टेलिव्हिजनवरील मिसेस मुख्यमंत्री मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेची लोकप्रियता आता एका विलक्षण वळणावर आली आहे. ज्यावरून ती प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे हे नक्कीच सिद्ध होत आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी आणि समर या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्याच वाटतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतात. नुकतंच या दोघांनी एक खुषखबर त्यांच्या टीमसोबत अशा पद्धतीने सेलिब्रेट केली.
मिसेस मुख्यमंत्री मालिकेसाठी खुषखबर
प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच 200 भागांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. 200 भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणारच… 201 व्या भागाचं काम चालू करायच्या आधी संपूर्ण टीमचं जिच्यामुळे ही मालिका यशस्वीरित्या 200 भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. आभार प्रदर्शनानंतर सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केक भरवण्यात आला. या मालिकेवर मराठी प्रेक्षकांचं निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काहीच शंकाच नाही. या मालिकेतील कलाकारांनी सांगीतलं की, “कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे ”
मिसेस मुख्यमत्री मालिकेचं यश
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेला चाहत्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. एवढंच नाही या मालिकेतील सुमी आणि समरचं पात्र प्रेक्षकांना अगदी आपल्या घरातीलच वाटत आहे. या मालिकेत समर आणि सुमी हे लव्ह कपल दाखवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री असलेला समर एका खानावळ चालवणाऱ्या सुमीच्या प्रेमात पडतो. दोन भिन्न स्वभाव आणि लाईफस्टाईलच्या व्यक्तींमध्ये होणारं प्रेम, लग्न आणि लग्नानंतरच्या गमतीजमती असं या मालिकेचं कथानक आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून सुमी आणि समरच्या लग्नाची धुम दाखवण्यात आली होती. अगदी प्री-वेडिंग फोटोशूटपासून लग्नाच्या वरातीपर्यंतचे सर्व विधी असा थाटमाट या मालिकेतून दाखवण्यात आला. मिसेस मुख्यमंत्री मालिकेत समरची भूमिका अभिनेता तेजस बर्वे तर सुमीची भूमिका अभिनेत्री अमृता धोंगडे साकारत आहे. अमृताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ज्यामुळे आता ती सुमी या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. साधी, भोळी मात्र हुशार असलेली सुमी प्रेक्षकांना सध्या फारच आवडत आहे. ही सुमी साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे ही मुळची कोल्हापूरमध्ये राहणारी आहे. तिने तिचं शालेय शिक्षण पुण्यातून केलं आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेत काम करण्यापूर्वी तिने एका मराठी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं नाव मिथुन असं होतं. मात्र मिसेस मुख्यमंत्री ही मालिका तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरली.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक
कार्तिकनं सारासोबतचा ‘हा’ व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा
‘बस्ता’तील अजयनं गायलेलं ‘फुल झुलत्या येलीचं’ गाणं रिलीज