ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
mercury transit 2022

ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा 

ज्योतीष शास्त्राच्या दृष्टीने हा ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रह राशी परीवर्तन करणार आहेत. सध्या सणांचा राजा श्रावण महिना सुरु आहे. आणि या महिन्यात अनेक सण आपण साजरे करतो. याच काळात अनेक ग्रहबदल झाल्याने जातकांच्या आयुष्यावरही प्रभाव पडणार आहे. ऑगस्ट महिना सुरू होताच बुध ग्रह राशी बदलत आहे. याशिवाय सूर्य आणि शुक्र हे ग्रहही या महिन्यात भ्रमण करत आहेत. जाणून घ्या या ग्रहबदलांमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे. 

बुध ग्रहाचे संक्रमण 

ज्योतिष शास्त्रानुसार 1 ऑगस्ट रोजी सकाळी पहिला ग्रह बदल झाला आहे. या दिवशी, ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने 1 ऑगस्ट रोजी पहाटे 03:45 वाजता कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश केला आहे. यानंतर 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11.8 वाजता  तो पुन्हा कन्या राशीत प्रवेश करेल.बुध 26 ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील आणि नंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

शुक्र संक्रमण

या महिन्यात होणारा दुसरा ग्रहबदल म्हणजे 7 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह मिथुन रास सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच 31 ऑगस्टला शुक्र पुन्हा राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल.

Mercury Transit 2022
Mercury Transit 2022

सूर्याचे संक्रमण 

या महिन्यात सूर्याचे संक्रमण देखील होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य हा कर्क रास सोडून सिंह राशीत 17 ऑगस्टला प्रवेश करत आहे. त्यानंतर एक महिनाभर या राशीत वास्तव्य केल्यानंतर शुक्रवार, 17 सप्टेंबर 2022 रोजी सूर्यदेव रात्री उशिरा 01 वाजून 02 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करतील.

ADVERTISEMENT

मंगळ ग्रहाचे संक्रमण

ज्योतिष शास्त्रानुसार 10 ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह देखील आपली राशी बदलून मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. यानंतर 16 ऑक्टोबरपर्यंत तो या राशीत राहील.

ऑगस्टमधील ग्रहांच्या बदलांचा राशींवर होणारा प्रभाव

Mercury Transit 2022
Mercury Transit 2022

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल आणि नोकरीत प्रमोशनही मिळू शकेल. परंतु या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र हा चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी मानला जातो. हे स्थान आनंदी नातेसंबंध, वैवाहिक सौहार्द आणि प्रगतीचे लक्षण आहे. शुक्र हा संवादाचा देखील कारक ग्रह मानला जातो. शुक्राच्या संक्रमणामुळे समाजात तुमचा दर्जा कायम राहील. नातेसंबंध सुधारतील. कामामुळे काही मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य हा राशीचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याचे संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला मान, कीर्ती आणि प्रसिद्धी मिळेल. तुमची कार्यक्षमता तुम्हाला यश देईल. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमणामध्ये सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे संवाद साधताना सतर्क राहणे. सिंह राशीचे विवाहित लोकांना या काळात आपल्या जोडीदाराबरोबर प्रवास योग्य संभवतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला बुधही सिंह राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये बुध प्रथम भावात भ्रमण करत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासोबतच नोकरीतही लाभ मिळेल.

ADVERTISEMENT

टीप – ग्रहबदल होत असल्याने कोणत्या राशीच्या जातकांना काय फळ मिळेल त्याबद्दल हा सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक जातकाला आपापल्या पत्रिकेप्रमाणे ग्रहबदलांचे फळ मिळते. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा. 

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT