ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Monsoon Care Tips For Wooden Furniture

पावसाळ्यात घरातील लाकडी फर्निचरची काळजी घ्या, अशी करा स्वच्छता 

आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात काही ना काही फर्निचर असते. सुंदर आणि नीटनेटके फर्निचर घराच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे बहुतांश लोकांना आपल्या घरात सुंदर फर्निचर असावे असे वाटते. हे डिझायनर फर्निचर जितके सुंदर दिसते तितकेच त्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. या लाकडी फर्निचरची काळजी न घेतल्यास ते खराब होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे लाकडी फर्निचरही रोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. खास करून पावसाळ्यात तर लाकडी फर्निचरची विशेष काळजी घ्यावी लागते. 

पावसाळ्यात लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी 

Monsoon Care Tips For Wooden Furniture
Monsoon Care Tips For Wooden Furniture
  • तुमचे लाकडी फर्निचर दारे आणि खिडक्यांपासून दूर हलवा जेथे ते पावसाच्या थेंबांच्या किंवा गळणाऱ्या पाण्याच्या संपर्कात येणार नाही. नायलॉनच्या जाळीच्या किंवा रंगवलेल्या धातूच्या खुर्च्या देखील पावसाळ्यात घरामध्ये ठेवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना तडे पडू नयेत किंवा त्यांचा रंग खराब होऊ नये. 
  • घर स्वच्छ ठेवल्याने तुमच्या घरातील लाकडी फर्निचरसाठी योग्य आर्द्रता पातळी राखण्यास मदत होईल.
  • घरातील लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ओले कापड वापरू नका. त्याऐवजी ते पुसण्यासाठी कोरडे आणि स्वच्छ कापड वापरा. धूळ ओलावा शोषून घेते आणि यामुळे लाकडाचे फिनिशिंग खराब होऊ शकते.
  • तुमचे फर्निचर नेहमी भिंतीपासून काही इंच दूर ठेवा. पावसाळ्यात भिंती ओलसर होतात आणि हा ओलावा फर्निचरमध्ये शोषला जाऊ शकतो. 
  • पावसाळ्यात ओलावा शोषून घेतल्याने लाकडी फर्निचर फुगते. यामुळे ड्रॉवर्स आणि दरवाजे उघडताना किंवा बंद करताना अडकतात. फर्निचरला तेल लावून किंवा वॅक्सिंग करून हे टाळता येते. नीटनेटक्या आणि स्वच्छ फिनिशसाठी स्प्रे-ऑन-वॅक्स वापरता येऊ शकेल. 
  • पावसाळ्यात घरात कोणतेही नूतनीकरण किंवा सुशोभीकरणाचे काम सुरू करू नका कारण पेंटिंग आणि पॉलिशिंग सारख्या गोष्टी जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात व्यवस्थित होऊ शकत नाहीत. यामुळे तुमचे लाकडी फर्निचर खराब होऊ शकते. 
  • कापूर किंवा डांबराच्या गोळ्या या आर्द्रता चांगल्यापैकी शोषून घेतात. ते कपड्यांचे तसेच वॉर्डरोबचे वाळवी आणि इतर कीटकांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. तुम्ही वॉर्डरोबमध्ये कडुलिंबाची पाने किंवा लवंगा देखील ठेवू शकता.
  • लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ आणि हलका ब्रश वापरावा. अनेक वेळा कठोर ब्रशने साफ केल्याने लाकडी फर्निचरवर ओरखडे उमटतात.

लाकडी फर्निचरची स्वच्छता कशी करावी 

लाकडी फर्निचरची रोज साफसफाई न केल्यास आणि काळजी न घेतल्यास फर्निचर जुने व घाण दिसू लागते. कधीकधी चहा किंवा असे काही पदार्थ फर्निचरवर सांडतात ज्यामुळे त्यावर डाग पडतात. त्यामुळे फर्निचरची चमक कमी होऊ लागते. लाकडी फर्निचरच्या साफसफाईची वेळोवेळी काळजी घेतली नाही तर वाळवी लागल्याने किंवा ओरखडे उमटल्याने व इतर कारणांमुळे फर्निचर अस्वच्छ दिसते. पुढील क्लिनिंग हॅक्स वापरून तुम्ही लाकडी फर्निचरची स्वच्छता करू शकता. 

Monsoon Care Tips For Wooden Furniture
Monsoon Care Tips For Wooden Furniture

लिंबाचा रस वापरा 

लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो. यासाठी लिंबाचा रस काढून त्यात कापड बुडवा आणि फर्निचर सर्व बाजूंनी घासून स्वच्छ करा. यामुळे फर्निचरवर साठलेली घाण पटकन साफ होईल.

मिनरल ऑइलने पेंट करा

जर लाकडी फर्निचर खूप जुने असेल आणि ते खराब दिसू लागले असेल तर ते मिनरल ऑईलने रंगवा. यामुळे ते पुन्हा नवीन दिसू लागेल. जर लाकडी फर्निचरला वाळवी लागली असेल तर ती देखील निघून जाईल. 

ADVERTISEMENT

ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने स्वच्छ करा 

लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी लाकडी फर्निचरवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल स्प्रे करा आणि कापडाच्या मदतीने ते पुसून घ्या. 

अशा प्रकारे पावसाळ्यात लाकडी फर्निचरची काळजी घ्या. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT