाईल.

आजारपण – Illness

लहान मुलं आजारी पडण्याची अनेक कारणं असू शकतात. वास्तविक लहान मुलांची प्रतिकार शक्ती मोठ्यांपेक्षा खूप कमी असते. ज्यामुळे मुलं विषाणू, जीवाणू, बुरशी, संसर्गजन्य आजार असलेली माणसं आणि वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे आजारी पडतात. लहान मुलं पाळणाघर, शाळा, मैदान अशा ठिकाणी संसर्गजन्य माणसं आणि वस्तूंच्या संपर्कात येऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि मुलांना इनफेक्शनमुळे जुलाब होऊ शकतात.

ADVERTISEMENT

प्रवास – Traveling

प्रवासादरम्यान इनफेक्शन झाल्यामुळे मोठी माणसंही सहज आजारी पडतात. तर लहान मुलांना याचा त्रास जास्त लवकर जाणवू शकतो. प्रवासात संसर्ग झाल्यामुळे, चुकीचा आहार केल्यामुळे, अति श्रम झाल्यामुळे, आराम न मिळाल्यामुळे लहान मुलांचे पोट बिघडू शकते. दहा वर्षांच्या खालील मुलांना प्रवास केल्यामुळे जुलाबाचा त्रास झाल्याचे अनेकदा आढळून येते. कारण लहान मुलांना अशा ठिकाणी इनफेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. यासाठीच लहान मुलांसोबत प्रवास करताना पालकांनी खूप सावध असायला हवं.

अन्नपदार्थ – Solid foods

आहारात झालेला बदल लहान मुलांमध्ये लगेच जाणवतो. कारण मोठ्यांपेक्षा लहान मुलांची पचन शक्ती कमजोर असते. त्यामुळे नवीन पदार्थ अथवा एखाद्या पदार्थ अति प्रमाणात खाणं ते पचवू शकत नाहीत. लहान मुलांच्या आहारात पहिल्यांदा दुधाचे पदार्थ, अंडी, ग्लूटेनयुक्त पदार्थ, मांस, मासे, शेंगदाणे, काही भाज्या आल्या आणि त्याची तुमच्या मुलांना अॅलर्जी असेल तर त्यांचे पोट बिघडून जुलाब होण्याचा त्रास सुरू होतो.

अॅंटिबायोटिक्स – Antibiotics

लहान मुलांना जर एखाद्या आरोग्य समस्येसाठी अॅंटिबायोटिक्स देण्यात आली असतील. तर त्यामुळेही काही मुलांना जुलाबाचा त्रास होऊ शकतो. कारण बऱ्याचदा अॅंटिबायोटिक्स घेतल्यावर मुलांच्या शरीरातील विषाणू नष्ट करताना कधी कधी चांगले जीवाणूही नष्ट होतात. ज्यामुळे मुलांचे पोट बिघडून पोटात कळ येणे, जुलाब, उलटी असे त्रास होताना दिसतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे बंद करावी लागतात आणि योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. 

बाळाला जुलाब होत असल्यास घरगुती उपाय | Home Remedies For Infant Diarrhea

तुमच्या बाळाला जुलाब होत असतील तर वैद्यकीय सल्ल्यासोबतच तुम्ही काही गोष्टींची घरी काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे बाळाला जास्त त्रास होणार नाही. 

ADVERTISEMENT

बाळाला भरवणं सोडू नका – Continue Feeding

Lahan Mulanchya julabasathi upay

लहान बाळाला जुलाबाचा त्रास होत असताना सतत भरवणं गरजेचं आहे. कारण जुलाबावाटे बाळाच्या शीमधून शरीरातील पाणी कमी होत असतं. अशामुळे तुमचं बाळ लवकर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. यासाठी जुलाब होत असतानाही बाळाला स्तनपान अथवा पेययुक्त पदार्थ बाटलीतून देणं गरजेचं आहे. बाळाच्या पोटाला आराम मिळेपर्यंत बाळाला भरवणं सोडू नये. कारण बाळाची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्याला इतर आरोग्य समस्या पटकन होऊ शकतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या – Talk to Your Doctor

लहान बाळाला जुलाबाचा त्रास होत असेल तर नवमाता अथवा नवपित्याला नक्कीच चिंता वाटू शकते. म्हणूनच तुम्ही अशा वेळी थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जर तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल तर खरंतर चिंता करण्याचं कारण नाही कारण तुमच्या बाळाचे आईच्या दुधातून पोषण होत असते आणि आईच्या दुधात बाळाचे संरक्षण करणारे घटकही असतात. पण जर तुमचं बाळ बाटलीतून बाहेरचं दूध पित असेल तर त्याला हायड्रेट ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्लानुसार काही स्पेशल फॉर्म्युला देण्याची गरज लागू शकते. 

हायड्रेशनवर लक्ष ठेवा – Watch for Dehydration

लहान बाळाला जेव्हा पण जुलाब होतात तेव्हा चिंतीत होण्यापेक्षा बाळ जास्तीत जास्त हायड्रेट कसं राहिल याची काळजी घ्यायला हवी. कारण डिहाड्रेशनमुळे तुमच्या बाळाच्या आरोग्य समस्येत वाढ होऊ शकते. बाळ लहान असल्यामुळे ते पटकन डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. यासाठी बाळाला सतत स्तनपान द्या, कोमट पाणी, पेज द्या. कधी कधी बाळ डिहायड्रेट होऊ नये यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून सलाइन वाटे हायड्रेट ठेवावं लागू शकतं. यासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला वेळीच माहीत असायला हव्या.

स्वच्छता राखा – Practice Good Hygiene

बाळाला जुलाब होत असताना त्याची योग्य ती स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. कारण जर इनफेक्शनमुळे तुमच्या बाळाला जुलाब होत असतील तर ते इनफेक्शन तुमच्या कुटुंबातील इतर लोकांनाही होऊ शकतं. यासाठीच बाळाचे डायपर बदलल्यावर अथवा बाळाला स्वच्छ केल्यावर तुमचे हात स्वच्छ साबणाने धुवा. बाळाच्या डायपरची  नीट व्हिलेवाट लावा. बाळाचे कपडे, लंगोट स्वच्छ केल्यावर ते डेटॉलमध्ये विसळा आणि सुकल्यावर ते इस्त्री करून ठेवा. तसंच बाळाला पाणी आणि दूध भरवण्याच्या बाटल्या, वाटी, चमचा स्वच्छ आणि निर्जंतूक असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे जीवजंतूंपासून तुमच्या बाळ आणि कटुंबाचे संरक्षण होईल.

ADVERTISEMENT

बाळाच्या त्वचेची निगा राखा – Care for Baby’s Skin

बाळाला सतत जुलाब होत असतील तर त्याचे डायपर तुम्हाला वारंवार बदलावे लागतात. डायपर बदलणे आणि सतत ओलाव्यामुळे बाळाला डायपर रॅशेस होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायपर बदलण्यासोबत बाळाची शीची जागा नीट स्वच्छ करून कोरडी करणं गरजेचं आहे. अशा वेळी बाळाला डायपर रॅशेस क्रीम लावल्यास त्याला आराम मिळू शकतो. बाळाचे डायपर बदलण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. कारण तुमच्या अस्वच्छ हातामुळेही बाळाच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

पाच वर्षांवरील मुलांसाठी जुलाबावर घरगुती उपाय | Home Remedies for Diarrhea in Kids

लहान मुलांना जुलाब सुरू असताना नेमकं काय खायला द्यावं आणि कोणते घरगुती उपाय करावे असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर ही माहिती अवश्य वाचा.

केळं – Banana

Lahan Mulanchya julabasathi upay

मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणालाही घरात जुलाबाचा त्रास होत असताना केळं देण्यास हरकत नाही. लहान मुलांना जुलाब झाल्यावर काय खायला द्यावं असा प्रश्न पडला असेल तर बिनधास्त केळं खाण्यास द्या. कारण केळं हे एक सूपरफूड प्रमाणे काम करतं. कारण केळ्यामुळे तुमच्या मुलांच्या नाजूक आतड्यांना त्रास होत नाही. शिवाय यामुळे आव बांधण्यास मदत होते. केळ्यात पोटॅशियम असल्यामुळे मुलांना त्वरित शक्ती मिळते. पचनशक्ती नॉर्मल करण्यासाठी केळं खाणं फायद्याचं ठरू शकतं.

लाह्या – Puffed Rice

लहान मुलांना जुलाब होत असताना तुम्ही लाह्या खाण्यास देऊ शकता. कारण लाह्यामुळे मुलांची आव बांधली जाते आणि जुलाब कमी होतात. यासोबतच तुम्ही लाह्या पाण्यात भिजवून त्याचे पाणीही लहान मुलांना पिण्यास देऊ शकता. कारण भातापासून बनवलेल्या लाह्यांमध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते. लहान मुलांना जुलाबावर भाताची पेज अथवा लाह्यांचे पाणी पिण्यास देणे हा एक जुना घरगुती उपाय आहे. 

ADVERTISEMENT

सफरचंद – Apple

सफरचंद हे अनेक आजारपणांपासून दूर ठेवणारे एक फळ आहे. यासाठी डॉक्टर नेहमी एक सफरदंच दररोज खाण्याचा सल्ला लोकांना देतात. पण एवढंच नाही सफरचंदामध्ये तुमच्या आतड्यांना आराम देणारे गुणधर्म असतात. म्हणूनच लहान मुलांना जुलाब होत असतील तर सफरचंद खायला देण्यास काहीच हरकत नाही. सफरचंद पाण्यात मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी लहान मुलांना भरवावी. ज्यामुळे त्यांचे जुलाब तर थांबतील पण त्वरित एनर्जीदेखील मिळेल. 

डाळीचे सूप – Lentil Soup

लहान मुलांना घरात दिला जाणारा एक पौष्टिक आहार म्हणजे डाळीचे पाणी… जुलाब होत असतानाही मुलांना तुम्ही डाळीचे पाणी द्यायलाच हवं. कारण त्यामुळे मुलांच्या पचनशक्तीवर जोर न येता त्यांना जुलाबात आराम मिळू शकतो. जुलाबामुळे मुलांची पचनशक्ती कमजोर झालेली असते अशा वेळी शरीराला पोषकमुल्य मिळावीत यासाठी भाताची अथवा डाळीची पेज अथवा पाणी देणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. 

आरारूट पावडर – Arrowroot Powder

आरारूट पावडरचा वापर जुलाब बंद करण्यासाठी केला जातो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात. शिवाय आरारूट पावडरमध्ये अॅलर्जी फ्री घटक असल्यामुळे ती लहान मुलांचे जुलाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बाळाचे शरीर हायड्रेट राहण्यासाठी, त्याचे जुलाब थांबण्यासाठी आणि शरीराला शक्ती मिळण्यासाठी बाळाला दही अथवा पाण्यात आरारूटची पेज बनवून तुम्ही भरवू शकता. 

लिंबू पाणी – Lemon juice

Lahan Mulanchya julabasathi upay

लिंबामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जुलाबावर घरगुती उपाय म्हणून लिंबू पाणी पिणं नेहमीच फायदेशीर ठरतं. जुलाब केल्यामुळे पोटावर खूप ताण आलेला असतो. शरीरातून पाणी कमी झालेलं असतं. अशा वेळी शरीराला पाण्याची खूप गरज असते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. सहाजिकच लहान मुलांना जुलाब होत असताना लिंबू पाणी दिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो. 

ADVERTISEMENT

डाळिंबाचा रस – Pomegranate juice

लहान मुलांना जुलाब झाल्यावर त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी आणि जुलाब थांबण्यासाठी डाळिंबाचा रस देणं नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण डाळिंबामध्ये जुलाब थांबवणारे गुणधर्म असतात. शिवाय रस पिण्यामुळे मुलांच्या पचनशक्तीत सुधारणा होते. यासाठी डाळिंबाचे दाणे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा आणि गाळणीने गाळून तो लहान मुलांना पाजा.

नारळपाणी – Coconut water

जुलाब होत असतील तर मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांना नारळपाणी पिण्यास द्यावे. कारण नारळपाण्यामध्ये सोडियम, पोटॅशिअम आणि मॅग्ननीज असे अनेक इलेक्ट्रोलाइट्स असतात. लहान मुलांच्या नाजूक आतड्यांची निगा राखत त्यांचे पोषण करण्यासाठी नारळपाणी मुलांना देणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. शिवाय नारळपाण्यामुळे तुमच्या मुलांना फ्रेश वाटतेच पण यामुळे जुलाबाचा त्रासही हळू हळू कमी होत जातो. 

लहान मुलांचे जुलाब आणि निवडक प्रश्न – FAQs 

प्रश्न – जुलाब झाल्यास बाळाला डॉक्टरकडे कधी न्यावे ?

उत्तर – तुमचं बाळ जुलाबाने हैराण झालं असेल, दूध पित नसेल, सतत रडत असेल, बाळाला ताप असेल, शीवाटे रक्त येत असेल, जास्त दिवस जुलाब होत असतील तर तुम्हाला बाळाला डॉक्टरांकडे नेणं नक्कीच गरजेचं आहे. कारण अशाने बाळ डिहायड्रेट होऊ शकतं जे त्याच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही.

प्रश्न – लहान मुलांना जुलाबासाठी मोठ्या माणसांची ओषधे द्यावी का ?

उत्तर – मुळीच नाही, कोणत्याही आजारपणात लहान मुलांना मोठ्यांची औषधे देऊ नयेत. काही घरगुती उपाय करण्यास हरकत नाही. मात्र औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्लानुसारच द्यावी.

ADVERTISEMENT

प्रश्न – जुलाबाचा त्रास लहान मुलांना किती दिवस होतो ?

उत्तर – साधारण तीन, चार दिवस अथवा आठवडाभर लहान मुलांना जुलाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र आठवड्याभरात जुलाब थांबले नाहीत तर यामागे एखादे गंभीर कारण असण्याची शक्यता असते. 

Conclusion – बाळ अथवा लहान मुलांना जुलाब होणं ही पालकांसाठी नक्कीच चिंतेची बाब असते. यासाठीच आम्ही लहान मुलांच्या जुलाबावर घरगुती उपाय – Lahan Mulanchi Julab Upay शेअर केले आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. 

27 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT