ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
मोगऱ्याच्या फुलांपासून बनवा त्वचेसाठी बेस्ट फेसमास्क

मोगऱ्याच्या फुलांपासून बनवा त्वचेसाठी बेस्ट फेसमास्क

मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळायला अनेकींना आवडत असेल. मोगऱ्याचा गजरा तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. मात्र एवढंच नाही या फुलांचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील करू शकता. मोगऱ्याच्या फुलामध्ये एवढे फायदेशीर गुणधर्म असतात की त्याच्यापासून बनवलेल्या फेसमास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात. मोगऱ्याच्या फुलांमध्ये नैसर्गिक अॅंटि सेप्टिक आणि मॉइस्चराईझर असतात. यासाठी मोगऱ्याचं पाणी तुम्ही नियमित त्वचेसाठी वापरू शकता. मोगऱ्याची ताजी फुलं काही वेळ पाण्यात भिजत ठेवा आणि ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये  भरून नियमित त्वचेसाठी वापरा.पण त्याआधी जाणून घ्या मोगऱ्याच्या फुलांमुळे त्वचेवर काय चांगले परिणाम होतात. 

त्वचेसाठी असा वापरा मोगरा

मोगऱ्याच्या फुलापासून तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या दूर करणारे फेस पॅक बनवू शकता. यासाठी जाणून घ्या फायदे

नैसर्गिक अॅंटि सेप्टिक –

मोगऱ्याच्या फुलांमध्ये अॅंटि सेप्टिक गुणधर्म असल्यामुळे ज्यामुळे ते तुमच्या त्वचेवर नैसर्गिक अॅंटि सेप्टिकप्रमाणे काम करते.  यातील बेनजॉनिक अॅसिड आणि बेन्जोनेटमुळे तुमच्या त्वचेच्या फंगल आणि इतर इनफेक्शनच्या समस्या दूर होतात. शिवाय यात थंडावा निर्माण करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचा दाह होत नाही. त्वचेच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी त्वचेवर मोगऱ्याचे पाणी स्प्रे करा.

त्वचा कोरडी होण्यापासून वाचवा –

मोगऱ्याचे पाणी नैसर्गिक हिलर असते. त्वचेला त्यामुळे आराम मिळतो. एवढंच नाही तर यात असलेल्या पोषक गुणधर्मांमुळे त्वचेचं पोषण होतं ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. जर तुमच्या त्वचेवर ब्रेकआऊट असतील तर तुम्ही ते बरे करण्यासाठी मोगऱ्याचं पाणी त्वचेला लावू शकता.

ADVERTISEMENT

एजिंगच्या समस्या कमी होतात –

जर तुम्ही वेळीच त्वचेची काळजी घेतली नाही तर एजिंगच्या समस्या कमी होतात. मोगऱ्यामध्ये नैसर्गिक अॅंटि एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा कायम फ्रेश राहते. यासाठीच नियमित तुमच्या स्कीन केअर रूटिनमध्ये मोगऱ्याच्या फुलांचे पाणी वापरण्यास सुरुवात करा. मोगऱ्याच्या फुलांमुळे कोलेजीनच्या निर्मितीला उत्तेजन मिळते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स येत नाहीत.

मॉइस्चराईझरप्रमाणे करा वापर –

मोगऱ्याचे पाणी तुम्ही नैसर्गिक मॉइच्सराईझर म्हणून वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेमधील ओपन पोअर्स बंद होणार नाहीत. मोगऱ्याचं पाणी तुमच्या त्वचेत मुरल्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा आणि टवटवीतपणा मिळेल. यासाठी अंघोळ झाल्यावर त्वचेवर मोगऱ्याचं पाणी लावा. याचप्रमाणे मोगऱ्याची फुलं, मध आणि गुलाबपाणी एकत्र वाटून त्याचा फेसमास्क चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासाने चेहरा थंड पाण्याने धुवा. 

काळे डाग होतात दूर –

त्वचेच्या समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्यांना महिलांना जाणवते  ती म्हणजे डार्क सर्कल्स  आणि चेहऱ्यावरील काळे डाग. पण काळजी करू नका कारण मोगऱ्याच्या पाण्यामुळे तुमची ही समस्यापण कमी होईल. तुम्ही चेहऱ्यावर नियमित मोगऱ्याचं  पाणी लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आपोओप कमी होतात. शिवाय त्वचा नितळ आणि स्वच्छ होते. 

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा –

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

ADVERTISEMENT

फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक

 

28 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT