Advertisement

लाईफस्टाईल

वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद (Birthday Jokes Marathi)

Leenal GawadeLeenal Gawade  |  Aug 13, 2021
वाढदिवसासाठी खास जोक्स

Advertisement


बर्थडे आहे भावाचा.. जल्लोष साऱ्या गावाचा… वाढदिवस म्हटला की एक वेगळाच जल्लोष सगळे करतात. विशेषत: वाढदिवस जर मित्रांचा असेल तर त्या दिवसाची खासियत काही वेगळीच असते. कारण या दिवशी धम्माल, मजामस्ती आणि पार्टी करता येतात. वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश आपण नेहमीच पाठवतो. पण दूर असलेल्या किंवा आता तुमच्यापासून लांब असलेल्या तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू आणायचे असेल तर त्यासाठी खास मेसेज पाठवायलाच हवा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही भन्नाट विनोद शोधू काढले आहे. वाढदिवसाला पाठवण्यासाठी हे भन्नाट विनोद एकदम परफेक्ट आहेत (Birthday Jokes In Marathi) चला जाणून घेऊया हे भन्नाट जोक्स.

खास मित्राला पाठवा वाढदिवसाचे जोक्स (Birthday Jokes For Close Friends In Marathi)

आयुष्यात एकतरी मित्र खास असतोच. अशा या खास मित्रांसाठी तुम्ही पाठवायला हवेत एकदम भन्नाट असे वाढदिवसाचे जोक्स 

 1. देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
  एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झाले,
  तुला तर मिळाला आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
  आई बाबांचा लाडका,
  पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या,
  आमच्या लाडक्या भावाला,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3. तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण,
  लोकांच्या ह्रदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
  भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4. ना आकाशातून पडला आहेस,
  ना खास बनवून घेतला आहेस,
  असे मित्र खास ऑर्डर देऊन मिळतात,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 5. वाढदिवसाच्या दिवशी आणलेला केक,
  तोंडाला लावून मसाज करणाऱ्या अशा मित्राला
  वर्षभर कारली, कोबी भाजी खाण्याची शिक्षा द्यायला पाहिजे,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शाळेच्या मित्राला पाठवा वाढदिवसाचे जोक्स (Birthday Joke For School Friends In Marathi)

शाळेतली मैत्री ही शाळेतली मैत्री असते. अशी मैत्री आयुष्यभर टिकून राहते. शाळेतल्या खास मित्रांसाठी तुम्ही कधी वाढदिवसाचे जोक्स पाठवले नसतील तर पाठला शाळेच्या मित्रासाठी खास जोक्स 

 1. अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
  मित्रासाठी चौकात कोणालाही भिडणारे,
  समोरच्याच्या अंगातील मस्ती जिरवणारे,
  आमच्या …… भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2. आली लहर केला कहर,
  भाऊच्या बर्थडेला सगळं गाव हजर,
  आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा!
 3. जो पर्यंत शिव्या देत नाही तो पर्यंत एकही रिप्लाय न देणाऱ्या
  माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4. वय जसे वाढते तसे केकवर मेणबत्त्यांची संख्याही वाढत जाते,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 5. आज तर शहराशहरात चर्चा होणार,
  DJ वाजणार त्यावर सर्वजण नाचणार,
  धिंगाणा होणार ग पोरी धिंगाणा होणार,
  कारण आज तुझा वाढदिवस मस्त साजरा होणार

वाचा – Papa Birthday Wishes In Marathi

ऑफिसच्या मित्रांसाठी वाढदिवस जोक्स (Birthday Jokes For Office Friends In Marathi)

कोण म्हणतं ऑफिसचे मित्र हे खास नसतात. काही जणांना खरे मित्र हे ऑफिसमध्ये जाऊनच मिळतात. अशा खास ऑफिसवाल्या मित्रांसाठी वाढदिवसाचे जोक्स

 1. तुझा वाढदिवस हा आमच्यासाठी एक पर्वणी आहे
  फक्त पार्टीसाठी… मग कधी देतोस ओली किंवा सुकी पार्टी,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झालाय थोडा लेट,
  पण शुभेच्छा येतील तुला थेट,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 1. आयुष्यात सगळी सुखं तुला मिळो,
  फक्त मला बर्थडे पार्टी मिळो,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2. बॉसचा लाडका,
  नेहमी पगरवाढीचा फायदा मिळवणाऱ्या
  माझ्या मित्राला वाढदिवसाच्या केवळ पार्टीसाठी शुभेच्छा!
 3. बॉसचा चमचा म्हणून आहे ज्याची ओळख
  त्याचा आहे आजचा खास दिवस,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाचा – Fishpond In Marathi For Girl | मुलींसाठी खास फिशपाँड्स

भावंडाना पाठवा वाढदिवसाचे जोक्स (Birthday Jokes For Siblings In Marathi)

भावडांचे नाते हे थोडे वेगळे आणि खास असते. काहीही हवे असेल तर त्याच्याकडे अगदी हक्काने मागता येते. पण असे करताना काही जोक्स तुम्हाला पाठवता येतील.

 1. तुझ्यासाठी खूप महागडं गिफ्ट घेणार होतो,
  पण अचानक लक्षात आलं की, तुझं वय आता जास्त झालयं,
  त्यामुळे या वर्षी तुला फक्त शुभेच्छा देतोय.. चालेल ना!
 2. सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवणारा,
  पार्टी बिन बोलता देणारा,
  एकदम कुल मांईड असलेल्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3. देशातील सर्वात महत्वाचं रहस्य तुझं वय असो,
  आणि तुझा वाढदिवस कायम साजरा होवा,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4. करोडो दिलाची धडकन,
  मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जान,
  100000 हून अधिक पोरांचे / पोरींचे वॉलपेपर,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 5. दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्त्व
  असलेल्या माझ्या झिपऱ्या बहिणीला स्मार्ट असा भावाकडून
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नातेवाईकांसाठी वाढदिवसाचे जोक्स (Birthday Jokes For Relatives In Marathi)

काही नातेवाईक इतके खास असतात की, त्यांच्यासोबत आपल्याला काहीही शेअर करता येतं. अशा खास नातेवाईकांच्या वाढदिवसासाठी तु्म्ही काही खास वाढदिवसाचे जोक्स पाठवू शकता

 1. साखरेसारख्या गोड माणसाला,
  मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे
  आणि तुला हॅपी बर्थडे!
 3. जी लग्न झालेली व्यक्ती मला माझ्या वाढदिवसाला
  HBD HBD लिहून पाठवते,
  अशांना मी सुद्धा वर्षातून एकदा
  HA HA हा मेसेज पाठवतो,
  HA-  Happy Anniversary
 4. लग्नात किंवा पार्टीत चांगलेच लपून बसता
  पैसे खर्च होऊ नये म्हणून किती ते कष्ट करता,
  आज्या दिवशी होऊ दे खर्च म्हणत करुन टाका पार्टीचे ऐलान
  कारण आम्ही घरातून निघालो आहे पार्टीसाठी खास
 5. जल्लोष आहे भावाचा,
  कारण वाढदिवस आहे आपल्या भावाचा,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आता वाढदिवसाला असे विनोदी वाढदिवसाचे मेसेज पाठवून दिवस साजरा करा.

अधिक वाचा :

वाढदिवसासाठी बनवा अशी निमंत्रण पत्रिका

वाढदिवसासाठी आभार शुभेच्छा संदेश