ADVERTISEMENT
home / मनोरंजन
reena madhukar

‘ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती

नवरात्री… स्त्री शक्तीचा सण… प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या आदिशक्तीचा सण! 9 दिवसांत देवींच्या 9 रुपांची पूजा, (नवरात्रीची माहिती) उपासना केली जाते. या सणाच्या निमित्ताने स्त्रियांच्या स्त्रीपणाचा आदर केला जातो, अनेकजण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याविषयी वाटणारा आदर व्यक्त करतात. ज्या शक्तीची पूजा संपूर्ण देशात केली जाते ती शक्ती, आदिशक्ती आपल्या सोबतच आहे… मग ती शक्ती आईच्या रुपात असो किंवा बहिण, मैत्रिण, बायको असो. अभिनेत्री रीना मधुकरने देखील ‘तिच्या आयुष्यातील तिची शक्ती कोण ज्या तिच्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्या तिच्यासाठी सकारात्मक ऊर्जा नक्की कोण आहेत हे सांगितले आहे. तसंच नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

रीनाची आदिशक्ती

रीनाची ‘आदिशक्ती’ कोण या विषयी व्यक्त होताना रीना सांगते की, ” “तुला ज्याची आवड आहे ते तू कर, मी आहे तुझ्या सोबत आणि एवढं मात्र लक्षात ठेव की कधी ही कोणावर अवलंबून राहायचं नाही”, आईच्या या दोन वाक्यांनी मला नेहमी धीर यायचा. मला डान्सची प्रचंड आवड आणि त्यात बाबांचा विरोध, त्यांच्यामते मी घरातल्यांसारखं डॉक्टर, इंजिनिअर व्हावं पण माझी आवड आईला कळली होती आणि “तिला जे मनापासून करावंसं वाटतयं ते तिला करू द्या, ती जिथे कुठे शिकायला, प्रॅक्टिसला जाईल तिथे मी तिच्या सोबत असेन”, असं समजावून आईने बाबांना विश्वासात घेऊन त्यांची परवानगी मिळवली. त्यानंतर मी आईच्या पाठिंब्यामुळे कला क्षेत्रात आले. माझी आई खूप स्वावलंबी आहे आणि तिने तिची ही शिकवण मला आणि माझ्या बहिणीला ही दिली. ‘कोणावर ही अवलंबून राहू नये’ हा कानमंत्र तिने आम्हाला दिला जो खरंच उपयोगी पडला. या वयातही आई टेक्नॉलॉजीसोबत जुळवून घेते, ‘मला यातलं काही कळत नाही’ असं तिचं कधीच म्हणणं नसतं… ‘गोष्ट नवीन आहे तर मी ती शिकून घेईन आणि स्वतः वापर करेन’ हा जो तिचा स्वभाव आहे तो मला प्रचंड आवडतो आणि आपसूक तिचे हे गुण आणि संस्कार आमच्यावर झाले त्यामुळे ‘आई’ ही माझी खऱ्या अर्थाने ‘शक्ती’ आहे.

अधिक वाचा – Bigg Boss 15 : मायशा आणि इशानने केली हद्द पार, नवा व्हिडिओ व्हायरल

खऱ्या आयुष्यातही रीना सानिकाप्रमाणे 

पुढे रीना सांगते, “‘मन उडू उडू झालं’ मालिकेत ‘मनमोकळेपणाने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगणारी’ सानिका तुम्ही पाहिली आहे खऱ्या आयुष्यात तशीच मी आहे आणि जशी दीपिका आहे तशी माझी सख्खी बहिण रूपा आहे. मी जरी मोठी असली तरी रूपा अगदी मालिकेतल्या दीपिका सारखी आहे… *समंजस, शांत, सर्वांना सांभाळून घेणारी, जेव्हा आई आणि माझ्यामध्ये _तू तू मैं मैं_  होतं तेव्हा मध्यस्थी घेणारी रूपा…!* तिचं आणि माझं नातं फार सुंदर आणि मैत्रिणी सारखं आहे. वयाने मी तिच्या पेक्षा जरी मोठी असली तरी ती माझं काही चुकलं, *अगदी सुरुवातीपासून माझा एखादा सीन तिला नाही आवडला किंवा अपेक्षेप्रमाणे तो नीट नाही झाला की ती मोकळेपणाने “मला हा सीन नाही आवडला, यापेक्षा जास्त चांगला होऊ शकला असता” असं थेट सांगते.*

ADVERTISEMENT

थोडक्यात काय तर ती माझी बेस्ट समीक्षक आहे. इतकेच नव्हे तर शाळेत असताना माझे कोणाशी वादविवाद झाले तर छोटी बहीण येऊन सर्व सांभाळून घ्यायची. असं आहे आमचं नातं… ती माझी शक्ती आहेच पण तिच्यातले दोन गुण जे मला जास्त प्रेरित करतात ते म्हणजे तिचं कामा प्रती असलेलं ‘डेडीकेशन आणि चिकाटी’. ‘आई’ आणि ‘बहीण’ यांच्या रूपातून रीनाला दोन शक्तींची साथ मिळाली आहे.

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT