ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
देशभक्ती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी पाहा हे चित्रपट (Marathi Patriotic Movies)

देशभक्ती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी पाहा हे चित्रपट (Marathi Patriotic Movies)

 

काही सिनेमा हे प्रत्येक वेळी पाहिल्यावर पुन्हा एकदा स्फूर्तीदायक वाटतंच. असंच काहीसं आहे देशभक्तीपर सिनेमांचं. 15 ऑगस्ट असो वा 26 जानेवारी या दोन्ही दिवशी टीव्हीवर हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे देशभक्तीपर सिनेमे. मग ते मराठी असो वा हिंदी असोत. हे सिनेमा कितीही वेळा पाहिले तर या दिवशी पुन्हा नक्कीच पाहावे वाटतात. वीर सावरकरांसारखे विचार असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे आपण आज आहोत. त्यामुळे देशाप्रती असलेलं आपलं प्रेम कायम आहे. त्यामुळे हे सिनेमासुद्धा नेहमीच आपल्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत कायम राहतीलच. 

लोकमान्य एक युगपुरूष (Lokmanya Ek Yugpurush)

 

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आमच्या काळातील शालेय जीवनातील दरवर्षी ठरलेला उपक्रम म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जयंतीला भाषण करणे. लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पेलणं हे मोठं आव्हान होतं. मराठीतील अभिनेता सुबोध भावेने ते लीलया पेलत टिळकांची भूमिका या चित्रपटात साकारली. त्यांचे विचार या चित्रपटात योग्यरित्या मांडण्यात आले आहेत. त्यामुळे टिळकांना जाणून घेण्यासाठी आणि सुबोध भावेच्या अभिनयासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा. 

वाचा – मराठी देशभक्तीची गाणी

वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Phadke)

 

अभिनेता अजिंक्य देव याने या चित्रपटात टायटल रोल केला होता. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित होता. देव यांच्या होम प्रोडक्शनने याची निर्मिती केली असून हा चित्रपट गजेंद्र अहिरेने याचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट 2008 साली आला होता. या चित्रपटातील 18 व्या शतकाचा काळ दाखवण्यासाठी चित्रपटकर्त्यांना बराच रिसर्च करावा लागला होता. या चित्रपटात अजिंक्य देवसोबतच सोनाली कुलकर्णी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

ADVERTISEMENT

वाचा – देशभक्तीपर गीतांनी करा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

क्रांतीवीर राजगुरू (Krantiveer Rajguru)

 

चिन्मय मांडलेकरने या चित्रपटात टायटल रोल केला असून हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी शिवगुरू यांच्या जीवनावर आधारित होता. ज्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा दिला आणि शहीद भगत सिंग यांच्यासोबत ज्यांना फाशी देण्यात आली. हा चित्रपट 2010 साली आला होता. या चित्रपटातील चिन्मयच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. 

१९०९ (1909)

 

हा चित्रपट ब्रिटीश अधिकारी जॅक्सनच्या वधावर आधारित होता. हा चित्रपट 2013 साली आला होता. वैशिष्ट्याची बाब म्हणजे या चित्रपटाचा प्रीमियर खास नाशिकमध्ये ठेवण्यात आला होता. जिथे स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा खून केला होता. या चित्रपटात सर्व नव्या कलाकारांना संधी देण्यात आली होती.

वाचा – प्रसिद्ध मराठी संवाद

ADVERTISEMENT

वीर सावरकर (Veer Savarkar)

 

प्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाची निर्मिती करताना सावरकरांच्या आत्मचरित्र असलेल्या माझी जन्मठेप या पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आला होता. मुख्य हा जगातला पहिला सिनेमा होता ज्याला लोकांच्या देणगीतून फायन्सास करण्यात आलं होतं. या चित्रपटाचा मूहूर्ताचा सीन 1990 साली करण्यात आला मात्र पडद्यापर्यंत हा सिनेमा पोचण्यासाठी 2001 साल उजाडलं. 2012 मध्ये हा सिनेमा गुजराती भाषेतही रिलीज करण्यात आला. 

वाचा – 15 ऑगस्टसाठी खास शुभेच्छा संदेश

२२ जून १८९७ (22 June 1897)

 

हा चित्रपट ब्रिटीश अधिकारी रँडच्या वधावर आधारित होता. जो पुण्याचा असिस्टंट कलेक्टर आणि विशेष प्लेग कमिटीची चेअरमन होता. चाफेकर बंधूनी त्याचा केलेला वध आणि त्यानंतरचे परिणाम यावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाने 1980 सालच्या राष्ट्रीय पुरस्कारात आपली मोहोर उमटवली होती आणि सिल्व्हर लोटसचा बेस्ट फिचर फिल्म हा नॅशनल इंटीग्रेशन आणि सिल्व्हर लोटस बेस्ट डिरेक्शन कॅटेगरीतील पुरस्कार पटकावला होता. 

हीच खरी दौलत (Hich Khari Daulat)

 

या चित्रपटात एका स्वातंत्र्य सैनिक तात्या आणि बापू यांची कथा दाखवण्यात आली होती. हा चित्रपट थेट स्वातंत्र्यलढ्याशी थेट जोडलेला नसला तरी हे कथानक एका स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्यावर आधारित होतं. या चित्रपटात आशा काळे, आशालता, रंजना, रविंद्र महाजनी, यशवंत दत्त, अशोक सराफ, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, अनंत मराठे, अजय सरपोतदार, सतिश रणदिवे आणि गजानन सरपोतदार अशी तगडी स्टारकास्ट होती. 

ADVERTISEMENT

मराठी चित्रपट (New Marathi Movies 2020)

छोटा जवान (Chota Jawan)

 

माणूसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू… जिंकू किंवा मरू हे अजरामर गाणं या चित्रपटात होतं. हा चित्रपट 1962 साली झालेल्या इंडो-चायना युद्धानंतर आला होता. या चित्रपटातील जिंकू किंवा मरू हे गाणं त्याकाळी आणि आजही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आवर्जून गायलं जातं. 

वाचा – प्रजासत्ताक दिवस कोट्स

मराठा बटालियन (Maratha Battalion)

 

देशासाठी अमर झालेल्या वीर जवानांची गाथा सांगणार चित्रपट म्हणजे मराठी बटालियन. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, अलका कुबल आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर याचं दिग्दर्शन केलं होतं नागेश दरक यांनी.

ADVERTISEMENT

मराठी चित्रपट नवीन 2021

पाहू किती रे वाट (Pahu kiti re vat)

 

सैनिकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील सैनिक हो तुमच्यासाठी हे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं अजरामर आहे. हे गदि माडगूळकरांनी लिहीलं असून संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. हा चित्रपट 1963 साली आला होता.

योद्धा (Yoddha)

 

योद्धा हा चित्रपटा स्वातंत्र्यांशी नाहीतर एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सौरभ गोखले, प्रिया बेर्डे, शर्मिष्ठा राऊत आणि अन्वय बेर्डे यांच्या भूमिका होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता

बेस्ट मराठी कॉमेडियन्स (Best Marathi Comedian List In Marathi

ADVERTISEMENT
30 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT