ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
3-best-ingredients-for-sensitive-skin

संवेदनशील त्वचेसाठी 3 महत्त्वाचे घटक, घेतील त्वचेची काळजी

संवेदनशील त्वचा असणं म्हणजे अत्यंत काळजी घ्यावी लागते. विशेषतः कोणतेही उत्पादन वापरणे हे संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी खूपच आव्हानात्मक असते. त्वचेला योग्य हायड्रेशन मिळणेही गरजेचे आहे. नैसर्गिक उत्पादन वापरणे हे संवेदनशील त्वचेसाठी अधिक सोपे आणि उपयोगी ठरते. याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. रंग, केमिकल्स आणि अन्य आर्टिफिशियल सुगंधांमुळे संवेदनशील त्वचेला त्रास होतो. त्वचेची जळजळ, रॅश येणे यापासून वाचण्यासाठी नैसर्गिक घटक त्वचेसाठी उत्तम ठरतात. संवेदनशील त्वचेची काळजी कशी घ्यायची याची माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. तुम्ही तुमच्या त्वचेच्या टाईप आणि काळजीसाठी टोनर, सीरम अथवा तेल, मॉईस्चराईजरचा शोध घेत असाल तर तुम्ही नैेसर्गिक घटकांचा यासाठी वापर करू शकता. 3 अत्यंत नाजूक आणि तितकेच परिणामकारक घटक तुमच्या संवेदनशील त्वचेसाठी (Sensitive Skin) उपयुक्त ठरतात. संवेदनशील त्वचेला पोषण देण्याचे काम हे तिन्ही घटक करतात. जाणून घेऊया हे कोणते घटक आहेत आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येतो. 

कोरफड (Aloe Vera)

aloe-vera

कोरफड हे त्वचेसाठी एक वरदान समजण्यात येते आणि त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येवर याचा चांगला परिणामकारक उपयोग करून घेता येतो. त्वचेसाठी एक उत्तम उपाय म्हणून कोरफडचा उपयोग होतो. विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी याचा चांगला उपयोग होतो. 

साहित्य 

  • कोरफड जेल – 2 मोठे चमचे 
  • आरगन ऑईल – 1 मोठा चमचा 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात कोरफड जेल आणि आरगन ऑईल घेऊन मिक्स करा 
  • हे मिश्रण तुम्ही मॉईस्चराईजर म्हणून तुमच्या त्वचेला लावा 
  • दिवसा अथवा रात्री कोणत्याही वेळी तुम्ही याचा उपयोग करू शकता 

कोरफडचे फायदे 

  • सर्वात कोमल आणि सर्वात अधिक त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे साहित्य म्हणजे कोरफड. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी याचा उपयोग होतो 
  • यामध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असून त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच त्वचेमधून कोरडेपणा काढून टाकण्यासही मदत मिळते 
  • तुम्हाला कोरफडचे ताजे जेल मिळत नसेल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या कोरफड जेलचा वापर त्वचेसाठी करू शकता 
  • बदलत्या ऋतूमध्ये त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, त्वचा पातळ झाल्यास, कोरफडमधील मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन्सचे कॉम्बिनेशन त्वचा अधिक हायड्रेट आणि मऊ – मुलायम करण्यास मदत करते
  • कोरफडमध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे त्वचेवर येणारे रॅश, सूज अथवा खाजेसारखी समस्या शांत करण्यास मदत करतात

ग्रीन टी (Green Tea)

green-tea

ग्रीन टी चा अर्क हा आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे संवेदनशील त्वचेसाठीही उपयुक्त आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणांनी उपयुक्त ग्रीन टी चा अर्क हा त्वचेसाठी अद्भुत घटक ठरतो. त्वचा अधिक सुंदर करण्यासाठी त्वचेला केवळ 15 मिनिट्स द्या. 

साहित्य 

  • 1 ग्रीन टी बॅग
  • जोजोबा ऑईलचे काही थेंब 

बनविण्याची विधी 

ADVERTISEMENT
  • एक कप गरम पाण्यात ग्रीन टी बॅग बुडवा 
  • टीबॅग नंतर काढा आणि त्यात जोजोबा तेलाचे थेंब टाकून मिक्स करा 
  • आता एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि हे हायड्रेटिंग मिस्ट तुम्ही संपूर्ण चेहऱ्यासाठी वापरा
  • वापरताना हे मिश्रण संपूर्ण हलवून घ्या 

ग्रीन टी चे फायदे 

  • संवेदनशील त्वचेसाठी हिरव्या चहाचा पाने अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्वचेला अधिक तेज आणण्यासाठी याचा उपयोग होतो 
  • कॅटेचिन आणि अँटिबॅक्टेरियल घटकांनीयुक्त अशी ग्रीन टी चे पाने चेहऱ्यावरील सूज आणि लालिम कमी करण्यास मदत करतात 
  • संवेदशील त्वचा असणाऱ्यांना बऱ्याचदा रॅश आणि लालिमाच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यासाठी याचा चांगला उपयोग करून घेता येतो 

मध 

honey

मधामध्ये नैसर्गिक स्वरूपात अँटिबॅक्टेरियल आढळतात, जे चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांशी दोन हात करतात. अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने, त्वचेला नुकसान पोहचवणाऱ्या धुळीच्या कणांशीही मध लढा देते. त्यामुळे त्वचा संवेदनशील असेल तुम्ही याचा नक्की वापर करावा. 

साहित्य 

  • 1 मोठा चमचा मध 
  • 1 मोठा चमचा कच्चे दूध 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात मध आणि कच्चे दूध घ्या 
  • दोन्ही नीट मिक्स करा 
  • रोज क्लिंन्झरप्रमाणे याचा वापर करा 

मधाचे फायदे 

  • अँटिऑक्सिडंट्सने युक्त असणारे मध हे एक मॉईस्चराईजिंग घटक आहे. जे बॅक्टेरिया आणि सूज घालविण्यास फायदेशीर ठरते. तसंच त्वचेला कोरडे होण्यापासूनही वाचवते 
  • हे एक नैसर्गिक चांगला घटक असून हवेतील दमटपणा खेचण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होते
  • चेहऱ्यावरील अतिरिक्त सीबम अर्थात तेल काढण्यास याची मदत मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद राहतात आणि पिंपल्स येणे कमी होते 
  • हा घटक तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवा. त्वचा संवेदनशील असूनही तुम्ही याचा डायरेक्ट वापर करू शकता अथवा कोणत्याही घटकासह तुम्ही मिक्स करून याचा वापर करू शकता. मधाचा वापर करून पिंपल्सही दूर होतात.

सूचना – हे सर्व घटक नैसर्गिक आहेत हे मान्य असले तरीही तुम्हाला कोणत्याही घटकाचा त्रास होत असल्यास, वापरू नये. कोणताही घटक वापरण्याआधी पॅच टेस्ट करून घ्यावी. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे योग्य वापर करावा. 

24 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT