Advertisement

फॅशन

मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार (Black Saree For Sankranti In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jan 9, 2019
मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार (Black Saree For Sankranti In Marathi)

Advertisement

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या भारतीय परंपरेत अनेक सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दरवर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रात हा सण असतो. या काळात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करण्यात येते. मकर संक्रात भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. एकतर नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. मकरसंक्रातपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येते. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांना सेलिब्रेट करण्यासाठी हा सण म्हणजे पर्वणीच असते.

मकर संक्रातीला काळी साडी नेसण्याची प्रथा आहे (Black Saree For Sankranti Custom)

सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रातीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात.

मकर संक्रातीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साड्यांसाठी आम्ही तुम्हाला निरनिराळ्या साड्यांचे पर्याय सुचवत आहोत. ज्या तुम्ही रथसप्तमीपर्यंत अनेक घरगुती आणि सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभांना नेसू शकता. अगदी पारंपरिक साड्यांपासून ते अगदी मॉर्डन डिझाईनर साड्यांपर्यंतचे विविध पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील. या साड्यांचे नंतर ड्रेसही सुंदर दिसतात.

बनारसी साडीची तर बातच न्यारी

कतान सिल्कचा आणखी एक पर्याय

कांचीपुरम साडी

प्युअर सिल्क टसर साडी

1. साड्यांची महाराणी पैठणी (Maharani Paithani Sarees)

‘पैठणी’ ही साडी सर्व महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात या साडीला महावस्राचं स्थान आहे. सर्व साड्यांमध्ये पैठणी साडी ही ‘महाराणी’ म्हणून लोकप्रिय आहे. प्रत्येक महिलेला तिच्या वॉर्डरोबमध्ये कमीतकमी एक तरी पैठणी हवीच असते. या राजेशाही साडीची ओळख तिचा पारंपरिक काठ आणि मोरांची डिझाईन असलेल्या पदरावरुन होते. आता  पैठणीमध्ये विविध प्रकारचे काठ आणि विविध डिझाईन उपलब्ध आहेत. या काळ्या गर्द रंगाच्या पैठणीवर खरंतर कोणताही रंगाचा कॉन्ट्रास्ट उठून दिसेल. पण आम्ही तुम्हाला ही हिरव्या बॉर्डरची पैठणी सुचवत आहोत. या मकारसंक्रांतीला ही साडी आणि हलव्याचे दागिने तुमच्या सौदर्यांत अधिकच भर घालतील.

1. Black Saree For Sankranti In Marathi

Also Read Makar Sankranti Dishes In Marathi

2. बनारसी साडीची तर बातच न्यारी (Banarasi Saree)

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पैठणीला महत्व आहे.त्याप्रमाणेच उत्तर भारतात बनारसी साड्यांना महत्व आहे. मकर संक्रांत संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आम्ही तुम्हाला ही काळ्या रंगाची आणि फुलांची मोठी डिझाईन असलेली बनारसी साडी सूचवत आहोत जी तुम्हाला अशा सणाच्या वेळी शोभून दिसेल.

2. Black Saree For Sankranti In Marathi

3. कतान सिल्क आणि पदरावरील गंगा घाट (Cotton Silk And Ganga Ghat)

ज्यांना बनारसी साड्या आवडतात मात्र जास्त वजन असल्याने त्या पेलवत नाहीत अशा महिलांसाठी कतान सिल्क साडी अगदी उत्तम पर्याय ठरेल. कारण या साड्या वजनाने हलक्या असतात. आता हीच साडी पहा…या काळ्या रंगाच्या कतान सिल्कवर बनारसचा ‘गंगा घाट’ असलेला पदर तयार केला आहे. अगदी हटके लुकची ही साडी तुम्ही या मकर संक्रातीसाठी नक्कीच निवडू शकता.

3. Black Saree For Sankranti In Marathi

वाचा – संक्रांतीचे महत्त्व

4. कतान सिल्कचा आणखी एक पर्याय (Alternative Cotton Silk)

कतान सिल्कमध्येच हा आणखी एक पर्याय या साडीच्या पदरावर मीनावर्क केलेलं आहे..त्यामुळे थोड्या वेगळ्या डिझाईनची ही कतान सिल्कदेखील तुम्हाला नक्कीच आवडेल.

4. Black Saree For Sankranti In Marathi

5. कॉटन सिल्क चंदेरी साडी (Cotton Silk Chanderi Saree)

चंदेरी साडी अनेकजणींसाठी अगदी जीव की प्राण असते. मात्र या साडीला खूप जपावं लागतं कारण ती खूपच नाजूक असते. काळ्या रंगाची ही  चंदेरी सिल्क साडी नेसल्यास, तुम्हाला जास्त वजनदारदेखील वाटणार नाही आणि तुम्ही ही साडी नेसून कार्यक्रमाचं आकर्षणदेखील होऊ शकाल.

5. Black Saree For Sankranti In Marathi

6. कांचीपुरम साडी (Kanchipuram Saree)

साड्यांमध्ये कांचीपुरम अथवा कांजीवरम साडीचंदेखील एक वेगळंच स्थान आहे. कांजीवरम साडी प्रत्येकालाच आपल्या वॉर्डरोबमध्ये असावी असं वाटतं. बऱ्याच कार्यक्रमामध्ये अथवा सणांसाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही सणाला ही साडी नक्कीच नेसू शकता. या साड्यांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र ही काळ्या रंगाची कांजीवरम तुम्हाला खूप शोभून दिसेल. गडद रंग हे कांजीवरम साड्यांचं वैशिष्ट्य आहे.

6. Black Saree For Sankranti In Marathi

7. मदुराई सिल्कसाडी (Madurai Silk Saree)

दक्षिणेकडील कांचीपुरम साडीप्रमाणे मदुराई सिल्कदेखील साड्यांमधील एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना हलक्या वजनाच्या साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी ही साडी अगदी उत्तम आहे. या साडीच्या पदरावरील गोल्डन कलरच्या लोटस डिझाईनमुळे या साडीला एक वेगळा लुक आला आहे. शिवाय या कमळामुळे साडीची शोभाही वाढते.

7. Black Saree For Sankranti In Marathi

8. प्युअर सिल्क टसर साडी (Pure Silk Taser Saree)

काळ्या रंगाची आणि गोल्डन टेम्पल बॉर्डरच्या या साडीचा लुक अगदी रॉयल वाटतोय. मकर संक्राती व्यतिरिक्त एखाद्या इव्हनिंग पार्टीसाठीदेखील ही साडी अगदी शोभून दिसेल. मात्र या साडीवर ब्लाऊज मात्र अगदी स्टाईलिश घालायला हवा.

8. Black Saree For Sankranti In Marathi

9. टसर सिल्क विथ कांथावर्क (Taser Silk With Kanthavark)

अनेक जणींना कांथावर्कचं आकर्षण असतं. जर तुम्हालाही कांथा डिझाईन आवडत असतील तर सिंपल टसर सिल्क साडीवरील कांथावर्क केलेली साडी तुम्ही या मकर संक्रातीसाठी नक्कीच निवडू शकता.

9. Black Saree For Sankranti In Marathi

10. टसर सिल्क विथ मुंगा वर्क (Taser Silk With Coral Work)

टसर साडीवर मुंगा वर्क केलेला साडीचा हा पर्याय देखील उत्तम आहे. मुंगा वर्क हातामागावर करण्यात येतं. या साडीचा बारीक कलाकुसर केलेला हा गोल्डन रंगाचा पदर या साडीला लुक अधिकच खुलवत आहे.

10. Black Saree For Sankranti In Marathi

11. हॅन्डवूव्हन सिल्क साडी (Handwollen Silk Saree)

हातमागावर तयार केलेली ही सिल्क साडी देखील अगदी हटक्या लुकची आहे. या साडीची चेक्स बॉर्डर या साडीचा लुक आणखी खुलवत आहे.

11. Black Saree For Sankranti In Marathi

12. चेक्स डिझाईन साडी (Checks Design Saree)

काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे चेक्स डिझाईन असलेली ही साडीदेखील तुम्हाला अगदी वेगळाच लुक देईल. या साडीवरील पिंक बॉर्डर या साडीच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.

12. Black Saree For Sankranti In Marathi

13. रॉ सिल्क साडी (Raw Silk Saree)

रॉ सिल्क साडीमुळे एक रॉयल लुक तुम्हाला मिळू शकतो. ज्यांना रॉ सिल्क साड्या आवडतात त्यांच्यासाठी या मकर संक्रातीला हा एक उत्तम पर्याय असू शकेल. या साडीवर मस्त स्टाईलिश ब्लाऊज असायला हवा.

13. Black Saree For Sankranti In Marathi

14. काळ्या आणि फ्रेश निळ्या रंगाची साडी (Black And Fresh Blue Saree)

सिल्कचा तलम पोत असलेली आणि फ्रेश क्रॉन्स्ट्रास्ट असलेली ही साडी देखील संक्रातीसाठी एक चांगला पर्याय ठरेल.

14. Black Saree For Sankranti In Marathi

15. कॉटन साडी (Cotton Saree)

जर तुम्हाला सिल्क साडी नको असेल तर या संक्रातीसाठी अगदी हलक्या कॉटनची पटोला डिझाईन बॉर्डर साडीदेखील छान पर्याय ठरेल.

15. Black Saree For Sankranti In Marathi

कॉटन अथवा गर्भरेशमी इरकल साड्यादेखील संक्रांतीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतील. पण जर तुम्हाला काठापदराच्या सिल्क अथवा कॉटनच्या साड्या नको असतील तर आम्ही तुम्हाला  डिझानर साड्यांचे काही पर्याय देत आहोत.

16. जॉर्जेट आणि डिझानर ब्लाऊज (Georgette And Designer Blouse)

काळ्या रंगाची जॉर्जेट साडी आणि लाल रंगाचं डिझानर ब्लाऊज तुमच्यावर खूपच खुलून दिसेल.

16. Black Saree For Sankranti In Marathi

17. डिझानर साडी (Designer Saree)

कंगना राणावत सारखा हा मॉर्डन लुक तुम्हाला हवा असेल तर या डिझानर जॉर्जेट साडीचादेखील पर्याय उत्तम ठरेल.

17. Black Saree For Sankranti In Marathi

 18. डिझानर साडी (Designer Saree)

माधुरीने नेसलेली ही साडीदेखील तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल

18. Black Saree For Sankranti In Marathi

आम्ही तुम्हाला संक्रांतीसाठी अगदी पारंपरिक काठाच्या साड्यांपासून ते मॉर्डन लुकपर्यंत विविध पर्याय दिले आहेत. या संक्रांतीला तुम्ही त्यातील कोणतेही प्रकार निवडू शकता. नटून-थटून सण साजरा करण्यासाठी…तिळगूळ खाऊन सुदृढ राहण्यासाठी

मकारसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

अधिक वाचा:

साडी नेसताना या ’14’ चुका टाळा आणि  म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व…

नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये

फोटोसौैजन्य- इन्स्टाग्राम