ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
मसाला चहाचा मसाला

घरीच बनवा मस्त कडक चहासाठी चहा मसाला (kadak Chai Masala Recipe)

 कोणतीही वेळ असो किंवा कोणताही सीझन चहाप्रेमींसाठी कोणत्याही वेळी चहा हे अमृतच असते. आता भर उन्हात एखाद्या चहा टपरीवर गेलात तर तुम्हाला चहाप्रेमी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेताना दिसतील. आता चहा म्हटल्यावर तुम्हालाही मस्त कडक गरम चहा प्यायची इच्छा झाली आहे का? तुम्हाला मसाला चहा प्यायला आवडतो का? रोज रोज बाहेरचा मसाला टाकून चहा पिण्यापेक्षा मस्त घरीच चहाचा मसाला बनवून तुम्हाला चहाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि इतरांना द्यायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही शेअर करत आहोत. चहाचा मस्त चहा मसाला

मसाल्याचा चहा

काही जणांना मसाल्याचा चहा खूपच जास्त आवडतो. आता मसाला चहा आवडण्यामागचे कारण म्हणजे त्यामध्ये असलेले वेगवेगळे मसाले. म्हणजे आता काही जण मसाल्यामध्ये वेलदोडे, आलं, मिरी असा झणझणीत चहा आवडतो. आता चहामध्ये गरम मसाले टाकताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादा मसालाही जरासा जास्त झाला तरी देखील त्याची चव बदलू शकते आणि चहा कडू लागू शकतो. त्यामुळे चहाचे प्रमाण हे नेहमी योग्यच असायला हवे. त्यामुळेच आम्ही चहा मसाला बनवण्यासाठीची परफेक्ट रेसिपी शोधून काढली आहे. 

असा बनवा चहाचा मसाला

मसाला चहा

चहाचा मसाला घरी असलेल्या साहित्यामधून अगदी सहज बनवता येतो. त्यासाठी जाणून घेऊया साहित्य म

साहित्य: 3 मोठे तुकडे सुके आले, ½ जायफळ, 3 चमचे हिरवी वेलची, ¼  चमचा काळीमिरी, 2 मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे 

ADVERTISEMENT

कृती :

  • सुंठाची पावड नसेल तर तुम्ही आधी सुंठ किंवा सुके आले कुटून घ्या. जायफळ ही थोडीशी फोडून घ्या.
  • आता एका मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये  कुटलेले आले,जायफळ घेऊन उरलेले सगळे साहित्य एकत्र करायचे आहे.
  • त्याची पूड करुन घ्यायची आहे. त्याची खूप बारीक पूड वाटली नाही तरी चालते.
  • ती थोडी कोर्स असू द्या. म्हणजे तुम्हाला चहा करताना ती सहज गाळता ही येते.
  • शिवाय त्याचा अर्क खूप चांगला चहामध्ये उतरतो 

आता असा चहा बनवून पाहा. 

दुसऱ्या पद्धतीने चहाचा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य जाणून घेऊया

साहित्य: 40 ते 50 वेलची, 4-5 मोठी वेलची, 2 मोठे चमचे काळीमिरी, 1-2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठा चमचा लवंग, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 छोटे जायफळ

ADVERTISEMENT

कृती: 

  • एका पॅनमध्ये सगळे वरील खडे मसाले घेऊन तुम्ही त्यातील मॉईश्चर काढून घ्या. भाजलेले मसाले साहित्य थंड करुन त्यामध्ये जायफळ कुटून भाजून घ्या. 
  • मिक्सरच्या भांड्यात  सगळे मसाले चांगले वाटून घ्या. तुमचा मसाला चहा तयार. 
  • आता तुम्ही अशाप्रकारे चहाचा मसाला बनवा आणि मस्त गरम गरम चहा प्या. 
18 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT