ज्योतिषशास्त्रात मंगळाला विशेष स्थान आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ हा ऊर्जा, धैर्य, स्थावर मालमत्ता, सामर्थ्य, पराक्रम या सर्वांचा कारक ग्रह आहे असे म्हटले जाते. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी आहे. मकर राशीत मंगळ उच्चेचा आहे, तर कर्क राशीत नीचेचा आहे. 7 एप्रिलला मंगळाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मंगळाच्या या बदलामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतील. जर पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असेल तर असे लोक निर्भय आणि धैर्यवान असतात. कुंडलीत मंगळ जर अशुभ स्थितीत असला तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एप्रिल महिन्यात अनेक ग्रहबदल घडणार आहेत, या महिन्यातील पहिला राशी बदल 7 एप्रिल रोजी झाला. 7 एप्रिल रोजी मंगळाचे संक्रमण मकर राशी सोडून कुंभ राशीत झाले. यानंतर 17 मे 2022 पर्यंत मंगळ या स्थितीत आणि या राशीत राहणार आहे. मंगळाच्या संक्रमणाचा वेगवेगळ्या राशींवर कसा परिणाम होईल, हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगल कोणत्या घरात आहे यावर अवलंबून आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीला या ग्रहबदलाचे काय फळ मिळेल.
मंगळ ग्रहाच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे मिळणारे राशीफळ
मेष – काही अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त होऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या. खर्च जास्त होईल पण या सगळ्यात तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
वृषभ – मन अस्वस्थ होऊ शकते. व्यावसायिक समस्यांकडेही लक्ष द्या. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. उत्पन्नाची नवी साधने सापडू शकतील.
मिथुन – धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. बौद्धिक क्रियाकलाप तुमच्या उत्पन्नाचे साधन बनू शकतात. संभाषण करताना संयम बाळगा.
कर्क – मन शांत आणि आनंदी राहील. कार्यक्षेत्रात काही बदल होऊ शकतात. स्थावर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
सिंह – नोकरीत स्थान बदल होऊ शकतो व त्यामुळे तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होईल. पण राग करणे टाळा.
कन्या – स्थावर मालमत्तेमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. पण तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
तूळ – मानसिक शांततेसाठी प्रयत्न करा.धार्मिक यात्रा घडण्याचे योग्य आहेत.आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल . पण काही दुःखदायक घटना घडण्याचे योगही आहेत.
वृश्चिक – मन अस्वस्थ होईल. पण शांत राहा आणि प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. कामानिमित्त बदली होऊन स्थलांतर होण्याची शक्यताही आहे. आर्थिक बाजू चांगली राहील व त्यात सुधारणा होतील.
धनु – धीराने परिस्थितीचा सामना करा.. संभाषण करताना जिभेवरचा ताबा सुटू शकतो . कुटुंबात शांतता आणि सौहार्द राखण्याचा प्रयत्न करा. रखडलेली आर्थिक प्राप्ती होण्याचे योग्य आहेत.
मकर – मनात आत्मविश्वास राहील, पण संयम ठेवा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात व खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ – मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात, परंतु कार्यक्षेत्रात बदल संभवतो. जास्त कष्ट घडण्याचे योग्य आहेत.
मीन – तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल व मन प्रसन्न राहील. पण नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. काम जास्त होईल. वाहनाची काळजी घ्या. वाहनात बिघाड होण्याचे योग आहेत.
वरील राशीफळ हे ढोबळमानाने दिलेले आहे.आपापल्या पत्रिकेप्रमाणे व त्यांतील ग्रहस्थितीप्रमाणे ग्रहबदलांचे वेगवेगळे फळ मिळेल. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक