ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
skin-care-tips-after-holi-protect-your-skin-from-colours

होळीनंतर घ्या आपल्या त्वचेची अशी काळजी, नाही होणार खराब

होळी अगदी (Holi 2022) जवळ आली आहे आणि या सणाची तयारी सगळीकडेच आता सुरू झाली आहे. अबीर, गुलाल, मिठाई, पुरणपोळी अशा एक ना अनेक गोष्टींची तयारी आपल्याकडे आधीच सुरू होते. पण होळी अर्थात रंगपंचमी खेळण्यापूर्वी आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी याचीही खबरदारी घ्यायला हवी. होळीच्या आधी त्वचेची काळजी (Skin Care) कशी घ्यायला हवी याची महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. काही टिप्स वापरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अंगावरील रंगही काढू शकता आणि यामुळे तुमची त्वचा खराबदेखील राहणार नाही. होळीमध्ये रंगांची उधळण केल्यानंतर त्वचा अधिक कोरडी होते आणि रंगातील केमिकल्स हे त्वचेमधी पोर्समध्ये अडकून राहतात. ज्याचा परिणाम त्वचेवर अनेक दिवस दिसून येतो. अशा परिस्थितीत काही जण अंग रगडून रंग काढण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे त्वचा अधिक खराब होते आणि याचा परिणाम अनेक दिवसांपर्यंत राहतो. या सगळ्यापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीचा वापर करायला हवा आणि त्याबाबत काही टिप्स. 

असा काढा रंग (How to Remove Holi Colour)

रंगांची उधळण होळीमध्ये करून झाल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे रंग काढण्याचा. हा रंग काढण्याची सोपी पद्धत आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपले शरीर व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्या. जेणेकरून तुमच्या त्वचेवर मऊपणा येईल. कारण रंग लागल्यावर त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचा न रगडता तुम्ही थोडा वेळ पाण्यात असेच राहा आणि नंतर साबण लावा. तसंच तुम्ही एखाद्या नैसर्गिक फेसवॉशचाही उपयोग करू शकता. तर होळी खेळायला जाण्यापूर्वी तुम्ही अंगाला नारळाचे तेल लावा. यामुळे रंग शरीरावर जास्त काळ टिकणार नाही. 

दही आणि लिंबाचा करा असा उपयोग 

त्वचेमध्ये मऊपणा आणण्यासाठी आणि रंगाचा त्रास होऊ नये यासाठी दही आणि लिंबाचा वापर करायला हवा. यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये 2 चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्ही रंग लागलेल्या भागावर लावा. काही वेळ हे तसंच राहू द्या. या मिश्रणामुळे तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. दह्यातील पोषक तत्व आणि लिंबाच्या रसातील अँटिऑक्सिडंट्स हे रंग काढण्यास मदत करतात. थोड्या वेळानंतर आंघोळ करा. त्वचेवरील सर्व रंग निघून गेलेला तुम्हाला दिसून येईल. 

क्लिन्झिंग एजंटचा करा वापर 

चेहरा धुतल्यानंतर तुम्ही एकदा कॉटन अर्थात कॉटन कपडा अथवा उत्तम पर्याय म्हणजे कापसाने क्लिन्झिंग एजंट चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा योग्य पद्धतीने मॉईस्चराईज होईल आणि चेहऱ्यावरील उरलासुरलेला रंगदेखील निघून जाईल.  

ADVERTISEMENT

आंघोळीनंतर असे करा 

होळीच्या रंगामुळे त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर टॉवेलने खसखसून अंग पुसण्यापेक्षा शरीर थपथपवून तुम्ही सुकवा आणि त्यानंतर त्वरीत बॉडी लोशनचा वापर करा. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते. शरीर कधीही टॉवेलने रगडून पुसू नये हे लक्षात ठेवा. यामुळे त्वचेला हानी पोहचते. त्वचेवर रॅश येऊ शकतात अथवा त्वचेला खाज येऊ शकते.

उन्हात निघू नका

सर्वात महत्त्वाची आणि केवळ रंगांच्या बाबतीच नाही तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायची टीप म्हणजे उन्हात निघू नका. तुमच्या त्वचेमधून रंग पाणी खेचून घेते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहात नाही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर त्वरीत उन्हात निघू नका. अन्यथा शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईज करणे अत्यंत गरजेचे आहे. 

वापरा बदामाचे तेल

Organic Oil

होळीचे रंग हे त्वचा अधिक कोरडी करतात आणि यासाठी उत्तम उपाय म्हणजे 100% ऑर्गेनिक बदामाचे तेल तुम्ही वापरू शकता. नैसर्गिक घटक असणारे विटामिन ई, बी आणि ए असल्याने याचा अधिक चांगला उपयोग होतो. तसंच मॉईस्चराईजर म्हणून अधिक चांगला उपयोग होतो. त्वचा आणि केस दोन्हीसाठी याचा उपयोग होतो.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
15 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT