ADVERTISEMENT
home / Care
रेडिमेड मेंदीपेक्षा मेंदीची पाने आहेत केसांसाठी फारच फायदेशीर

रेडिमेड मेंदीपेक्षा मेंदीची पाने आहेत केसांसाठी फारच फायदेशीर

केसांचे नैसर्गिक हेअर कंडिशनर आणि हेअर कलर अशी मेंदीची ओळख असते. म्हणूनच केसांच्या आरोग्यासाठी अनेक जण मेंदी लावणे पसंत करतात. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडच्या मेंदी मिळतात जे नैसर्गिक असल्याचा दावा करतात. पण उत्तम रंग येण्यासाठी आणि मेंदीच्या पावडरमध्ये काही अंशी केमिकल्स वापरले जातात. जे काहींना अजिबात चालत नाही. मेंदीचा वापर केल्यामुळे केस कोरडे होणे, केस गळणे अशा अनेक तक्रारी आतापर्यंत अनेकांना जाणवल्या आहेत. त्यामुळे मेंदी वापरायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. मेंदी लावण्याची आवड असेल आणि तिचे खरे फायदे तुम्हाला हवे असतील. तर तुम्ही रेडिमेड मेंदीपेक्षा ताजी मेंदी वापरायला हवीत. ताज्या मेंदीच्या पानांपासून तयार केलेल्या मेंदीचा मास्क हा अधिक फायदेशीर असतो. जाणून घेऊया मेंदीच्या पानांची ही कमाल केसांसाठी कशी फायदेशीर ठरते ते

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

मेंदीच्या पानांचे झाड

मेंदीच्या पानांचे झाड

Instagram

ADVERTISEMENT

तुम्ही कधी मेंदीचे झाड पाहिले आहे का? मेंदीचे झाड हे चिकू, सफरचंदासारख्या झाडासारखे मोठे वाढते. त्याला चिंचासारखी बारीक बारीक पाने असतात. मेंदीला म्हणावा तसा रेडिमेड मेंदीसारखा सुगंध नसतो. इतर कोणत्याही पानांप्रमाणे त्याला पानांसारखाच वास येतो. मेंदीमध्ये निलगिरीचे तेल घातल्यानंतरच त्याला असा सुगंध येतो. जो अनेकांना आवडतो.ताजी मेंदी वाटली की, त्याचा रंग जो येतो. तो असतो खरा मेंदीचा रंग.

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

मेंदीच्या ताज्या पानांचे फायदे

मेंदीच्या ताज्या पानांचे फायदे

Instagram

ADVERTISEMENT

मेंदीचे झाड तुम्ही आणले असेल आणि त्याची मेंदी बनवून तुम्ही केसांना लावण्याचा विचार करत असाल तर अशा ताज्या मेंदीचे फायदे जाणून घेऊया. 

  • ताज्या पानांना घेऊन ती छान कुटून घ्या. जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटता आले तर फारच उत्तम पानं चांगली कुटून घेतल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा दही घालून ही ताजी मेंदी तशीच ठेवून दिली आणि थोड्यावेळानंतर केसांना लावली की, केसांना उत्तम रंग येतो. शिवाय केस छान मोकळे आणि सिल्की होतात. 
  • खरी मेंदी असेल तर ती तुम्हाला थंडावा देण्याचे काम करते. मेंदी लावल्यामुळे तुम्हाला छान झोप येते. 
  • मेंदीमध्ये कोणताही आर्टिफिशल रंग  किंवा केमिकल्स असत नाही. त्यामुळे याचा रंग थोडासा लालसर छटा येईल असा असतो. 
  • मेंदीच्या पानांपासून तयार केलेली मेंदी तुमचे पांढरे केस रंगवू शकेल याची 100 % खात्री देता येत नाही. पण याचा रंग फारच सुंदर असतो. जो तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. 
  • नैसर्गिक मेंदी ही उत्तम कंडिशनर तर असतेच. पण याच्या वापरामुळे केसांना सुंदर शाईन मिळते. केसांची वाढ होण्यासाठी स्वच्छ स्काल्प ही मेंदीमुळे मिळते. 

आता मेंदीचे फायदे  वाचल्यानंतर मेंदीची ताजी पानं वापरण्याचा विचार केला असेल तर तुम्ही मेंदीची पानं कुटून त्यामध्ये निलगिरी, लिंबाचा रस घालून त्याचा वापर थेट केसांसाठी करु शकता. 

केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा

03 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT