ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
marathi-quotes-on-life

आयुष्यावरील स्टेटस | Marathi Status On Life

प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि कोणाचंही आयुष्य अगदी एकमार्गी अथवा एकदम सुखात अथवा एकदम दुःखात असं नक्कीच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे असतातच. अशावेळी आपल्याला कोट्सचा (Marathi Quotes On Life) आधार घेत स्वतःला प्रेरणा देता येते. कधी कधी आपल्याला स्वतःत रमणं आवडतं तर कधी आपल्या मनातील गोष्टी सांगायला माणसं नसतात. मग अशावेळी आयुष्यावरील स्टेटस (Marathi Status On Life) आपला आधार बनतात. आयुष्यावरील असे हे कोट्स (Quotes On Life In Marathi) सकाळी उठून तुम्हाला आयुष्य जगायला अधिक प्रेरणा देताना दिसतात. अनेकदा आपण स्टेटस (आयुष्य Marathi Status On Life) ठेवण्यासाठी यांचा वापर करतो. असेच काही उत्तम आणि जगायला प्रेरणा देणारे आयुष्यावरील कोट्स आणि स्टेटस (Marathi Quotes On Life)

आयुष्यावरील कोट्स – Marathi Quotes On Life

आयुष्यावरील कोट्स – Marathi Quotes On Life

आयुष्य हे खरं तर एकदाच मिळतं आणि ते व्यवस्थित जगता यायला हवं. सतत रडत आणि कुढत बसलं तर आयुष्याची मजाच राहात नाही. आयुष्यात संकटं आणि चढउतार तर येणारच त्याशिवाय सुखाची जाणीव तरी कशी होणार? त्यामुळे असेच काही आयुष्यावरील कोट्स (Marathi Quotes Of Life) खास तुमच्यासाठी (Deep Meaning Reality Marathi Quotes On Life)

1. समुद्रातील तुफानापेक्षा मजातील वादळं अधिक भयानक असतात

2. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो, कोणाच्याही चुका मोजत बसू नका, आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल

ADVERTISEMENT

3. माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळसं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे 

4. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर आयुष्यातील तुमची ध्येय फारच लहान आहेत, हे समजून घ्या 

5. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, पण म्हणून प्रत्येक क्षण गंभीरपणानेच जगायला हवा असंही नाही – दिपाली नाफडे

6. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपली जिद्द असायला हवी हे कायम लक्षात ठेवा

ADVERTISEMENT

7. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे

8. कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल

9. आयुष्यात संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात

10. आयुष्यात कोणाला इतकंही महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल – दिपाली नाफडे 

ADVERTISEMENT

आयुष्यावरील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस – Best Marathi Status On Life

आयुष्यावरील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस – Best Marathi Status On Life

आयुष्य म्हटलं की कुठेतरी कमतरता आणि कुठेतरी काहीतरी राहून जातंच. पण नैराश्याने स्वतःला घेऊन घेऊ नका. तर आयुष्यावरील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस (Status On Life In Marathi) वाचा आणि स्वतःला पुन्हा एकदा आयुष्याशी दोन हात करायला उभं करा. 

1. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका

2. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो हे कायम लक्षात ठेवा

3. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक हे नेहमीच आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात 

ADVERTISEMENT

4. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. तरच आयुष्याशी सामना करता येईल

5. लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते

6. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते

ADVERTISEMENT

7. आयुष्यात यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही

8. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो

9. पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते, प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच आयुष्य असे म्हणतात वाटतं

10. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका. कारण, काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो

ADVERTISEMENT

आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्टेटस – Attitude marathi status on life

आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्टेटस – Attitude marathi status on life

प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन (Attitude Status Marathi Status On Life) अत्यंत वेगळा असतो. काही माणसं कितीही संकटं आली तरीही आशावादी राहून पुढे वाटचाल करतात तर काही माणसं ही लहानशा संकटांनीही घाबरून जातात आणि अगदी टोकाची भूमिका स्वीकारतात पण तुम्ही कायम आयुष्याकडे सकारात्मक पाहिले (Marathi Status On Life Attitude) तर आयुष्य हे नक्कीच सुंदर होते. 

1. आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णऊ टक्के असतो

2. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका

3. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असली की आयुष्यात सारे प्रश्न आपोआप सुटतात

ADVERTISEMENT

4. दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा

5. आयुष्यातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !

6. आयुष्यात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या

7. आयुष्यात जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

ADVERTISEMENT

8. आयुष्यात विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि मग स्वतःला त्या कार्यात पूर्णतः झोकून द्या

9. आयुष्यामध्ये समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

10. अपयश म्हणजे संकट नव्हे;आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत हे आयुष्यात कायम लक्षात ठेवले तर आयुष्य अधिक सुखकर होईल

आयुष्यावर कोट्स – Quotes On Life In Marathi

आयुष्यावर कोट्स – Quotes On Life In Marathi

आयुष्यावर बोलू काही असं आपल्याला वाटत असतं. कारण प्रत्येकाचे आयुष्यावरील अनुभवही वेगळे असतात आणि त्या अनुभवातून आपल्यालाही शिकायला मिळतं. असेच आयुष्यावरील काही कोट्स (आयुष्य Marathi Status On Life) खास तुमच्यासाठी. 

ADVERTISEMENT

1. आयुष्य जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे

2. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. बरेचदा आपण विचार न करता कृती करतो तर काहीवेळा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो

3. आयुष्यात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही

ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली

ADVERTISEMENT

ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि

ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले

4. आयुष्यात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत. कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतले तर, मनुष्य सरळ वागू शकेल

5. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात. तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व बाळगा. खरं तर एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते

ADVERTISEMENT

6. कधी कधी संकटे आली की 2 पावले मागे सरकनेच हिताचे असते, वाघ 2 पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी

7. आयुष्यात जर तुम्हाला थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे

8. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका. कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांना देऊन ठेवलाय

9. आयुष्यात पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात

ADVERTISEMENT

10. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव. जो मिळतो, चुकीचे निर्णय घेऊनच!

Best आयुष्य Marathi Status On Life

Best आयुष्य Marathi Status On Life

आयुष्यावर काही मराठी स्टेटस तुम्हाला जर तुमच्या सोशल मीडियासाठी हवे असतील तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घ्या. तुमच्या मनाला भावतील असे काही Best आयुष्य Marathi Status On Life. तसंच तुम्हाला कोणाला आयुष्यावर चांगले स्टेटस पाठवायची इच्छा असेल तर तुम्ही Marathi Text Status On Life पाठवू शकता.  

1. आयुष्यात गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते

2. आयुष्यात अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती

ADVERTISEMENT

3. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसते. चांगले दिवसही नाही आणि वाईट दिवसही नाही

4. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे

5. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे

6. आपल्या आयुष्यात, एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका ! कारण जेव्हा अशा व्यक्ती बदलतात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचाच जास्त राग येतो 

ADVERTISEMENT

7. आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी, एवढेच करा. चुकेल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा

8. आयुष्यात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही

9. आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका

10. जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो तोच माणूस काळाच्याही पुढे जाऊ शकतो

ADVERTISEMENT

मराठी कोट्स आयुष्यावर – Deep Meaning Reality Marathi Quotes On Life

मराठी कोट्स आयुष्यावर – Deep Meaning Reality Marathi Quotes On Life

आयुष्यावर बोलायचं झालं तर अनेक गोष्टी असतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात की, अनेकांना आयुष्यात जगणं नकोसं होतं. असं वाटत असताना आयुष्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी आयुष्यावर मराठी कोट्स 

1. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती ही गोष्ट बघून घेईल त्याचा हिशोब तुम्ही करू नका

2. आयुष्यात आपले दुःख मोजक्या 1% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण 50% लोकांना त्याची काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो

3. विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी

ADVERTISEMENT

काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं

4. आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही !

5. हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते. कोणी कसे आहे विचारले तर मात्र मजेत म्हणावे लागते..

आयुष्य एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते

ADVERTISEMENT

6. आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिंमत लागत नाही हिंमत लागते ती तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला

7. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे

8. आयुष्यात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा त्यातून शिकतात

9. आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते. कधी मैत्री हवी असते, तर कधी प्रेम हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते

ADVERTISEMENT

10. आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका. सदैव हसत राहा

आयुष्यावरील यशाचे स्टेटस – Success Marathi Status On Life

आयुष्यावरील यशाचे स्टेटस – Success Marathi Status On Life

आयुष्य जगताना प्रत्येक वेळेला यश मिळेलच असं नाही. कधी कधी सतत अपयशाचा सामनाही करावा लागतो. मग अशावेळी माणूस हतबल होतो. पण प्रयत्न सोडणे योग्य नाही तुम्हीही उत्कृष्ट आयुष्य जगण्यासाठी स्वतःला बळ द्या आणि यशस्वी असे स्टेटस वाचा. 

1. आयुष्यात तुम्ही किती जगता यापेक्षा तुम्ही कसे जगता याला अधिक महत्त्व आहे

2. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे

ADVERTISEMENT

3. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला आयुष्यात वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची

4. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहायला हवे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही

5. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही आणि आयुष्यही तसंच आहे

6. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात

ADVERTISEMENT

7. आयुष्यामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात

8. जर आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा

9. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात

10. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल

ADVERTISEMENT

आयुष्यावरील लेटेस्ट स्टेटेस

आयुष्यावरील लेटेस्ट स्टेटेस – Latest status on life in marathi

सध्या कोणतीही भावना व्यक्त करण्याचं सोपं साधन म्हणजे स्टेटस. तुम्हालाही आयुष्यावरील काही लेटेस्ट स्टेटस ठेवायचे असतील तर नक्की तुम्ही याचा वापर करू शकता 

1. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते 

2. खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल

3. आयुष्यात मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

ADVERTISEMENT

4. जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या

5. आयुष्यात काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव

आयुष्यावर मराठी स्टेटस एसएमएस – Marathi Status On Life Sms

आयुष्यावर मराठी स्टेटस एसएमएस – Marathi Status On Life Sms

1. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं

2. अशा माणसाला कधीच गमावू नका, ज्याच्या मनात तुमच्याविषयी, आदर, काळजी आणि प्रेम असेल

ADVERTISEMENT

3. प्रेम आणि विश्वास, कधीच गमावू नका. कारण प्रेम हे तुम्हाला प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वासदेखील प्रत्येकावर ठेवता येत नाही

4. आयुष्यात जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे

5. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात

आयुष्यावरील मन हेलावून टाकणारे स्टेटस – Sad Marathi Status On Life

आयुष्यावरील मन हेलावून टाकणारे स्टेटस – Sad Marathi Status On Life

आयुष्यात अशा काही घटना घडतात की, आपलं संपूर्ण आयुष्य उलटसुलट होतं. अशा वेळी मनात खूपच त्रास होत असतो. आयुष्यावरील मन हेलावून टाकणारे असे काही स्टेटस 

ADVERTISEMENT

1. तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले

2. हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला

3. वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले

4. खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात

ADVERTISEMENT

5. जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रीतच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे

निष्कर्ष – आयुष्यावरील स्टेटस (Marathi Status On Life) तुम्हालाही आयुष्यात अनेक वेळा प्रेरणा देऊन जातात. तुम्हाला जर आपल्या जवळच्या माणसांना काही आयुष्यावरील कोट्स (Marathi Quotes Of Life) पाठवायचे असतील तर तुम्ही नक्की या लेखाचा आधार घ्या. 

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT