आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख हे आलंच. पण आयुष्य जगताना तुम्हाला जर दुःखात बुडून आणि सुखाने हुरळून जायचं नसेल तर प्रत्येकाला या आयुष्याची योग्य गोळाबेरीज जमायला हवी. यासाठी प्रत्येकाच्या जीवनात क्षणोक्षणी पडायला हवी, मनोरंजनाची तडतडीत फोडणी! कारण मनोरंजन हे असं एक माध्यम आहे जे तुम्हाला सतत आनंदी आणि उत्साही ठेवतं. मनोरंजनाचा एक महत्त्वाचा एक भाग म्हणजे विनोद… कारण विनोदामध्ये दुःख, अपयश पचवण्याची ताकद तर आहेच शिवाय समोरच्या व्यक्तीला आनंदी करण्याचं रहस्यही यात दडलेलं आहे. एकदा आयुष्य असं मजेत जगायला शिकलं की समोर कोणतंही आव्हान असू दे आयुष्य नेहमी सुंदरच वाटतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत असेच काही (marathi funny comments) मजेशीर विनोदी कंमेट्स… जे वाचाल तर तुमचा प्रत्येक दिवस आनंदाचा आणि जल्लोषाचा असेल.
Marathi Funny Comments For Friends | मित्रांसाठी मराठीतून विनोदी कंमेट्स
प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचे स्थान हे महत्त्वाचे असते. अशा प्रेमळ आणि खोडकर मित्रांसाठी मजेशीर विनोदी कंमेट्स (funny comments in marathi)
1. झाडाखाली प्रेम करा झाडावर नको.
2. गर्लफ्रेंडला रडवू नका कारण डोळे पुसणारे भरपूर जण असतात.
3. मुर्ख असल्याचं सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातपण घाई करतात.
4. हिवाळ्यात रोज मन अंघोळ करायची गरज नाही फक्तस मन स्वच्छ ठेवा.
5. मी रोज साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो कारण मला डॉक्टरने दररोज शूगर चेक करायला सांगितली आहे.
6. नेहमी हसत खेळत राहा काय माहीत घरचे कधी तुमचं लग्न लावतील.
7. लॉकडाऊनचं दुःख त्यांना विचारा ज्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि लॉकडाऊननंतर घरातच अडकले होते.
8. पुरूष हा लग्नाआधीपण वाघ असतो आणि लग्नानंतही वाघच असतो. फक्त लग्नानंतर दुर्गादेवी त्या वाघावर बसलेली असते.
9. माझ्या स्वभावात बदल झाला तर वाईट वाटून घेऊ नका, कारण लोकांच्या वागण्यात झालेला बदल मी मोठ्या मनाने अॅक्सेप्ट केला आहे.
10. जेव्हा पासून बुलेटमध्ये सेल्फ स्टार्टर आले आहेत, तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोकपण बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत.
60+ Funny Jokes In Marathi | भन्नाट मराठी जोक्स | Marathi Comedy Jokes
Facebook Funny Comments In Marathi | फेसबूकसाठी विनोदी कंमेट्स मराठीतून
सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे काही मजेशीर विनोदी कंमेट्स (marathi comedy comments)
1. लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येवोत, हवा तर फक्त खाली झोपून नागीण डान्स करणाऱ्याचीच होते
2. चार वर्षांनी एक्सला मेसेज केला, कशी आहेस? तर तिकडून रिप्लाय आला, अंकल मम्मीने लग्न केलं आहे तुम्ही पण करून घ्या.
3. दुकानदार – कशी साडी दाखवू, महिला – शेजारीण जळून मेली पाहिले अशी दाखवा.
4. काही जण मोबाईलला एवढा अवघड पॅर्टन ठेवतात, जसं काय देशाच्या सर्व गुप्त फाईल्स यांच्याकडेच आहेत.
5. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो… आता हेच पाहा ना कान एवढे मोठे नसते तर आता मास्कसाठी खिळे ठोकावे लागले असते.
6. लाखमोलाचा सल्ला कोणी दिला तर आम्ही त्याची परफेड कोटीमध्ये करतो.
7. जिकणं तर माझ्या रक्तातच आहे कारण हरणं तर जंगलात राहतात.
8. कलयुगाचे पर्व आहे कारण इथे प्रत्येकालाच गर्व आहे.
9. दुनियेतील सर्वात अवघड काम म्हणजे बिनडोक मित्रांना सांभाळणे.
10. माझा दिनक्रम खाल्यावर झोपणे आणि भूक लागल्यावर उठणे.
Friendship Day Quotes In Marathi – मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस
Mumbai-Pune Marathi Comedy Comments | मुंबई- पुणे मराठी विनोदी कंमेट्स
मुंबई आणि पुणे ही शहरं आणि इथे राहणारी माणसं यावर आजवर अनेक विनोद झाले आहेत. त्यामुळे मराठी माणसांसाठी हा एक मनोरंजनाचा एक छान पर्यायच आहे म्हणायला हरकत नाही.
1. पुणे ही मुंबईची सख्खी धाकटी सुंदर बहीण आहे. कारण पाहायला सगळे थोरलीला येतात आणि पसंत धाकटीला करतात.
2. तोंडाला स्कार्फ बांधलेल्या मुलीला पण जो बरोबर ओळखतो तो खरा पुणेकर
3. लोकांना डोक्यावर घेऊ नका मान लचकेल
4. आयुष्यातून दुःखाला असे दुर्लक्षित करा जसे तुम्ही मुंबईत पाणीपुरी वाल्याच्या अर्धवट धुतलेल्या प्लेटला करता
5. जेव्हा तुम्हील पुण्यातील लोकांना पत्ता विचारता तुमची पावलं पण कन्फ्युज होतात
6. मुंबईत जर लोकांना सहा फुटाचं अंतर राखावं लागलं तर अर्धी लोकं पुण्यात पोहचतील
7. पुणेकर जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून निघून जातात
8. प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतःचं मत नसेल तर तुम्हाला पुण्यात प्रवेश नाही
9. मुबंईतून पुण्यात गेल्यावर नेमकं काय घडतं…तापमानात घट आणि अपमानात वाढ
10. पुण्यात पुणेकर वडापावला चटणी लावत नाहीत कारण ती जन्मापासूनच त्यांच्या जीभेवर असते
वाचा – Best Fishpond In Marathi
Marathi Funny Shayari Comments | विनोदी शायरी कंमेट्स मराठीतून
कविता, चारोळी आणि शायरीच्या माध्यमातूनही इतरांचे निखळ मनोरंजन करता येते यासाठीच शेअर करा या विनोदी शायरी कंमेट्स मराठीतून (marathi funny shayari comments).
1. तुम्ही कुठेतरी खूप घाईघाईने बाहेर जाता आणि अचानक काळी मांजर आडवी जाते…. याचा अर्थ मांजरीला तुमच्यापेक्षा जास्त घाई असते.
2. आपल्या दोघांमध्ये एवढी गॅप का, एकतो मी बंदिशी तू रॅप का, राहतो तुझ्या ह्रदयात मी पण ती शोधते आहेस गुगल मॅप का
3. प्रेम हा असा सातवा सेंस आहे तो इतर सहा सेंसला उद्ध्वस्त करतो.
4. एक तारखेला पगार आला पगार आला… दुसऱ्या दिवशीपासून पगार गेला,पगार गेला.
5. दिलवाले तर फक्त दुल्हनिया ले जाते है… दिमागवाले तिच्या मैत्रिणीचा पण नंबर मागतात.
6. आयुष्याच्या वाटेवर अनेक काटे लागतील… पण तू घाबरू नकोस… तू फक्त मला कॉल कर मी तुला चप्पल घेऊन देईन.
7. माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका कारण मी मनातल्या मनात पण शिव्या देऊ शकतो.
8. आळसाचे दुसरे नाव रविवार आणि अन्यायाचे दुसरे नाव सोमवार.
9. नाही कळले कधी जीव वेडावला… तिच्या मागे लागून मी वेळ गमावला.
10. अर्ज किया है… आता बघू नोकरी मिळते का.
Funny Marathi Comments For Instagram | इंन्स्टाग्रामसाठी मराठी विनोदी कंमेट्स
सोशल मीडियावर फेसबूक प्रमाणेच इन्स्टाग्रामवरही अनेक जोक्स व्हायरल होत असतात अशाच काही मराठी विनोदी कंमेट्स (funny marathi comments for instagram)
1. खूप त्रास होतो ह्रदयाला जेव्हा ती बोलते बॅंलन्स संपला, तू कॉल कर आणि मी आधीच लोन घेतलेलं असतं.
2. तू जर ए फॉर अॅटीट्यूड दाखवला तर मी बी फॉर भाव देणार नाही.
3. प्रत्येकीचा नवरा हा सोन्यासारखाच असतो म्हणून तर ती त्याला लुटते.
4. मित्र बिस्किटासारखे असतात… हक से मांगो.
गर्लफ्रेंड कोल्डिंकसारखी असते… दिल मांगे मोअर.
बायको कडू औषधासारखी असते… बस एक ही काफी है.
5. लाखाशिवाय आपली बात नाही आणि वडापावशिवाय आपण काही खात नाही.
6. तिला पटवण्याची आवड मला नव्हती, पण दोस्त म्हणाले भावा तिच वहिनी पाहिजे… मग काय आपली दोस्ती कट्टर आणि मग त्यामुळे कुठे पण टक्कर.
7. सगळा देश भ्रष्टाचाराच्या विरूद्ध आहे मग भ्रष्टाचार नेमकं कोण करतंय ?
8. मला वाटतं होतं की जगात फक्त सातच रंग आहेत आणि मग मी एक दिवस तिच्यासोबत नेलपॉलिश खरेदी करायला गेलो.
9. माहीत नाही कोणाचे नशिब चमकेल, दहा रूपयांचे शेंगदाणे घेतले होते चुकून ट्रेनमध्येच राहिले.
10. आजकाल टुथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग असतं. कळत नाही दात घासायचे आहेत की तोंडात यज्ञ करायचा आहे.
तुमचीही ‘फॅशन’आहे जरा हटके… मग तुमच्यासाठी खास (Fashion Quotes In Marathi)