Advertisement

बिग बॉस

Bigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 11, 2021
bigg-boss-marathi-season-3

Advertisement

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या तिसऱ्या हंगामात पहिल्या दिवसापासून राडे सुरू आहेत आणि त्यामध्ये भर घालण्यासाठी आता एंट्री घेतली आहे ती म्हणजे अभिनेता आदिश वैद्यने (Adish Vaidya). आदिशने काही दिवसांपूर्वीच उत्तम टीआरपी असणारी मालिका ‘गुम हे किसी के प्यार में’ ही मालिका सोडली. त्यामुळे आदिश चर्चेत होता. पण अचानक आदिशला बिग बॉस मराठीच्या प्लॅटफॉर्मवर पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का बसला आहे. त्यातही आदिशने पहिल्याच दिवशी आपण इथे टिकण्यासाठी आलो आहोत हे दाखवून दिले आहे. सोशल मीडियावरही आदिशला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. एका बाजूला अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) घराबाहेर झाला तर आदिशने दणक्यात वाईल्ड कार्ड एंट्री केलेली दिसून येत आहे. 

अधिक वाचा – अभिनेत्री रकुलप्रीतने निवडला आयुष्याचा जोडीदार, केले सोशल मीडियावर जाहीर

आदिशला मिळाल्या आहेत काही पॉवर

शनिवार आणि रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळा घेतली. तर आदिशने दणक्यात एंट्री केली आहे. घरात जाताना आदिशला काही पॉवर मिळाल्या असून याच्या मदतीने आदिश घरातील तीन सदस्यांना रात्रीचा पहारेकरी बनवू शकणार आहे. त्याशिवाय घरातील सदस्यांना काम वाटण्याचा अधिकारही त्याला मिळाला आहे. आदिशच्या येण्याने सर्वांनाच घरात धक्का बसला असून पहिल्याच दिवशी जय दुधाणे (Jay Dudhane) आणि आदिशमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाला आहे. प्रोमोमध्येदेखील आदिश आणि जयचा हा राडा दाखविण्यात आला होता. ‘फाल्तू अॅटिट्यूड मला दाखवयचा नाही. बॉडी बिडी काय असेल ती दुसऱ्यांसमोर दाखव’ असं बिनधान्सत जयला सांगत आदिश जयला पहिल्याच दिवशी भिडला आहे. तर जयदेखील आदिशवर चांगलाच उखडलेला दिसून आले. 

इतकंच नाही तर स्नेहा वाघशीदेखील आदिशची शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली आहे. जय आणि आदिशच्या भांडणानंतर ‘आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. आमचे तीन लोक जखमी केले’ असा टोमणा स्नेहाने आदिशला मारला. दरम्यान आदिशच्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे सर्वांचेच धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. तर आदिशने आल्या आल्या दिलेला दणका सर्वांनाच जबरदस्त लागला आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : जय-स्नेहामध्ये ‘कुछ तो गडबड है’

दोन ग्रुपमध्ये आदिश कुठे जाणार?

दुसऱ्या आठवड्यापासून दोन ग्रुप झालेले प्रेक्षकांना दिसून येत आहे. स्नेहा, मीरा, गायत्री, जय असा एक गट तर विकास, विशाल, मीनल, सोनाली असा एक गट नेहमी दिसून येत आहे. तर आता आदिश नक्की कोणत्या गटामध्ये सामील होणार की आपलीच काही वेगळी खेळी खेळून या स्पर्धकांमध्ये अधिक फूट पाडणार याचीच उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आदिश आता नक्की कोणाकोणाशी पंगा घेणार याचीच उत्सुकता आहे. तर या प्रोमोनंतर आणि भागानंतर प्रेक्षकांनी मात्र आदिशला पाठिंबा द्यायला सुरूवात केली आहे. जय आणि मीराची मुजोरी अति झाली असून कोणीतरी त्यांना जमिनीवर आणायलाच हवं अशा आशयाचे ट्विट्स आणि कमेंट्स सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जय एक चांगला खेळाडू असला तरी तो चुकीच्या बाजूने खेळत असल्यामुळेच जयला हा रोष पत्करावा लागत आहे असंही दिसून येत आहे. त्यामुळे आदिशने विकास आणि विशालशी मैत्री करून या खेळात अधिक रंगत आणावी असाही कल प्रेक्षकांचा दिसून येत आहे. आता आदिश नक्की कसा खेळणार हे येणाऱ्या भागात कळेलच. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक