ADVERTISEMENT
home / xSEO
marathi quotes on beauty

सौंदर्यावरील मराठी कोट्स | Marathi Quotes On Beauty

सौंदर्य हा स्त्रीचा अनमोल असा दागिना आहे, जो तिच्यासोबत कायम असतो. कारण सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर सुंदर असणं देखील…काळानुरूप आता सौंदर्याची परिभाषा बदलत चालली आहे. सौंदर्य फक्त दिसण्यावर नाही तर ते स्त्रीच्या आचरण आणि हुशारीवरही ते तितकंच अवलंबून आहे. सौंदर्याला रंग, रूपाचे बंधन आता उरलेले नाही. कोणतीही स्त्री तिच्या सौंदर्य आणि हुशारीवर आयुष्यात यशस्वी होऊ शकते. असं असलं तरी स्वतःचं कौतुक ऐकायला कोणाला नाही आवडत. शिवाय सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडिया हे प्रत्येकाला मनातील भावना व्यक्त करण्याचं एक सहज सोपं साधन झालेलं आहे. आपल्या सौंदर्याचं कौतुक इतर करत नसतील तर स्वतःच स्टेटस अपडेट करून तुम्ही तुमच्या सौंदर्याचे गुणगान गाऊ शकता. कौतुकासाठी स्त्रीला कोणावरही अवलंबून राहण्याची मुळीच गरज नाही. यासाठीच सोशल मीडिया माध्यमावर व्यक्त होण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत सौंदर्यावरील सर्वोत्कृष्ठ मराठी कोट्स (marathi quotes on beauty) आणि सुंदर मुलींसाठी स्टेटस मराठीतून (beautiful girl status in marathi).

फेसबूकसाठी सौंदर्यावरील मराठी कोट्स | Sundarta Quotes In Marathi For Facebook

Sundarta Quotes In Marathi
Sundarta Quotes In Marathi

फेसबूकवर शेअर केलेल्या फोटोसोबत सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी खास सौंदर्यावरील ब्युटी कोट्स (marathi quotes on beauty)

1. सौंदर्य म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही. खरं सौंदर्य तुमच्या आचरणातून व्यक्त होतं.

2. वयानुसार सुंदर दिसणं कमी होऊ शकतं, मात्र मनातील सौंदर्य कायम टिकतं.

ADVERTISEMENT

3. मनातून आणि दिसण्यातून सुंदर असलेली व्यक्ती पाहायला मिळणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.

4. काही लोकांचे सौंदर्य वयानुसार कधीच कमी होत नाही कारण काळानुरूप ते चेहऱ्यावरून त्यांच्या मनात उतरतं

5. सर्वात सुंदर स्त्री ही जशी आहे तशीच आत्मविश्वासाने जगते.

6. सौंदर्य म्हणजे गौरवर्ण नाही तर शुद्ध मन

ADVERTISEMENT

7. असा एखादा मेकअप हवा होता जो खाल्ल्यावर आतूनही सुंदर होता आलं असतं.

8. सुंदर असणं म्हणजे आहे तसं खरं वागणं, कारण तुम्हाला लोकांनी नाही तर स्वतःच स्वतःला स्वीकारण्याची गरज आहे.

9. सुंदर मनापेक्षा जास्त चमकणारे कोणतेच सौंदर्य नाही

10. तुम्ही कशा दिसता याचा जास्त विचार करण्याची गरज नाही कारण तुमचे सुंदर मन हेच तुमचे खरे सौंदर्य आहे.

ADVERTISEMENT

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi)

एका ओळीत सौंदर्याची परिभाषा | Marathi Quotes On Beauty In One Line

Marathi Quotes On Beauty In One Line
Marathi Quotes On Beauty In One Line

सौंदर्यांचे वर्णन करण्यासाठी जगातील सर्व शब्दभांडार कमी पडेल यासाठी एका ओळीत व्यक्त करा सौंदर्याची परिभाषा (beauty status in marathi). 

1. कधी कधी काही जणी दिसायला सुंदर नसतात, त्यांना खूप आकर्षक बोलताही येत नाही पण त्या मनातून इतरांपेक्षा जास्त सुंदर असू शकतात.

2. सौंदर्य प्रत्येक गोष्टीत आहे तुम्हाला ते पाहण्यासाठी फक्त सुंदर मनाची गरज आहे.

ADVERTISEMENT

3. चांगल्या आचरणाशिवाय असलेलं सौंदर्य म्हणजे आत्म्याशिवाय शरीर आहे

4. प्रत्येक मुलगी सुंदरच असते तिला फक्त गरज असते तिच्या सौंदर्याची पारख करणाऱ्या खास व्यक्तीची

5. जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे गरज आहे ती फक्त तुम्ही कुठे आणि काय पाहता याची

6. चांगलं दिसणं विरून जातं मात्र सुंदर मन तुम्हाला कायम सुंदर ठेवतं.

ADVERTISEMENT

7. तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो की मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू जास्त सुंदर दिसतेस.

8. तुम्ही आरशात पाहताना तुमचे दोष दिसू शकतात पण दुसरे जेव्हा तुमच्याकडे पाहतात तेव्हा तुमचे सुंदर मन आणि शुद्ध सौंदर्यच दिसायला हवे. 

9. तुम्ही एखाद्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल, पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्य त्या सौंदर्यासोबत नाही तर त्या व्यक्तिमत्वासोबत काढायचे आहे.

10. सुंदर दिसण्यासाठी कडक डाएट करण्याची गरज नाही कारण जगातील प्रत्येक आकार हा सुंदरच आहे.

ADVERTISEMENT

जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार (Nature Quotes In Marathi)

लोकप्रिय ब्युटी कोट्स मराठीतून | Famous Beauty Quotes In Marathi

Famous Beauty Quotes In Marathi
Famous Beauty Quotes In Marathi

सौंदर्यावर आजवर अनेक साहित्यिक, कवींनी आपल्या कल्पना मांडल्या आहेत. जाणून घेऊ यातील काही निवडक सुविचार मराठीतून (marathi quotes on beauty).

1. सुंदर मन हे हजार सुंदर चेहऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे.

2. स्त्री शक्तीची प्रचिती घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःमधील सौंदर्य ओळखणे.

ADVERTISEMENT

3. जगात मेकअपचा थर चढवलेल्या अनेक चांगल्या दिसण्याऱ्या महिला असतील पण चांगले पुरूष फक्त स्त्रीच्या नैसर्गिक सौंदर्यांचे चाहते असतात.

4. सुंदर चेहरा कधीतरी म्हातारा होईल, सुदृढ शरीर कधी तरी थकून जाईल पण चांगले ह्रदय कायम चिरतरूण राहिल.

5. आत्मविश्वासापेक्षा जास्त आकर्षक जगात काहीच नाही. कारण एकदा तुम्ही तुमच्यामधील हे सौंदर्य ओळखले की जग ते नक्कीच पाहू लागतं.

6. मी सुंदर आहे असं म्हणून तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल.

ADVERTISEMENT

7. स्त्रीच्या सौंदर्यामध्ये एखाद्याला गोठवणारी शक्ती आहे.

8. सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेते पण सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकते.

9. तुमच्या सुंदर स्मितहास्यामध्ये जग उजळण्याची ताकद आहे.

10. सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर जगातील प्रत्येक गोष्ट निरनिराळ्या पद्धतीने सुंदर दिसते. 

ADVERTISEMENT

अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi)

सुंदर मुलींसाठी स्टेटस | Beautiful Girl Status In Marathi

Beautiful Girl Status In Marathi
Beautiful Girl Status In Marathi

सुंदर मुली सर्वांचं लक्ष वेधून घेतात, त्यांच्या सौंदर्याने इतरांना घायाळ करतात. यासाठीच अशा सुंदर मुलींची स्तुती करण्यासाठी खास स्टेटस (beautiful girl status in marathi).

1. ज्या क्षणी तुम्ही स्वतः असण्याचे ठरवता त्या क्षणी तुमच्या सुंदर दिसण्याला सुरूवात होते.

2. सुंदर मुली या फुलपाखरा सारख्या असतात दिसायला सुंदर आणि असायला कठीण

ADVERTISEMENT

3. सुंदर मुलगी होण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्त्व बना

4. ती एक अथांग डोळ्यांची, पवित्र मनाची आणि अप्रतिम बुद्धिमत्व असलेली स्त्री आहे

5. तुमचं सोन्यासारखं मनच तुम्हाला खरं सुंदर बनवतं

6. सुंदर मुली हे असं एक फुल आहे जे जंगलाला आग लागल्यावरही फुलू शकतं

ADVERTISEMENT

7. मॉडेल होण्यापेक्षा रोल मॉडेल होण्याचं स्वप्न बाळगा

8. सुंदर मनाच्या भावना प्रत्येकाला भावतात

9. लहान मुलींसारखं हसावं आणि राणीसारखी जगावं

10. सौंदर्य म्हणजे तुम्ही जसे आहात त्याच्याशी सुसंगत जगणं

ADVERTISEMENT

सुंदर मुलींसाठी कोट्स | Beautiful Girl Quotes In Marathi

Beautiful Girl Quotes In Marathi
Beautiful Girl Quotes In Marathi

सुंदर मुलींच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावेत. त्यात जर तिच्याकडे सौदर्यासोबत चांगलं मनही असेल तर क्या बात है! यासाठी तुमच्यासोबत शेअर करत आहोत अशा अप्रतिम सौंदर्यासाठी काही खास सुविचार (beautiful girl quotes in marathi).

1. डोळे बंद करा आणि सौंदर्य पाहा.

2. सौंदर्य म्हणजे आत्म्याच्या खरा प्रकाश

3. सौदर्य ही स्त्रीची शक्ती आहे पण एक स्मितहास्य तिचं शस्त्र आहे.

ADVERTISEMENT

4. सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं.

5. सौंदर्य आणि पवित्रता हे अशक्य दुर्मिळ आहेत

6. साधेपणातच खरं सौंदर्य दडलेलं आहे

7. मनाचं सौंदर्य पाहण्यासाठी तेवढंच पवित्र मन लागतं.

ADVERTISEMENT

8. चंद्राला सुंदर म्हणणारेच चेहऱ्यावर डाग असणाऱ्या स्त्रीला नावं ठेवतात याचं आश्चर्य वाटतं.

9. बुद्धीसारखं लखाखणारं कोणतंच सौंदर्य नाही.

10. सुंदरता मनात असावी लागते कारण फेसवॉशने फक्त चेहरा चमकतो मन नाही.

10 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT