ADVERTISEMENT
home / xSEO
Famous Marathi Dialogues | मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स

Famous Marathi Dialogues | मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स

बॉलीवूड आणि हॉलीवूडची कितीही क्रेझ असली तरी मराठी चित्रपटातील डायलॉग्ज्सची सर त्यांना कधीच येणार नाही. कारण मराठीतील कित्येक डायलॉग्ज्स आजही आठवणीने एकमेकांना बोलले जातात आणि ते ऐकताच चेहऱ्यावर हसू नक्कीच येतं. मग तो नटसम्राट हा चित्रपट असो वा अशी ही बनवाबनवी चित्रपट असो. येत्या मराठी भाषा दिनाची माहिती आणि मराठी भाषा दिन शुभेच्छा सोबत डायलॉग्ज्सही शेअर करता येतील. या लेखात आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत मराठीतल्या नव्या आणि जुन्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्स.

Old Movies Famous Marathi Dialogue | जुन्या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्स

Old Movies Famous Marathi Dialogue
Old Movies Famous Marathi Dialogue

Instagram

मराठीत एकसेएक चित्रपट आहेत ज्यांचे डायलॉग्ज्स आजही आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत. मराठीतील या अजरामर कलाकृती आणि त्यातील संवाद हे अगदी आजच ऐकल्यासारखे वाटतात. चला मराठी जुन्या चित्रपटातील अजरामर डायलॉग्ज्स पाहूया. 

  • धनंजय माने इथेच राहतात का? (अशी ही बनवाबनवी)
  • श्याम जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप. (श्यामची आई)
  • तुम्ही दिलेले चाळीस रुपये पण वारले. (अशी ही बनवाबनवी)
  • शंतनू….(अशी ही बनवाबनवी)
  • आणि या मिसेस बालगंधर्व…(अशी ही बनवाबनवी)
  • अजून बारका नाही मिळाला का ? (शंतनू स्टूल घेऊन येतो तेव्हा ) (अशी ही बनवाबनवी)
  • जाऊबाई…इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई (अशी ही बनवाबनवी)
  • झुरळ… तशी आपल्या ऑफिसमध्ये झुरळ जरा कमीच आहेत. (अशी ही बनवाबनवी)
  • आणि हा माझा बायको..(अशी ही बनवाबनवी)
  • आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे..विश्वास सरपोतदार (अशी ही बनवाबनवी)
  • विश्वास सरपोतदार :- तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? धनंजय माने :- हो.. जे काही ते आम्ही बरोबरच नेऊ, तुम्हाला नाहीतरी त्याचा काय उपयोग (अशी ही बनवाबनवी)
  • दूर व्हा दूर व्हा, सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे ती मी आहे. ज्युलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. (नटसम्राट)
  • टू बी ऑर नॉट टू बी…दॅट इज द क्वेश्चन…जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.(नटसम्राट)
  • कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का? एक तुफान भिंती वाचून छपरावाचून, माणासाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून, डोंगराडोंगरात हिंडत आहे. कुणी घर देता का घर? (नटसम्राट)
  • प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं कधी योग्यता नसताना मिळतं. कधी चूक नसताना निघून जातं. (नटसम्राट)
  • विधाता तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजून ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन करूणाकरा आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे ? (नटसम्राट)
  • ह्याचा सत्कार करा सत्कार. (सरकारनामा)
  • तुमचे सावरता सावरता आमचे निसटायची वेळ आली आहे. (सरकारनामा)
  • अण्णा, तुला हिथं गाडीन. (सरकारनामा)
  • बोकड कापायचंय, बोकड. (सरकारनामा)
  • अशोक सराफ: ही कसली भाजी? निशिगंधा वाड : अंबाड्याची. अशोक सराफ: सगळा अंबाडाच घातला वाटत. (एकापेक्षा एक)
  • बाई वाड्यावर या (पिंजरा)
  • Damit (थरथराट)
  • कवट्याच्या कवटीला काळिमा फासालात… आ थू (थरथराट)
  • आहाईहीउहुएही…..फीसचक…टकलु हैवान (थरथराट)
  • ओम फट स्वाहा हा..(झपाटलेला)
  • डोळे बघ डोळे बघ…(पछाडलेला)
  • बाबा लगीन धीन्गच्याक धीच्यांग…(पछाडलेला)
  • मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर (झपाटलेला)

वाचा – Dumbcharades खेळण्यासाठी हिंदी-मराठी चित्रपट

ADVERTISEMENT

Famous Funny Dialogues In Marathi | मराठीतील विनोदी प्रसिद्ध डायलॉग्ज्स

Famous Funny Dialogues In Marathi
Famous Funny Dialogues In Marathi

Instagram

मराठीतील मुख्यतः जेवढे डायलॉग्ज्स प्रसिद्ध आहेत त्यात जास्तीत जास्त विनोदी डायलॉग्ज्सची संख्या आहे. नजर टाकूया मराठीतील विनोदी आणि प्रसिद्ध डायलॉग्ज्स. 

  • तुला माणूस म्हणावं तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही. (कायद्याचं बोला)
  • कोण नाही कोणचा वरण भात लोणचा (लालबाग परळ)
  • नया है वह ( टाईमपास)
  • मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे (दुनियादारी)
  • माझी लव प्राजू .. साईबाबा शप्पत..आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात, काजू कतली आणि माझी प्राजू पतली!!  (टाईमपास)
  • सस्ती चीजोंका शौक हम भी नही रखते…तुझी माझी यारी मग *** गेली दुनियादारी (दुनियादारी)
  • हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीटसुद्धा तुला सोडवत नाही..बच्चूच आहेस तू….(दुनियादारी)
  • भाग भाग के आय और मौत को समोर पाया… ऐ रिशी पकुर. (दुनियादारी)
  • मेव्हणे मेव्हणे आणि म्हेवण्यांचे पाहुणे. (दुनियादारी) 

वाचा – जागतिक हास्य दिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून

Famous Marathi Dialogues In New Marathi Movie | नव्या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्

Famous Marathi Dialogues In New Marathi Movie
Famous Marathi Dialogues In New Marathi Movie

Instagram

ADVERTISEMENT

मराठीतील जुन्या चित्रपटांसोबतच नवीन आलेल्या चित्रपटांमधीलही अनेक डायलॉग्ज्स लोकांना तोंडपाठ आहेत. पाहूया नव्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग्ज्स. 

  • आपला हात भारी, आपली लात भारी, च्यामायला आपलं सगळंच लई भारी. (लई भारी)
  • मराठीत कळत नाय, इंग्रजीत सांगू? (सैराट)
  • आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय….इंटरव्ह्यू एकदम टॉप..एकदम कडक (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
  • आयुष्य गेलं इथं चौथ्या सीटवर बसून, जरा खिडकीवर बसू. (डोंबिवली फास्ट)
  • जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचे सळसळते रक्त. सर्व क्षेत्रात मराछ्याचा प्रभुत्व प्रस्थापित करा. (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय) 
  • सगळीकडे सगळं शांत आहे. सगळं नॉर्मल, फक्त तू नाहीस. (मंगलाष्टक वन्स मोअर)
  • शेती विकायची नसते हो… राखायची असते. (मुळशी पॅटर्न)
  • चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. (प्रेमाची गोष्ट) 
  • नातं संपलं तरी प्रेम उरतंच. (प्रेमाची गोष्ट) 
  • परिंदो की तरह सोचोगे तो घोसले मे रहोगे सोचो शहंशाह की तरह तो ही ताज बनाओगे. (मोरया) 
  • जर प्रेम संपणारच असेल तर मग ते करायचं कशाला. (मितवा) 
  • नात्यांची मजा ही हळूवार उलगडण्यातच असते. (मुंबई पुणे मुंबई 2) 
  • मुंबई तू पुण्याच्या प्रेमात पडलीस. (मुंबई पुणे मुंबई 2)
  • माणसं कितीही बोचरी, काटेरी असली ना. तरीही माझी म्हटली की, आपलीशी होऊन जातात. सगळी माणसं सगळी आपली माणसं. (हायवे एक सेल्फी आरपार)
  • आवडली मुंबई..आवडायला आधी कळू तर दे…कळायचं काय त्यात सोपी आहे की मुंबई. (डबल सीट)
  • आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला. जो आपल्याबरोबर त्याची स्वप्नं शेअर करेल. (प्रेमाची गोष्ट)
  • तुला माहीत होतं की मी मरणार आहे आणि तरीही माझ्याशी लग्न केलंस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर (दुनियादारी)
  • माझं तर समदर हरवील या धंद्यात आणि ते मला इथचं शोधावं लागलं. (नटरंग) 
  • इच्या मिठीत कापसाला ऊसाचा भाव मिळाल्यावाणी वाटतंय. (पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा)
  • आपल्या लाईनकडे बघणंसुद्धा एक कला आहे, लाईनला पण कळलं पाहिजे की, आपण तिच्याकडे बघतोय. (शाळा)
  • लाजल्यावर मी खूप छान दिसते नं. तू खूप छान लाजतेस. (पुणे मुंबई पुणे)
  • अरे आओ ना.…फिर (प्यारवाली लव्हस्टोरी)
  • आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालंय. (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
  • अपना हो तो चर्चा, नई तो कायको फुकट का खर्चा…(प्यारवाली लव्हस्टोरी)
  • सरस्वती माते मला नाही पाहिलीस ह्या पोरांना तरी पाव ग बाई. (दुनियादारी)
  • लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…(प्यारवाली लव्हस्टोरी)
  • जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही, तोपर्यंत लाल्या होत नाही. (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
  • पहिली सिगरेट आणि पहिला मित्र.(दुनियादारी)
  • आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही, या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे..मी  (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर)
  • मितवा, मित्र, तत्वज्ञ,वाटाड्या,मितवा?…तू माझी ….मी तुझा!!! (मितवा)
  • चांगल्या झाडावर नेहमी माकडे चढतात. (दुनियादारी)
  • चेहरा ओला केल्यावर डोळ्यातील पाणी लपत असा वाटत का तुला? (मितवा)
  • आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा. (दुनियादारी)
  • या जगात बारमध्ये बसायला जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत….(दुनियादारी)
  • लोक रुप पाहतात.आम्ही ह्रदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो…फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!! (दुनियादारी)
  • नात्यांची गरज असावी पण गरजेपुरते नाते नसावे.(दुनियादारी)
  • आपण टाईमपास नाही करत…आपलं सिरीयसली आणि जाम प्रेम आहे तुझ्यावर…(टाईमपास)
  • हम जियेंगे अपनी मर्जीसे और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे…(टाईमपास)
  • आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला !!! (टाईमपास)
  • आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार…. चला हवा येऊ द्या ! (टाईमपास)
  • तू माझ्या बाबांना शकाल म्हणतोस??? (टाईमपास)
  • दगडू…लाईफमध्ये लव नावाचा टाईमपास पाहिजे ! मला वेड लागले प्रेमाचे….(टाईमपास)
  • तुझं हो जराजरी ऐकलं ना तरी दिल धडधड करायला लागलाय रे..! (टाईमपास)
  • याला म्हणतात MM म्हंजे ? मॅरेज मटेरीअल..जे आजकाल गायब होत चाललं आहे. (टाईमपास)
  • प्रेम बरोबर असेन ना तर अख्खं जग जिंकेन आपण. (टाईमपास)

हेही वाचा –

#Dumbcharades खेळण्यासाठी बेस्ट आहेत हे ’60’ हिंदी-मराठी चित्रपट

मराठीतील प्रसिद्ध 125 म्हणी

ADVERTISEMENT

रोजच्या वापरातील हे लोकप्रिय मराठी शब्द तुम्हाला माहीत आहेत का

Famous bollywood dialogue in English

Sasu Sun Funny Jokes In Marathi (सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स)

18 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT