ADVERTISEMENT
home / Women's Safety
तुम्हीही असे सोपे पासवर्ड ठेवता,मग तुमचेही अकाऊंट होऊ शकते हॅक

तुम्हीही असे सोपे पासवर्ड ठेवता,मग तुमचेही अकाऊंट होऊ शकते हॅक

कोणत्याही अकाऊंटे पासवर्ड सेट करणे म्हणजे डोक्याला ताप असते. म्हणजे काहीजण सहज लक्षात राहावा म्हणून अगदी सोपा पासवर्ड ठेवतात. तो पासवर्ड इतक सोपा असतो की, समोरची व्यक्ती तुमचा आळशीपणा ओळखून तुमचा पासवर्ड ओळखते. पण आता अनेक जण मोबाईल बँकिंग, गुगल पे (Google pay), भिम(Bhim) असे अॅप फोनमध्ये ठेवतात. तुमच्या आयुष्याची जमापुंजी ज्या बँकमध्ये तुम्ही ठेवता. ती सहजासहजी कोणाकडे जाऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड थोडा आणि वेगळा ठेवायला हवा.

तुमचा पासवर्ड यापैकी एक नाही ना?

  • 12345
  • 123456789
  • 9999
  • Birthdate
  • Iloveyou
  • Ihateyou
  • Password123
  • Abcd
  • 0000
  • 789
  • Abc123
  • 1111
     

 *हे असे पासवर्ड आहेत जे सहज हॅक होऊ शकतात. तुम्ही नाही ना तुमच्या फोनचा पासवर्ड इतका सोपा तर ठेवला नाही ना?

 लगेच बदला पासवर्ड

PASSWORD

आता तुम्हाला लगेच एक गोष्ट करायची आहे. ते म्हणजे तुम्हाला लगेचच पासवर्ड बदलायचा आहे. सायबर क्राईमने दिलेल्या गाईडलाईननुसार तुम्हाला तुमच्या पासवर्डमध्ये अंडरस्कोर (_), नंबर (1,2,3….), कॅपिटल आणि स्माॅल लेटर (A,a) याचा समावेश करणे गरजेचे असते. त्यामुळे किमान महत्वाचे पासवर्डतरी तुम्ही अशाच पद्धतीने सेट करा.

ADVERTISEMENT

एटीएमचा पीन ठेवतानाही सावधान

 एटीएमचा पीन तुम्ही ठेवतानाही तेवढीच काळजी घ्यायला हवी. तुम्ही तुमचा चारअंकी गाडीचा नंबर, तुमचा सगळ्यांना माहीत असलेला लकी नंबर तुमचा पासवर्ड म्हणून कधीच ठेवू नका. तुमच्यावर नजर ठेवणाऱ्यांना तो पासवर्ड सहज कळू शकतो त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पासवर्ड ठेवणे गरजेचे आहे.

पासवर्ड बदलण्याची घ्या तसदी

change password

अनेकांना कित्येक वर्ष एकच पासवर्ड ठेवायची सवय असते पण तसं करु नका तुम्हाला जर तुमची सगळी अकाऊंटस सुरक्षित हवी असतील.तर तुम्ही तुमचा पासवर्ड काही महिन्याच्या फरकाने बदलत राहा. तुम्हाला पासवर्ड लक्षात राहात नसेल तर फोनमध्ये सेव्ह करा. त्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात राहण्यास मदत होईल.

फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करताना

आता फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करणं म्हणजे स्वत:च चोरांना आमंत्रण देणे असे होते. पण तुम्हाला तो पासवर्ड सेव्ह करताना अत्यंत हुशारी बाळगायची आहे. तुमचा पासवर्ड जर मेलआयडीचा असेल तर तो कॉन्टॅक्ट प्रमाणे सेव्ह करा. तर एटीएमचा पीन तुम्ही 10 अंकी मोबाईलमध्ये सेव्ह करा त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड शोधणे अधिक सोपे जाईल.

ADVERTISEMENT

कोणालाही देऊ नका माहिती

घरातील कोणत्याही विश्वासू व्यक्तिला वगळता तुमचा पासवर्ड कोणासोबतही शेअर करु नका. हल्ली सायबर गुन्ह्यातून असे समोर आले आहे की, फेक फोन कॉलवर अनेकांनी आपल्या बँक डिटेल्स दिल्या आहेत आणि आपले अकाऊंट रिकामे करुन घेतले आहे. त्यामुळे कोणासोबतही फोनवर काहीही शेअर करु नका. तुमच्या कार्डाचा नंबर, त्यावरील CVV क्रमांक आणि पीन शेअर केल्यामुळे अगदी काहीच सेंकदात तुमच्या अकाऊंटमधून सगळा पैसा काढून टाकता येतो. जो तुम्हाला परत कधीही मिळू शकत नाही. त्यामुळेच तुम्ही कोणासोबतही पासवर्ड शेअर करु नका.

(सौजन्य- Instagram)

24 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT