logo
Logo
User
home / xSEO
मराठी विनोदी मेसेज | Marathi Jokes Sms

मराठी विनोदी मेसेज | Marathi Jokes Sms | Jokes Marathi Sms

आयुष्य आनंदात आणि मजेत जगायचं असेल तर माणसाला स्वतःला आणि इतरांना पोटभर हसवता यायला हवं. आयुष्यातील चिंता, काळजी, ताणतणाव दूर करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. विनोदी किस्से, जोक्स, चारोळी अथवा चुटकुले वाचून हसण्यामुळे माणूस आनंदी आणि प्रसन्न होतो. हसणं हा एक चांगला व्यायाम आहे. कारण त्यामुळे शरीर आणि मन दोघांनाही आराम मिळतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एखादा विनोदी मेसेजही तुमच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुरेसा असतो. दिवसभर प्रत्येकजण अनेक प्रकारच्या ताणतणावातून जात असतो. अशा वेळी तुमचा एखादा विनोदी मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करू शकतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मराठी विनोदी मेसेज, Marathi Jokes Sms, Sms Marathi Jokes, Jokes Marathi Sms ज्यामुळे तुमचा दिवस जाईल आनंदाचा आणि मजेशीर… यासोबतच वाचा तुमच्या मित्रांना वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद | Birthday Jokes Marathi, Funny Jokes In Marathi आणि Taunting Quotes On Relationships In Marathi | नात्यांची फिरकी घेणारे मराठी सुविचार टोमणे

प्रेमाचे जोक्स मराठीतून – Love Jokes Marathi Sms

प्रेमाचे जोक्स मराठीतून (Love Jokes Marathi Sms)
Love Jokes Marathi Sms

प्रेम हा विषय नाजूक आणि रोमांचक असला तरी यावरून केलेले मेजेस तुमचं निखळ मनोरंजन करतात. म्हणूनच नवरा बायको आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला पाठवा हे प्रेमाचे जोक्स  

1.मुलगा – आय लव्ह यू

मुलगी – माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे.

मुलगा – विचार करत पळायला लागतो

मुलगी  – विचारचे काय झालं रे…

मुलगा – थांब, तुझ्या बाबांना सांगून येतो.

मुलगी – अरे खुळ्या, मी तुझी मस्करी करत होते. माझं पण तुझ्यावरच प्रेम आहे.

2.माझा एक मित्र दररोज इतके दर्दभरे मेसेज शेअर करतो की, आजकाल मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो.

3.बायको – कशी दिसते मी ?

नवरा – खूप सुंदर

बायको – मग माझ्यावर एखादा छान शेर म्हणा ना…

नवरा – ही जी दिसतेस तू सुंदर प्यारी, यातच जाते माझी महिन्याची सारी सॅलरी…

4.प्रेमात पडलेल्या लोकांचा एकच राष्ट्री प्रश्न

जेवण झालं का ?

5.मुलगा – मला तुझे दात खूप आवडतात

मुलगी – अय्या खरंच

मुलगा – हो कारण पिवळा माझा फेव्हरेट रंग आहे

6.बंड्या – चलते चलते युही रूक जाता हू मै, बैठे बैठे युही खो जाता हू मै, क्या यही प्यार है, क्या यही प्यार है…

बंडी – बावळट तुला अशक्तपणा आलाय. दुसरं काही नाही.

7.नवरा – पुरूष हा लग्नाआधीपण वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो.

बायको – होय, लग्नानंतर फक्त घरातील दुर्गादेवी त्या वाघावर बसलेली असते. 

8.हरवलेलं प्रेम एकवेळ माणसाला परत मिळेल, पण गाडी पुसायचं फडकं हरवलं तर ते कधीच परत मिळत नाही.

वाचा – Taunting Quotes On Relationships In Marathi

मजेशीर जोक्स मराठीतून – Funny Jokes in Marathi Text

मजेशीर जोक्स मराठीतून (Funny Jokes in Marathi Text) 
Funny Jokes in Marathi Text

दैनंदिन जीवनात अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून नकळत विनोदांची निर्मिती होत असते. असे मजेशीर किस्से अथवा मजेशीर जोक्स Funny Jokes in Marathi Text तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांचे मनोरंजन करू शकता.

1.डॉक्टर – घाबरू नका देशपांडे… खूप छोटं ऑपरेशन आहे. 

पेशंट – थॅंक यु डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर – माहीत आहे… देशपांडे माझं नाव आहे

2.रमेश – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरींगच्या मुली दिसतील का ?

सुरेश – हो नक्की. पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.

3.नवरी जेवताना – अगं तुझं नेट बंद आहे का ?

बायको – नाही सुरू आहे काय झालं

नवरा – अगं मला भाजी वाढ म्हणून मी कधीचा मेसेज टाकलाय, पण अजून वाढली नाहीस. म्हणून विचारलं

4.नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये बसून अॅपल खातो. त्याला बघायला आलेले नातेवाईक हॉस्पिटल बाहेर उभं राहून वडापाव खातात.

5.डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले

पेशंट – बायकोने दगडासारखी भाकरी केली होती.

डॉक्टर  – मग खायला नकार द्यायचा ना

पेशंट – तोच तर केला

6.चीनचा निषेध म्हणून मी चिनी मातीची बरणी फोडली, तर आईने नंतर मलाच फोडलं

7.माणसाचा चेहरा तेव्हाच सज्जन असतो, जेव्हा तो दुकानदाराला फाटकी नोट देत असतो.

8.एक माणूस – मावशी या सुरमईमध्ये गाभोळी असेल का ?

मासेवाली – ए बाबा, म्हावरं वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही.

व्हॉटसअपसाठी मजेशीर जोक्स – Latest WhatsApp Sms Marathi Jokes

व्हॉट्सअप हे असे एक माध्यम आहे, ज्यावरून तुम्ही नियमित तुमचे मित्रमंडळी,नातेवाईक, सहकारी, कुटुंबिय यांच्याशी मनसोक्त गप्पा मारू शकता. म्हणूनच दिवसाची सुरुवात मजेशीर जोक्स Marathi Jokes Sms ने करण्यासाठी त्यांना पाठवा हे Latest WhatsApp Sms Marathi Jokes

1.दिनेश – मला दिवाळी आवडते पण दिवाळीनंतरचे दिवस नाहीत.

रमेश – का ?

दिनेश – मी जेव्हापण आमच्या हिला नाश्ता करायला सांगतो, ती म्हणते आधी तो फराळ संपवा

2.भाजीवाला ऊन असल्यामुळे खूप वेळ भाजीवर पाणी शिंपडत असतो.

शेवटी भाजी विकत घ्यायला आलेली बाई चिडून म्हणते

दादा, मेथी शुद्धीवर आली असेल तर एक जुडी द्या.

3.शिक्षक – चला मुलांनो आज तुमच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा आहे. एखाद्या वैज्ञानिकाचे नाव सांगा बघू…

गण्या – आलिया भट

शिक्षक – मुर्ख मुला, चल वर्गाबाहेर हो.

चिन्या – मॅडम, चिडू नका तो बोबडा आहे. त्याला आर्य भट्ट असं म्हणायचंय. 

4.नवरा – माझ्या छातीत दुखतंय, डॉक्टरांना फोन लाव 

बायको – आता करते, तुमच्या फोनचा पासवर्ड द्या

नवरा – राहू दे, आता जरा बरं वाटतंय मला.

5.एक मुलगा गाढवाच्या पायाजवळ घसरून पडतो. तेव्हा बाजूने जाणारी एक मुलगी त्याला विचारते… 

मुलगी – काय रे भावाच्या पाया पडतोयस का ?

मुलगा – होय वहिनी!

6. वर्क फ्रॉम होममुळे घरच्यांनाही समजलं की, तुम्ही ऑफिसमध्ये काय दिवे लावता ते 

7. मेंदू हा चोविस तास काम करत असतो. फक्त आयुष्यात दोनदा बंद पडतो. एक परीक्षेच्या वेळी आणि दुसरं मुलगा पसंत करताना

8. पूर्वी जांभई आली की लक्षात यायचं की झोप आली आहे. आता मोबाईल तोंडावर पडलं की ही गोष्ट कळते. काळजी घ्या दात बीत तुटायचे.

मजेशीर मेसेज – Funny Messages in Marathi

मजेशीर मेसेज (Funny Messages in Marathi)
Funny Messages in Marathi

मराठी भाषेतील काही शब्द, वाक्यरचना अशा असतात ज्यामधून नकळत विनोद निर्मिती होत असते. अशाच काही विनोदी शैलीतून साकारलेले हे मराठी जोक्स Jokes Marathi Sms तुम्हाला नक्कीच आवडतील.

1.महिला – दादा, साडीचा नीट भाव लावा, मी नेहमी इथूनच खरेदी करते.

दुकानदार – देवाला तरी घाबर ताई, कालच या दुकानाचं उद्धाटन झालंय.

2. ज्या दिवशी ठरवतो की, आयुष्यात आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. त्याच दिवशी नेमकं आई दळण आणायला पाठवते.

3.डॉक्टरांनी निलूला तपासून तिला सांगितलं की तुला कोणताच आजार नाही फक्त विश्रांतीची गरज आहे.

निलू म्हणाली पण डॉक्टर तुम्ही तर माझी जीभ तपासली नाही. 

डॉक्टर म्हणाले – तिलादेखील विश्रांतीचीच गरज आहे.

4.शिक्षक – मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं.

बंड्या – सुई कोणी टोचली ते बघायला

शिक्षकांनी डोकं आपटून कपाळमोक्ष केला

5.नववधू सासरी गेल्यावर सासूसासऱ्यांच्या पाया पडते

सासू – सुखी राहा

सून – तुम्ही राहू देणार का ?

6.एक बाई कस्टमर केअरला फोन करत म्हणते, तीन तास झाले फोन करतेय तुमच्या कंपनीचे इंटरनेट सुरूच होत नाही आहे.

कस्टमर केअर – ताई तोपर्यंत जरा घरची कामं करून घ्या.

7.सासू – प्लेट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवा इतकी स्वच्छ करत जा.

सून – उद्यापासून आरशावरच जेवत जा.

8.आज शंभर सेल्फी घेतल्यावर मला समजलं की मनाच्या सौंदर्याशिवाय सुंदर जगात काहीच नाही. मग मी सर्व फोटो डिलीट करून टाकले. 

मराठी कॉमेडी जोक्स – Marathi Comedy Jokes Sms

Marathi Comedy Jokes Sms
Marathi Comedy Jokes Sms

मराठी जोक्स Jokes Marathi Sms एकमेकांना पाठवून मनोरंजन करणं ही अनेकांची आवड असते. असे जोक्स वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा क्षणिक आनंदही तुमचा ताणतणाव काही काळापुरता कमी होत असतो.

1.आजकाल कुणीपण कविता करायला लागलं की उगाच त्याचा प्रेमभंग झालाय अशी शंका येते.

2.तो म्हणाला – अं

ती म्हणाली – हं

पण घरचे म्हणाले – अंहं

खेळ संपला

4.नवरा – आज भाजीत मीठ जास्त पडलं आहे

बायको – मीठ बरोबर आहे, थोडी भाजीच कमी पडली आहे, तुम्हाला काल सांगितलं होतं की, भाजी थोडी जास्त आणत जा.

5.आई – चिंटू लवकर अंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडेल

चिंटू – अगं आई, बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल

आईने बादलीत बुडवून बुडवून हाणला

6.मी त्या चार लोकांना अनेक वर्ष शोधत आहे. जे माझ्या आयुष्यात एवढा इंटरेस्ट घेतात

कारण आई नेहमी म्हणते,

“चार लोक बघतील तर काय म्हणतील”

7.माणूस – भाऊ, आजकाल तुम्ही कविता करत नाही, काय झालं

कवि – नाही दादा, जिच्यासाठी करत होतो, तिचं आता लग्न झालं

माणूस – मग काय झालं भाऊ, तिच्या आठवणीत कविता करा, लोकांना आवडतील.

कवि – दादा तुला समजलं नाही, तिचं माझ्याशीच लग्न झालंय.

8. पूर्वी मी खूप कष्टाळू होते, आता कष्ट टाळू झाले आहे

9. आयुष्याच्या वाटेवर खूप चढउतार येतील, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की उतार आला की गाडी बंद करायची कारण पेट्रोल दिवसेंदिवस महाग होत आहे.

10.आयुष्यात कोणी सभ्य नसतं, असं असतं फोन कंपनीने फोनला पॅटर्न लॉक दिलं नसतं, आणि आपण त्याच्यावर रांगोळी काढत बसलो नसतो. 

व्हॉट्सअपसाठी बेस्ट मराठी जोक्स – Best Marathi Jokes for Whatsapp

Best Marathi Jokes for Whatsapp
Best Marathi Jokes for Whatsapp

व्हॉटसअपच्या माध्यमातून आपण मित्रमंडळी, नातेवाईकांशी जोडलेलं असतो. यासाठी याच माध्यमाचा वापर करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवा हे मराठी जोक्स  Marathi Jokes Sms… यासाठी वाचा खाली दिलेली काही मजेशीर वाक्य

1.आजकालची नाती एकदम त्या ‘सिर्फ तुम’ चित्रपटासारखी झाली आहेत. ना गाठ ना भेट फक्त व्हॉट्सअपवर चॅट

2.थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर खिसा गरम पाहिजे.

3. मुर्ख असण्याची संधी देव प्रत्येकाला देतो, काही लोक तिथंपण घआई करतात.

4. नासाने कोटी रूपये खर्च करून मंगळ ग्रहाचा शोध लावला… आपले गुरूजी एक शे एक रुपयांमध्ये सर्वच ग्रहांची दिशा बदलतात.

5. दुःखी असताना सुखी असल्याचं दाखवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप स्टेटस

6. लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही

7. आई – पेपर कसा होता

मुलगा – स्वच्छ होता म्हणून अजिबात खराब केला नाही, तसाच ठेवून आलो.

8. जिंकणं माझ्या रक्तातच आहे. 

आणि हरणं 

ती तर जंगलात राहतात

9. एक आई मुलाचा अभ्यास घेताना

तुझ्या होमवर्कसाठी करते तेवढा जरी अभ्यास पूर्वी केला असता तर आज चांगल्या घरात पडले असते. 

10. सुखी संसारासाठी दोन गोष्टी

बायको बोलत असताना शांत राहा

बायको शांत असताना मध्ये बोलू नका.

Conclusion – आम्ही शेअर केलेले हे मराठी विनोदी मेसेज Marathi Jokes Sms, Sms Marathi Jokes, Jokes Marathi Sms, Funny Messages in Marathi, Latest WhatsApp Sms Marathi Jokes  तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही ते तुमच्या कोणकोणत्या मित्रांना पाठवले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. 

10 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text