home / लाईफस्टाईल
funny-jokes-in-marathi

200+ Funny Jokes In Marathi | भन्नाट मराठी जोक्स | Marathi Comedy Jokes

आज जागतिक हास्य दिन अर्थात World Laughter Day आहे. आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते.  हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. अनेक भन्नाट मराठी जोक्स अर्थात मीम्सही हल्ली सोशल मीडियावर  असतात जे आपल्याला हसवतात. जागतिक हास्य दिन असल्याने आपण असेच काही मराठी विनोदी जोक्स (Jokes In Marathi) या लेखातून बघणार आहोत. आपल्याकडे अनेक विनोदी जोक्स Funny Jokes In Marathi For Friends असतात.  सर्फिंग करताना आपण नेहमी मराठी विनोदी जोक्स वाचत असतो. वेगवेगळ्या विषयावर हे विनोद असतात. जे आपल्या तणावग्रस्त आयुष्यात थोडा हलकेपणा घेऊन येतात. असेच काही मजेशीर आणि भन्नाट मराठी जोक्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. मराठी जोक्स विनोद काहीही म्हणा याचा परिणाम आपल्या मनावर इतका चांगला होतो की किमान काही वेळासाठी का असेना आपण तणावमुक्त नक्कीच होतो. चला बघूया असेच काही भन्नाट मराठी जोक्स.

भन्नाट मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi

भन्नाट मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi
Funny Jokes In Marathi | मराठी भन्नाट जोक्स

मराठी ही भाषा अशी आहे की, जशी वळवावी तशी वळते. त्यामुळे बोलताना फारच विचार करून बोलावं लागतं. त्यामुळे बरेचदा मराठीत बोलतानाही भन्नाट जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) घडत असतात. असेच काही मराठीतील भन्नाट जोक्स (Funny Jokes In Marathi) तुमच्यासाठी. 

1. मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.

2. पोलीसः सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालकः तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड
पोलीसः ते फेसबुकवर टाक, इथे गप पावती फाड (Funny Jokes In Marathi)

3. सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !”

4. तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही

5. गणपतीला दोन बायका असतात,रिद्धी आणि सिद्धी
सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी (Funny Jokes In Marathi)

6. शिक्षक: उद्या गृहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा,  मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो

7. नितेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
नितेश : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या, मग बसू !

8. मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत (Funny Jokes In Marathi)

9. गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात
गुरुजी डोकं आपटून मेले 

10. तिचा फोन आला, खूप अकडत अडकत ती म्हणाली,
विसरुन जा मला
मी म्हणालो, आधी नाव तरी सांग कोण आहेस तू? (Funny Jokes In Marathi)

वाचा – Taunting Quotes On Relationships In Marathi

मैत्रीवरील मीम्स आणि भन्नाट मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends 

मैत्रीवरील मीम्स आणि भन्नाट मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends 
Funny Jokes In Marathi For Friends  | मैत्रीवरील मीम्स आणि भन्नाट मराठी जोक्स

मैत्री म्हटली की आपल्या मित्रमैत्रिणींना आपण काहीही बोलू शकतो. त्यामुळे भन्नाट जोक्स (Funny Jokes In Marathi) निर्माण होत असतात. असेच काही भन्नाट मराठी जोक्स 

1. एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून
पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय 
माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते
दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते (funny jokes in marathi for friends)

2. माझा एक मित्र आहे
तो कधी कधी इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की,  मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो

3. खरे मित्र तेच असतात जे मदत करण्यापूर्वी जगातल्या सगळ्या शिव्या ऐकवतात

4. कृष्णाला सोळा हजार बायका होत्या
तरीही तो आपला मित्र सुदामाला विसरला नाही
आणि इकडे आमचे मित्र एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत

5. भाऊ गाडीवरून पडलोय, लवकर हे शिवाजी पार्कात
थँक यू आणि तुलासुद्धा मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
अरे ए माकडा, मेसेज तर नीट वाच
अरे सॉरी सॉरी आलोच  (funny jokes in marathi for friends)

6. दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू
दुसरा – येडा झालास का तू
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…

7. किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस 
दोन बोटं जोडली की दोस्तीला पुन्हा सुरूवात व्हायची 
आता क्वार्टर पाजल्याशिवाय परत दोस्ती होतच नाही 
माजले साले (funny jokes in marathi for friends)

8. वर्षभरात 17 मित्र बनवणे खूप सोपे आहे 
पण 17 वर्ष एकच मित्र टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे 

9. अरे या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं 
दुसरा मित्र – काय 
पहिला – की तुम्ही बघत आहात झी मराठी 

10. आपल्या प्रत्येकाकडे एक मित्र अथवा मैत्रीण असतेच
ज्यांना भरभरून प्रेमाचे प्रस्ताव येत असतात 
आणि आपल्याला प्रश्न पडतो यांच्यात असं काय आहे (funny jokes in marathi for friends)

परीक्षेवरील मराठी जोक्स | Exam Funny Jokes In Marathi

परीक्षेवरील मराठी जोक्स | Exam Funny Jokes In Marathi
Exam Funny Jokes In Marathi | परीक्षेवरील भन्नाट जोक्स 

परीक्षा म्हटली की, नेहमीच टेन्शनचे काम. पण परीक्षेच्या दिवसात डोकं थोडं हलकं ठेवायचं असेल तर काही परीक्षेवरील जोक्स नक्कीच वाचायला हवेत. 

1. शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही ओरलमध्ये शांत असतो – Engineering Student

2. दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः 
पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?
दुसराः गणित 
पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला

3. वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का!
मुलगा: फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना! (exam funny jokes in marathi)

4. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण
परीक्षा..
दिवे पण लागतात..फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो आणि घरचे आरती पण ओवाळतात

5. एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहिती आहे हो…गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार? (exam funny jokes in marathi)

6. एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलीचा हात असतो

7. कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला
परीक्षेचा आभ्यास मारून टाकतो (Funny Jokes In Marathi)

8. जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे…
तितक्या लेकरांना तर भारतात इंजिनिअरिंगला Drop बसतो

9. एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो: “भावा हे इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे ?
पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
मी पण इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे ! (exam funny jokes in marathi)

10. कॉलेजमधील दोन बेस्ट दिवस…पहिला आणि शेवटचा! (Funny Jokes In Marathi)

परीक्षेच्या निकालाचे मराठी जोक्स | Exam Result Funny Jokes In Marathi

परीक्षेच्या निकालाचे मराठी जोक्स | Exam Result Funny Jokes In Marathi
Exam Result Funny Jokes In Marathi | परीक्षेच्या निकालाचे भन्नाट जोक्स 

परीक्षेचा निकाल म्हणजे वेगळंच टेन्शन. कितीही अभ्यास केला असला तरीही निकालाच्या वेळी प्रत्येकालाच टेन्शन असतं. परीक्षेच्या निकालाचे असे काही जोक्स 

1. हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..
पण रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार
आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर लेक्चर देणार (Funny Jokes In Marathi)

2. तुम्हा सर्वांना सूचित करण्यात येते की, 
परीक्षेचा निकाल आला आहे, त्यामुळे
घरातील चप्पल, झाडू, चप्पल, बेल्ट 
सर्व काही लपवून ठेवावे  (Funny Jokes In Marathi)

3. ना तलवारीची धार ना गोळ्यांची बरसात आम्हाला घाबरवू शकते
परीक्षेचा निकाल लागल्यावर सर्वात जास्त घाबरायला होतं ते म्हणजे बाबांच्या माराने (Exam result funny jokes in marathi)

4. शिक्षकांनी गण्याला परीक्षेच्या निकालावर आईची सही आणायला सांगितली
दुसऱ्या दिवशी 
शिक्षक – हे काय आहे @@@@
गण्या – आईची सही
शिक्षक – आईचं नाव काय आहे?
गण्या – जलेबीबाई

5. बाबा – इतके कमी गुण, दोन कानाखाली मारायला हव्यात
गण्या – हो बाबा लवकर चला, मी तर त्या शिक्षकांचे घरही पाहून ठेवले आहे (Exam result funny jokes in marathi)

6. एक सुंदर मुलगी अभ्यासात खूपच वाईट होती, नेहमी आपल्या मित्रांबरोबर मस्ती करायची 
शिक्षक – तुला गणितात इतके कमी गुण का मिळाले?
मुलगी – आली नव्हती ना त्या दिवशी
शिक्षक – तू पेपरला आली नव्हतीस?
मुलगी – नाही नाही, माझ्या बाजूची मुलगी नव्हती आली, शिक्षक अजूनही बेशुद्धच आहेत

नवरा बायकोवर मराठी जोक्स | Navra Bayko Funny Jokes In Marathi

नवरा बायकोवर मराठी जोक्स | Navra Bayko Funny Jokes In Marathi
Navra Bayko Funny Jokes In Marathi | नवरा बायकोवर मराठी जोक्स

नवरा आणि बायकोवर जोक्स हे तर जगजाहीर आहेत. नवरा आणि बायको हे असं नातं आहे हे यावर अनेक जोक्स तयार होत असतात. नवरा बायकोचं नातं हे असंच आहे. या नात्यात सतत नोकझोक चालू असते. त्यामुळे या नात्यावर अनेक जोक्स (Funny Jokes In Marathi) निर्माण होतात. असेच काही भन्नाट जोक्स (navra bayko funny jokes in marathi)

1. अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे
लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे
पण भांडी घासावी लागतातच

2. बायको – दोन किलो वाटाणे घेऊ का?
नवरा – हो घे ना
बायको – तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारतेय की, तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ? (husband wife jokes in marathi)

3. बायको – चहा बनवू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – आलं घालून का?
नवरा – ओके
बायको – पुदीना घालू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते
नवरा – एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता (husband wife jokes in marathi)

4. बायको – अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना मला भीती वाटते
नवरा – हा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल

5. आळशी बायको आणि समजूतदार पती 
याचा अर्थ संध्याकाळी खिचडी 

6. बायको – माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं
नवरा – मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला 

7. नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस?
जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

8. भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘ऐक अर्थात सुनो गधे’ असं म्हणत नाही
त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते (husband wife jokes in marathi)

9. बायको – कशी दिसते मी
नवरा – एकदम प्रियांका चोप्रासारखी दिसतेस 
बायको – खरंच? डॉनमधली की क्रिशमधील?
नवरा – बर्फीवाली
मग काय मेरी कॉम बनून नवऱ्याला धू धू धुतलाय बायकोने 

10. सर्वात छोटा जोक 
नवरा – मला कविता आवडते
बायको – मला पण विनोद आवडतो  (husband wife jokes in marathi)

नवरा आणि बायकोचे जोक्स | Husband Wife Jokes In Marathi

नवरा आणि बायकोचे जोक्स | Husband Wife Jokes In Marathi
Husband Wife Jokes In Marathi | नवरा आणि बायकोचे जोक्स 

1. नवरा : अगं, ऐकलंस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं

2. नवरा: आज आपण बाहेर जेऊया गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो

3. नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन मी तू पण आनंदी आणि मी पण खुश
नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ

4. एकदा नवरा बायको Discovery बघत असतात, चॅनेलवर म्हैस दिसते
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक
बायको: अय्या…सासूबाई !

5. बायको: अहो ऐकलं का? आपले लग्न लावणारे देणारे भटजी वारले
नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !

6. बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दुसरी वेळ आहे मी मरता मरता वाचले आहे.
नवरा: डार्लिंग प्लीज त्याला अजून एक संधी दे ना!

7. बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा
नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!

8. एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकू आणि अक्षता लावत होती तेवढ्यात,
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणून शस्त्रांची पूजा करते आहे

9. नवरा बायकोचं भांडण चालू असतं
नवरा: तू स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जानवर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!

10. बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात
नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सीधी बात नो बकवास”

विद्यार्थ्यांकरिता मजेशीर जोक्स | Funny Jokes In Marathi For Students

विद्यार्थ्यांकरिता मजेशीर जोक्स | Funny Jokes In Marathi For Students
Funny Jokes In Marathi For Students | विद्यार्थ्यांकरिता मजेशीर जोक्स 

विद्यार्थी आणि गुरूजींवरील जोक्स हे खूपच वेगळे असते. जितके भावूक तितकेच मजेशीर. असेच विद्यार्थ्यांकरिता काही मजेशीर जोक्स 

1. टिचर: बंडया तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही  (funny jokes in marathi for students)

2. गुरूजी: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !

3. गुरुजी : गण्या, मी तुला कानाखाली मारली याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या : जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार! (funny jokes in marathi for students)

4. गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर, चड्डी काढून मारेन तुला
बंडू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय ? 1. टिचर: बंडया तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही  (funny jokes in marathi for students)

5. गुरुजी: लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
चिंपूः लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुले, मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात

6. शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
शिक्षकांनी कोरड्या विहिरीत उडी मारली

7. गुरूजीः शाळेत का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..कुठेही जाऊ नका पाहत रहा ABP माझा

8. परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो, चिटींग पण करता येत नसते
शेवटच्या बाकावर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली
शिक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चूपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसले
गण्याच्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले: यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत?
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…!!!” (funny jokes in marathi for students)

चावट मराठी जोक्स | Marathi Jokes Chavat

चावट मराठी जोक्स | Marathi Jokes Chavat
Marathi Jokes Chavat | चावट मराठी जोक्स

मराठी भाषा ही तुम्ही जशी वळवाल तशी आहे. त्यामुळे बरेचदा यामध्ये चावट जोक्स निर्माण होतात. असचे काही चावट जोक्स (Marathi Jokes Chavat)

1. रिना : आज सकाळी बॉस माझ्यावर चढून गेला.
करिना: का???
रिना : मी ऑफिसमध्ये झोपून गेले होते

2. मॅडम: पिंटू मी जेव्हाही शिकवते तेव्हा ही डोक्याला थुंकी का लावतो.
पिंटू: मॅडम माझी आई रोज रात्री बाबांना सांगते की आत जात नसेल तर थुंकी लावा

3. दारू आणि आशिक या दोघांमधील साम्य :
दारू जास्त झाली तर मुलगा उलटी करतो आणि आशिक जास्त झाले की मुलगी उलटी करते (Marathi Jokes Chavat)

4. लग्नाच्या पहिल्या रात्री मुलगी नवऱ्याला म्हणते
मुलगी: कृपया माझ्या जवळ नका येऊ तुम्ही!
नवरा: का काय झाले?
मुलगी: मी आईला वचन दिले आहे की लग्नानंतर हे सर्व सोडून देणार आहे (Marathi Jokes Chavat)

5. मुलगीः मला एका मुलाने गालावर किस केलं
आई : मग त्याला कानाखाली मारलीस की नाही ?
मुलगी :- नाही आई,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
आई बेशुद्ध…

6. बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु: हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा: मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु: हो बाबा त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात

7. आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हीच लपा
आजोबा : का रे बाबा ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणून 8 दिवस सुट्टी घेतली आहे मी

8. वडिलांनी बंडूची झडती घेतली,
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
बंडू रडत रडत,
बाबा ही पँट माझी नाही तुमची आहे

9. आजचा उपदेश:
जर कोणी आपल्याला पाहून दरवाजा बंद केला तर,
आपण पण त्याला दाखवून द्यायचे की,
दरवाज्याला दोन कड्या असतात

10. ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान
बाळाचे लंगोट बदलत असते.
शहरी बाई: हग्गीज नाही का?
गावाकडील बाई: नाही, फक्त मुतीस – (Marathi Jokes Chavat)

नॉनव्हेज जोक्स मराठीत | Non Veg Jokes Marathi

नॉनव्हेज जोक्स मराठीत | Non Veg Jokes Marathi
Non Veg Jokes Marathi | नॉनव्हेज जोक्स मराठीत

मराठीत काही नॉन व्हेज जोक्स (Non Veg Jokes Marathi). अनेकांना नॉनव्हेज जोक्स आवडतात. त्यांच्यासाठी काही खास जोक्स 

1. एकदा नवरा बायको खूप भांडत असतात,
नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते,
बायको: बदला लुंगी
नवरा: (घाबरून) हे तू मराठीत बोललीस का हिंदीत ?

2. बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पुरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेऊन येतो

3. बायकांकडे अशी कोणती गोष्ट असते जी आकाराने गोल असते,शरीराच्या दोन्ही बाजूस असते, बाई चालताना ती गोष्ट हलते आणि त्या गोष्टीचे नाव ब पासून सुरू होते???
बांगड्या !
कधीतरी चांगला विचार करत जा रे!

4. तू दिसलीस की ताठ होतो माझा,

.

‘स्वाभिमान’

तू हासलीस की फवारा उडतो माझ्या,

.

‘मनातून आनंदाचा’

तू बोललीस की वाटते घालावा तुझ्या तोंडात

.

‘पेढ्याचा घास’

.

तू लाजलीस की वाटते दाबावे तुझे दोन्ही,

.

‘गाल’

आणि

तू निघून गेल्यावर वाटते हालवत रहावा

वर करुन, 

.

‘हात’

बाय बाय करण्यासाठी

5. मास्तर- राहुल गांधी अविवाहित का आहे??
गण्या- कारण त्याचा हातावर विश्वास आहे

6. मुलगा- मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे
बाप- तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही 
मुलगा – बापरे….!
एवढी हगते…मग राहू द्या

7. पेपर मधे प्रश्न होता शास्त्रीय कारणे द्या
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये…….

एका कार्ट्याने उत्तर लिहिले ‘ कारण कोण झोपलंय ते कळत नाही ‘
शिक्षकांनी मरेस्तोवर लोळवला

8. योग्या : तुला आपल्या वर्गातली  गायत्री आठवते का?
सुभान्या : हो कसले मोठे होते तिचे
योग्या : ती आत्ता माझी बायको आहे
सुभान्या : डोळे अजून तसेच मोठे आहेत का रे तिचे?

पाणचट जोक्स | Panchat Jokes In Marathi

पाणचट जोक्स | Panchat Jokes In Marathi
Panchat Jokes In Marathi | पाणचट जोक्स 

1. तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”

2. चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !

3. एका मैत्रिणीने Hi पाठवलं.
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालू आहे.
मी तिला सांगितलं
2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 टीव्ही.
1 मोबाइल अणि तू
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!

4. मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: 1 ते 4 आराम
मी पुण्याचा आहे ना!

5. स्त्री फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे…फोटोग्राफर

6. शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता

7. आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला

8. एक मैत्रीण :- तु खूप बोर झाल्यावर काय करतेस ?
दुसरी :- मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते,
आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते

9. जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी

10. पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड,
घे भिकारड्या

सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स | Sasu Sun Funny Jokes In Marathi

सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स | Sasu Sun Funny Jokes In Marathi
Sasu Sun Funny Jokes In Marathi | सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स

सासू आणि सुनेचं नातं हे सगळ्यांसाठीच माहितीचं आहे. सासू आणि सून म्हटलं की कधी गुण्यागोविंदाने नांदतच नाही असाही समज आहे. अंशतः हे खरं असलं तरीही अनेक सासू आणि सुनांचं नातं हे अत्यंत चांगलंही आहे. या नात्यावर अनेक जोक्स 

1. सून – सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं?
सासू – ठीक आहे अगं नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात
सून – ते सगळं ठीक आहे तर मग सांगा की यांचे शव नक्की कुठे नेऊ?

2. नवी नवरी सासूच्या पाया पडते
सासू – सुखी राहा
सून – तुम्ही राहू देणार का ?

3. हे बघा सासूबाई तुमच्या  मुलाला त्याच्या आईच्या हातचंच खायला आवडतं
तर मग रोज आता जेवण तुम्हीच बनवा 

4. आपली प्रशंसा आपण स्वतःच करायला हवी
वाईट बोलण्यासाठी  तर सासू आहेच

5. साधारण 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळेल
2020 मध्ये सासू घाबरते सून कशी मिळणार? किमान मुलगी तरी असेल ना?

6. भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की 
तू माझी सून  होण्याच्या लायकीची आहेस की नाही? तुझं शिक्षण किती?
मुलगी – नेत्र नेत्र चहा 
भावी सासू – म्हणजे काय?
मुलगी – आयआयटी
सासू अजून कोमातच आहे 

7. सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा 

8. सासू – सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
सून – मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी 

9. पुणेरी सून
सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या
सासू – मग मी काय घालू?
सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला
उत्तम आरोग्य हाच खरा दागिना 

10. सासूबाई – हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं
सून – हे तुमच्या तरी आईचं घर कुठे आहे तुम्ही पण नीट राहायचं 

Teacher And Students Jokes | शिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक्स 

Teacher And Students Jokes | शिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक्स 
Teacher And Students Jokes | शिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक्स 

1. गुरुजी- दळणवळण म्हणजे काय?
विद्यार्थी- एखादी मुलगी दळण घेऊन
जाताना वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत (Funny Jokes In Marathi)

2. गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील (Funny Jokes In Marathi)

3. मास्तर : सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब?
मास्तरांनी बी.एड.ची डिग्री विकली (Funny Jokes In Marathi)

4. शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
विद्यार्थी : झेब्रा
तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे

5. गुरूजीः परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?
विद्यार्थीः हे एकच ठिकाण आहे की जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो
” जरा दाखव” आणि बऱ्याचवेळा ती दाखवतेही (Funny Jokes In Marathi)

Mumbaikar And Punekar Marathi Jokes | मुंबईकर आणि पुणेकर मराठी जोक्स 

Mumbaikar And Punekar Marathi Jokes | मुंबईकर आणि पुणेकर मराठी जोक्स 
Mumbaikar And Punekar Marathi Jokes | मुंबईकर आणि पुणेकर मराठी जोक्स 

1. पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या नामुंबईकर : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण अजून खा की, इथे कोण मोजत बसलंय?

2. मुंबईकर – तुमच्या वडापावमध्ये चटणी का लावत नाहीत ?
पुणेकर – आमच्या जिभेलाच जन्मजात लावलेली असते

3. मुंबईकर काकू : आमचे हे काट्याने जेवतात
पुणेकर काकू : आमचे हे मुकाट्याने जेवतात

4. एक पुणेकर आरशात बघून स्वतःलाच नमस्कार करत होता
मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय,
पुणेकर म्हणाला “आज गुरुपोर्णिमा आहे ना, आम्हीच आमचे गुरु आम्हाला कोण शिकविणार?”

5. मुंबईकर:- काय करता आपण?
पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!
मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे तुमचा?
पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!
मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?
पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!

Husband Wife Comedy Jokes In Marathi | नवरा बायकोवर मराठी जोक्स

Husband Wife Comedy Jokes In Marathi | नवरा बायकोवर मराठी जोक्स
Husband Wife Comedy Jokes In Marathi | नवरा बायकोवर मराठी जोक्स

1. नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न
मला कशाला पटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा (Funny Jokes In Marathi)

2. नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता (Funny Jokes In Marathi)

3. बायको आकाशात चांदणी बघून म्हणते,
अशी कोणती वस्तू आहे
जी तुम्ही रोज बघू शकता,
पण आणू शकत नाही.
नवरा: शेजारीण!
लय मारला घरात नेऊन

4. बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला..
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना?

5. नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे पैसे खर्च केले तरी,
बायको शेवटी ‘Thank You’ दुकानदारालाच म्हणणार (Funny Jokes In Marathi)

Brother Sister Relation Jokes | भाऊ बहिणीच्या नात्यावरील जोक्स

Brother Sister Relation Jokes | भाऊ बहिणीच्या नात्यावरील जोक्स
Brother Sister Relation Jokes | भाऊ बहिणीच्या नात्यावरील जोक्स

1. बहीण भाऊ एकमेकांसाठी जीव पण देतील
पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाही

2. भाऊ : पाणी दे ना
बहीण : स्वतः ऊठ आणि घे
भाऊ : दे ना गं
बहीण : परत मागितलंस ना तर कानाखाली मारेन
भाऊ : जेव्हा कानाखाली मारायला येशील तेव्हा दे पाणी 

3. एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात… बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहीण त्याला विचारते., 
बहीण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो
बहीण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : फँड्री

Girlfriend – Boyfriend Funny Jokes | गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फनी जोक्स 

Girlfriend - Boyfriend Funny Jokes | गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फनी जोक्स 
Girlfriend – Boyfriend Funny Jokes | गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फनी जोक्स 

1. गर्लफ्रेंड :- तुला माझी आठवण कधी येते रे जानू?
बॉयफ्रेंड :- जेव्हा जेव्हा आई म्हणते, येऊ दे तुझ्या बायकोला घरातली
सगळी कामे कशी करून घेते बघ!
गर्लफ्रेंड :- तू असाच मर कुत्र्या (Funny Jokes In Marathi)

2. गर्लफ्रेंड: माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
बॉयफ्रेंड: राणी एक विचारू?
गर्लफ्रेंड: हो विचार ना..
बॉयफ्रेंड: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना?

3. BF: मला तुझे दात खूप आवडतात.
GF: अय्या खरंच का रे?
BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे (Funny Jokes In Marathi)

4. मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा
मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?

5. हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील..
फक्त तिला म्हणा की,
बोल जाडे! आज काय खाणार?

Doctor And Patient Jokes | डॉक्टर आणि रूग्ण भन्नाट मराठी जोक्स

Doctor And Patient Jokes | डॉक्टर आणि रूग्ण भन्नाट मराठी जोक्स
Doctor And Patient Jokes | डॉक्टर आणि रूग्ण भन्नाट मराठी जोक्स

1. एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,
तुम्ही फार लकी आहात,
स्त्री: कसली लकी,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !

2. डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता
रुग्ण: तेच तर केले होते

3. एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते,
डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?
बाई म्हणते आठवा
डॉक्टर म्हणतात, मी कसा आठवू? तुम्हीच सांगा

4. डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
नवरा: बरं वाटतंय तिला आता,
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय

5. सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर
भूक लागत नाही, झोपून उठल्यावर
झोप येत नाही, काय करू?
डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल

Married Couple Jokes | विवाहित जोडप्यावरील जोक्स 

Married Couple Jokes | विवाहित जोडप्यावरील जोक्स 
Married Couple Jokes | विवाहित जोडप्यावरील जोक्स 

1. मे महिना भारीच असतो कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुष  असतो 
तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलंय म्हणून खुष असतो

2. सुखी संसाराचे तीन महत्त्वाचे शब्द हिला विचारून सांगतो 

3. भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘ऐक अर्थात सुनो गधे’ असं म्हणत नाही
त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते

4. नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस?
जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

5. भांडण नको प्रेम करा
आणि दोन्ही करायचं असेल तर लग्न करा 

CID Jokes In Marathi | CID वरील भन्नाट मराठी जोक्स

CID Jokes In Marathi | CID वरील भन्नाट मराठी जोक्स
CID Jokes In Marathi | CID वरील भन्नाट मराठी जोक्स

1.  दया –  सर हा आलोकनाथ चप्पल काढत आहे
एसीपी – याचा अर्थ कळतोय का दया?
दया – नाही सर
एसीपी – याचा अर्थ आता तो टेंपल रन खेळणार आहे

2. सनी, मला काहीतरी आंबट खावंसं वाटत आहे
एसीपी – याचा अर्थ कळतोय का दया?
दया – हो सर, मला कळलं.  याचा अर्थ ही आई होणार आहे
एसीपी – नाही दया याचा अर्थ सनी बाप होणार आहे

3. अभिजीत – दया टाकीमध्ये पाणी नाहीये
दया – काय टाकीमध्ये पाणी नाहीये?
अभिजीत – हो दया टाकीमध्ये पाणी नाहीये
एसीपी – याचा अर्थ टाकी रिकामी आहे

4. दया – अरे देवा याचा मृत्यू झालाय
एसीपी – याचा अर्थ याचा मृत्यू झाल्याने हा मेलाय
साळुंखे – नाही बॉस याचा मृत्यू मरण्याने नाही तर जीव गेल्याने झालाय 

5. दया – सर बॉडीजवळ हे पेन मिळालं
एसीपी – दया बस झालं आपलं काम, आता फक्त या गोष्टीचा शोध लावायचा आहे की,  
मुंबईमध्ये कोण कोण पेन वापरतं

6. राहुल माझा भाऊ होता 
अभिजित – काय राहुल तुझा भाऊ होता?
हो माझा भाऊ होता 
दया – काय खरंच राहुल तुझा भाऊ होता ?
हा सर तो माझा भाऊ होता 
एसीपी – माय गॉड! याचा अर्थ तू राहुलची बहीण आहेस

7. एसीपी – दया शोध लाव हा खून कोणी केलाय?
दया – हा खून खुन्याने केला आहे 
एसीपी – मला पहिल्यांपासूनच संशय होता की, खून खुन्याने केलाय

8. एसीपी – ललित, माल्या, निरव कुछ समझा दया?
दया – येस सर, एल,  एम आणि एन नंतर आता नव्या स्कॅमस्टरचं नाव ओ पासून सुरू होणार आहे

9. जेव्हा माझे मित्र म्हणतात आजची पार्टी माझ्याकडून 
कुछ तो गडबड है दया!

10. अभिजीत – उद्या गुरूवार आहे
एसीपी – याचा अर्थ कळला का दया?
दया – नाही सर
एसीपी – याचा अर्थ उद्या शुक्रवार नाहीये

आम्ही तुमचा दिवस मजेशीर घालविण्यासाठी वेगवेगळे जोक्स (Funny Jokes In Marathi) या लेखातून दिले आहेत. तुम्हीही हे वाचून तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नवरा – बायकोला पाठवू शकता.  

वाचा – मराठी कॅप्शन इन्स्टाग्राम (Marathi Caption For Instagram)
वाचा – मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स

17 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text