Advertisement

Uncategorized

Bigg Boss 15 : मायशा आणि इशानने केली हद्द पार, नवा व्हिडिओ व्हायरल

Leenal GawadeLeenal Gawade  |  Oct 12, 2021
मायशा आणि इशाल

Advertisement

 Bigg Boss 15  आता दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होऊ लागला आहे.  अगदी पहिल्या दिवसापासून या घरात भांडण दिसून आली आहेत. प्रतिक विरोधात आपण सगळ्यांना पाहिले आहे पण आता या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. एक नवा आलेला व्हिडिओ सध्या सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरला आहे. घरात प्रेम होताना प्रेमाच्या काही बॉन्ड्रीज पार केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मायशा आणि इशानच्या घरातील त्या व्हिडिओमुळे सध्या हे दोघे आणि हा रिॲलिटी शो सध्या ट्रोल होऊ लागला आहे.

Bigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’

मायशा आणि इशान झाले ट्रोल

 घरात इशान आणि मायशा एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत. त्यांचा एकमेकांसोबतचा संपर्क आता वाढत चालला आहे. अशातच त्यांना आता एकमेकांसोबत प्रेम झालेले दिसत आहे. घरात त्यांचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघे एका बेडवर दिसत आहेत. ज्यामध्ये ते एकमेकांच्या फारच जास्त जवळ आलेले आहेत. त्यांना एकत्र आणि आक्षेपार्ह अशा परिस्थितीत पाहिल्यामुळे आणि चॅनेलने त्यांच्या टीआरपीसाठी हा व्हिडिओ सतत दाखवल्यामुळे ही दोघं आणि आता हा शो ट्रोल होऊ लागला आहे.  मायशा आणि इशानचा हा असा व्हिडिओ दाखवून चॅनेलला टीआरपी मिळवायची आहे. इतकेच नाही तर मायशा आणि इशानला देखील उगाचच पब्लिसिटी स्टंटसाठी हे सगळे केले आहे. असे देखील म्हटले जात आहे.

असा व्हि़डिओ दाखवताना सेन्सॉर बोर्ड करते काय?

भारतात अजूनही अशाप्रकारची दृश्य उघड उघड दाखवण्याला बंदी आहे. असे असतानाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ दाखवणे एक प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे. टीव्ही आणि हा शो लहान मुले कुटुंबासोबत पाहतात. अशावेळी या गोष्टी दाखवणे हे कितपत योग्य असा सवाल अनेकांनी केला आहे. इन्स्टाग्रामवर आणि सगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डावर सगळ्यांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Bigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा

बोले तो एकदम राडा

बिग बॉस हिंदीच्या घरात राडे हे जास्त होतात. नुकताच वीकेंडचा वार झाला. यामध्ये अनेकांची चांगलीच काढण्यात आली आहे. प्रतीक सेहजपाल याने आल्या आल्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ओटीटीमधून आलेला प्रतीक हा घऱात कारण नसताना भांडणं करत आहेत. पण घरातील उरलेले सगळे जण प्रतीकवर भारी पडत आहेत. प्रतीकने पहिल्याच आठवड्यात अनेकांशी पंगा घेतल्यामुळे खूप जण त्याच्याविरोधात झाले आहे. प्रतीकने प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे अनेकांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे आता या घरात बोले तो एकदम राडाच सुरु झाला आहे.

जय भानुशालीलाही मिळाले डोस

 या वीकेंडच्या वारमध्ये जय भानुशालीला देखील चांगलाच डोस देण्यात आला आहे. अगदी पहिल्याद दिवसापासून  या खेळात राहण्यासाठी तो कारण नसताना काही पंगे घेताना दिसत आहे. जय भानुशालीने प्रतीकसोबत चांगलीच भांडणे केली आहेत. इतकेच नाही तर हातापायीवर काही गोष्टी आल्या आहेत. ज्यामुळे जय भानुशालीची इमेज खराब होताना दिसत आहे ,असे सलमानने सांगितले आहे. 

आता या नव्या लव्हस्टोरीचे नेमके काय होणार? हे पाहावे लागेल.

Bigg Boss 15: हा स्पर्धक घेतो सर्वाधिक मानधन, थक्क व्हाल