पैशांचे नियोजन हे सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे असते. सगळ्या गोष्टींचा आव आणता येतो पण पैशाच्या आव आणता येत नाही. त्यामुळे असलेला पैसा नीट वापरणे हेच आपल्या हातात असते. पैशांचे नियोजन हे सगळ्या बाबतीतच कधी ना कधी बिघडते. अचानक येणारे खर्च आणि होणारे शुभकार्य यासाठी कधी पैसा लागेल सांगता येत नाही. त्यामुळे पैशांचे नियोजन करणे हे देखील महत्वाचे असते. नवीन वर्षात पैशांचा मेळ बसावा यासाठी तुम्ही कसे नियोजन करायला हवे हे अनेकदा आम्ही सांगितले आहे. पण नव्या वर्षात तुम्ही नेमकं काय करायला हवं ते जाणून घेऊया. ज्यामुळे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने मिळतील.
घरगुती खर्चासाठी महिन्याचे बजेट ठरवताना फॉलो करा या सोप्या टिप्स
सुरु करा RD
तुमचा पगार हा मोजकाच असेल तरी देखील तुम्ही महिन्यातून एक ठराविक रक्कम तुम्ही वेगळी काढायला हवी. एखादी रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवली आणि ती RD मध्ये गुंतवली की, त्यावर काही ठराविक व्याज मिळत राहते. साधारण वर्षभर किंवा त्याहून अधिक काळासाठी हा पैसा गुंतवला तर त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. जर तुम्ही अशापद्धतीने पैसे गुंतवले तर तुम्हाला वर्षातून एखादी पिकनिक करणे बरं पडेल. वर्षभऱातून कुठेतरी बाहेर जाण्याचे तुमचे प्लॅन असतीलच.
उदा. तुम्ही 1 हजार रुपये बाजूला काढू ठेवत असाल तर वर्षाला तुम्हाला 12 हजार आणि त्यावर काही रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्हाला वापरता येईल.
अचानक वाढलेल्या खर्चामुळे झाला असाल हैराण, या सोप्या टिप्सने करा बचत
एकतरी FD
वर केलेली तरतूद केल्यानंतर तुमचा जो पैसा जमला असेल तो तुम्ही फ्रिज करुन ठेवू शकता. म्हणजेच त्याची FD करु शकता. एखादी रक्कम तुम्हाला खूप वर्षांसाठी ठेवली तर त्याचे व्याज जमा होत राहते. अशा तुम्ही बऱ्याच FD करु शकता. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असेल तर ते घेता येते. इतकेच नाही. जर ही रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तीन महिन्यांनी वगैरे याचे व्याज घेता येते. या व्याजावर देखील तुम्हाला तुमचा खर्च करता येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ही सोय नक्की करुन ठेवा.
म्युच्युअल फंड
खूप जणांना या माध्यमाची खूप भीती वाटते. पण योग्य सल्लागार असेल तर तुम्हाला यामध्ये पैसा गुंतवायला काहीच हरकत नाही. यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला ठराविक रक्कम दरमहिन्याला काढायची असते किंवा एक लमसम रक्कम बाजूला काढायची असते. ती रक्कम तुम्हाला काही वर्षांसाठी गुंतवायची असते. याचे मिळणारे रिर्टन्स हे खूप चांगले असतात. त्यामुळे योग्य माणसाची निवड करुन तुम्ही त्याच्याकडे पैसे गुंतवा.
खर्चांचे करा नियोजन
पैसा गुंतवायचा असे जरी आपण म्हटले तरी देखील पैसा गुंतवताना काही गोष्टी माहीत असायला हव्यात. तुमच्या मिळकतीचा किती पैसा तुम्ही गुंतवू शकता याचा अंदाज देखील तुम्हाला घ्यायला हवा. तुमचा महिन्यातला खर्च आणि त्यानुसार तुम्ही त्यातून किती पैसे वाचवता आणि किती घालवू शकता याचा अंदाज घ्या.म्हणजे तुम्हाला किती पैसा वाचवायचा आणि गुंतवायचा हे तुम्हाला कळू शकेल.
आता नवीन वर्षात मालामाल होण्यासाठी नक्कीच अशा प्रकारे पैशांचे नियोजन करुन बघा.