ADVERTISEMENT
home / xSEO
मुंग्या येणे उपाय

मुंग्या येणे लक्षणं आणि घरगुती उपाय (Mungya Yene Upay In Marathi)

सध्याचे लाईफस्टाईल पाहता अनेक आजारांनी आपण सगळेच त्रस्त आहोत. वजन वाढणे, निद्रानाश अशा काही गोष्टींचा त्रास हा नव्या लाईफस्टाईलमध्ये होऊ लागला आहे.  यामध्येच एकाजागी सतत बसून होऊ लागलेला त्रास म्हणजे मुंग्या येणे हल्ली (Mungya Yene) ही समस्या वाढलेली आहे. मुंग्या येणे याला इंग्रजीमध्ये ‘पॅराथिसिया’ असे म्हटले जाते. डोक्यात मुंग्या येणे (Dokyat Mungya Yene) यामागेही काही कारणं नक्कीच आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे नक्कीच गरजेचे झाले आहे. जर तुम्ही मुंग्या येणे त्रासाने ग्रासलेले असाल तर तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय माहीत असायला हवे. याशिवाय मुंग्या का येतात (Mungya Ka Yetat) याची कारणे देखील माहीत असायला हवी. तरच त्याचा फायदा होण्यास आपल्याला मदत होईल.

मुंग्या येणे कारण (Mungya Yene In Marathi)

Mungya Yene

मुंग्या येण्याचा त्रास हा होण्यामागे काही कारणं असतात. ही नेमकी कारणं कोणती आणि मुंग्या येणे कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही काय चुका करता हे तुम्हाला कळेल.

एका जागी बसून राहणे

खूप जणांच्या कामाचे स्वरुप हे बसून आहे. लॅपटॉपवर बसून किंवा स्क्रिनसमोर बसून सतत काम करावे लागत असल्यामुळे किती तास बसून राहतो. हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच अनेकदा मुंग्या येण्याची समस्या होते. जर तुम्ही एका जागी बसून काम करत असाल तर तुम्हाला याचा त्रास नक्की होऊ शकतो.

अपुरा रक्तपुरवठा

रक्त पुरवठा खंडीत झाल्यामुळेच मुंग्या येण्याचा त्रास होतो. त्यामुळे मुंग्या येण्याचे हे एक कारण असू शकते. अपुरा रक्त पुरवठा हा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला की तरी देखील त्याचा परिणाम रक्त पुरवठ्यावर होतो. 

ADVERTISEMENT

 मायग्रेन किंवा डोकेदुखी

डोकेदुखीचा त्रास तुम्हाला असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला मुंग्या येऊ शकतात. मायग्रेनची डोकेदुखी ही फारच वेगळी असते. त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा होताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे जर तुम्हाला मायग्रेन किंवा डोकेदुखी होत असेल तर साहजिकच आहे तुम्हाला मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाली तरी देखील मुंग्या येण्याचा त्रास होतो.  विशेषत: व्हिटॅमिन B12  ची कमतरता असेल तर ती देखील काही शारीरिक त्रासांना आमंत्रण देते. मुंग्या येण्याच्या त्रासामध्ये याचादेखील समावेश केला जातो.

डायबिटीस

मधुमेह असलेल्या खूप जणांना मुंग्या येण्याचा त्रास हा वरचेवर येतो. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आणि रक्तपुरवठा खंडीत झाल्यामुळे  अशा व्यक्तिंना मुंग्या येण्याचा त्रास होतो. 

मुंग्या येण्याची लक्षणे (Symptoms Of Mungya Yene)

Instagram

कधीकधी एका जागी बसून राहिल्यानंतर हातापायांना मुंग्या येतात. खूप जणांना हा त्रास झालेला कळत नाही. पण तुम्हाला काही लक्षणं जाणवतं असतील तर तुम्हाला मुंग्या येण्याची लक्षणे माहीत असायला हवी. तरच तुम्हाला मुंग्या आल्यानंतर काही सोपे उपाय तुम्हाला करता येतील.

ADVERTISEMENT

शरीर सुन्न होणे (Dokyat Mungya Yene)

 कधीकधी एकाच जागी बसल्यानंतर ज्यावेळी आपण अचानक उठतो. त्यावेळी काही काळासाठी सुन्न व्हायला होते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. अचानक सगळे अंग बधीर झाल्या सारखे होते. रक्त पुरवठा खंडीत झाल्यानंतर काही काळासाठी डोक्यातही मुंग्या आल्यासारख्या होतात. जर तुम्हाला काही काळानंतर असे काही जाणवत असेल तर तुम्हाला मुंग्या आल्या असे समजावे.

उठायला त्रास होणे

खूप वेळ बसल्यानंतर पायातील त्राण निघून जातात. पटकन कोणतीही हालचाल करता येत नाही.अशावेळी उठायला आणि पाऊल पुढे टाकायलाही एकदम त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला पावलं टाकताना अशाप्रकारे उठायला त्रास होत असेल तर तुम्हाला अंगाला किंवा पायाला किंवा ठराविक एका शरीराच्या भागाला मुंग्या आल्या असे समजावे.

चालताना तोल जाणे

 पायांना मुंग्या आल्या असतील तर त्या पटकन जात नाही. त्यामुळे साहजिकच तुम्ही उठल्यानंतर तुमचा तोल जाऊ लागतो. जर तुम्हाला असं पटकन उठताना तोल झाल्याचा भास होत असेल आणि पायांना अचानक गुदगुल्या आल्यासारख्या होत असतील तर तुम्हाला पायाला मुंग्या आल्या आहेत असे समजून जावे.

पायांना खाज आल्यासारखी वाटणे (Payala Mungya Yene)

 पायाला मुंग्या आल्या असतील तर अचानक काहीतरी वेगळे झाल्याचे जाणवते. पायांना  बसून बसून मुंग्या आल्या असतील तर काही काळासाठी चालताना आणि पावलं टाकताना पायांच्या तळव्यांना काहीतरी वेगळीच जाणीव होत राहते. त्यामुळे पायांना अचानक खाज येते. ही खाज अशी असह्य असते की, त्यामुळे पायांना खाजवत राहावे असे वाटत राहते. जसजसा त्याचा दाह कमी होऊ लागतो. त्यानंतर पायांना गुदगुल्या आल्यासारख्या होतात.

ADVERTISEMENT

अंगाला झिणझिण्या येत राहणे

खूप जणांना पायांना मुंग्या आल्यानंतर अंगाला सतत  झिणझिण्या आल्यासारख्या होतात. सतत असे वाटत राहते की, अंगाला काहीतरी करंट किंवा काही शाॉक लागत आहे.  असे वाटत राहते. जर तुमच्या अंगाला सतत झिणझिण्या आल्यासारख्या होत असतील तर तुमच्या अंगाला झिणझिण्या येत असतील तर तुम्ही लगेचच यावर काहीतरी उपाय करायला हवे.

मुंग्या येऊ नये यासाठी घरगुती उपाय (Mungya Yene Upay In Marathi)

Mungya Yene Upay

जर तुम्हाला सतत मुंग्या येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही काही सोपे आणि फायदेशीर असे उपाय करायला हवे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच काही प्रमाणात बरे वाटण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊया मुंग्या येऊ नये यासाठी घरगुती उपाय (Mungya Yene Upay In Marathi) 

शारीरिक हालचाल

सतत एका जागी बसून राहणे हे कोणाच्याही आरोग्यासाठी चांगले नाही. हल्ली सगळ्यांचीच कामे एकाच जागी बसून असतात. त्यामुळे उठल्यानंतर मुंग्या येण्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे शारीरिक हालचाल ही कोणासाठीही नेहमीच चांगली आहे. शक्य असेल तेव्हा उठून थोडे चाला म्हणजे तुम्हाला नक्कीच मुंग्या येणार नाही. ज्यावेळी तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही सतत बसून आहात तर पटकन उठा आणि थोडे चाला म्हणजे तुम्हाला बरे वाटेल.

लसूण

लसूण हे देखील तुमचा रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायद्याचे ठरते. जर तुम्हाला लसूण खायला आवडत असेल तर तुम्ही उपाशी पोटी लसणीच्या दोन ते तीन पाकळ्या घेऊन त्या तु्म्ही त्या चघळू शकता. लसूणमध्ये असलेले घटक हे तुमचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत करते.

ADVERTISEMENT

पिंपळाची पाने

पिंपळाची पाने ही देखील  मुंग्या येण्यावर उत्तम असा इलाज आहे. पिंपळाच्या पानामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात जे मुंग्या येण्यावर उत्तम असा इलाज आहे. पिंपळाचे तेल बाजारात मिळत नाही. त्यामुळे पिंपळाचा अर्क काढून तुम्ही तुमच्या आवडीच्या तेलात घेऊन त्यामध्ये हा अर्क घेऊन तो उकळा. हे तेल तुमच्या मुंग्या येणाऱ्या भागावर लावा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा मसाज हा देखील मुंग्या येण्यावर उत्तम असा उपाय आहे. रात्री झोपताना तुम्ही खोबरेल तेलाने हातापायांचा मसाज काही मिनिटांसाठी करा. त्यामुळे तुमच्या पायांचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळेल. त्यामुळे खोबरेल तेलाचा मसाज तुम्ही असा त्रास होत असल्यास करावा. खोबरेल तेलाच्या मसाजमुळे तुमची त्वचाही चांगली राहण्यास मदत मिळेल. 

गरम पाण्याचा शेक

 जर तुम्हाला सतत गरम मुंग्या येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्याचा शेक घेऊ शकता. गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते. रक्तपुरवठा खंडीत झालेला असेल तर तो सुरळीत होण्यास मदत मिळते.  एखादी गरम पाण्याची पिशवी घेऊन तुम्हाला मुंग्या येत असलेल्या ठिकाणी साधारण 5 ते 7 मिनिटं ठेवा. त्यामुळे तुमचा मुंग्या येण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

दालचिनी पावडर

 रक्तपुरवठा खंडीत झाल्यानंतर  हातापायांना आणि डोक्याला मुंग्या येण्याचा त्रास होतो.  दालचिनी पावडर यामध्ये पोटॅशिअम आणि मॅगनीज असते.  ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यात मदत मिळते. दालचिनी पावडरचे सेवन तुम्ही दररोज केले तर तुम्हाला मुंग्या येण्याचा त्रास कमी होतो. एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यामध्ये चमचाभर दालचिनीची पावडर घेऊन त्याचे दररोज सेवन करा. मुंग्या येण्याचा त्रास कमी होतो.

ADVERTISEMENT

तूप

तूपामध्ये अनेक पोषक आणि आरोग्यदायी असे घटक असतात. त्यामुळे तुम्ही मुंग्या येण्याच्या त्रासावर तूप देखील लावू शकता. तूप गरम करुन पाय आणि हातावर तूपाचा मसाज करा. तूपामुळे झोपही शांत लागते. त्यामुळे तूपाचा मसाज दररोज रात्री करावा.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. हाताला मुंग्या का येतात ?

 कधी कधी आपण हातावर ताण देऊन बसतो. हातावर ताण  देऊन बसल्यामुळे खूप वेळा हात सुन्न होतो. हाताला मुंग्या येतात. जर हातावर खूप ताण देऊन तुम्ही बसत असाल तर हाताला मुंग्या येण्याचा त्रास (hatala mungya ka yetat) तुम्हाला होऊ शकतो. 

2. मुंग्या आल्यानंतर नेमकं काय होतं?

मुंग्या आल्यानंतर हात सुन्न होते आणि अंगाला झिणझिण्या आल्यासारख्या वाटू लागतात.  त्यामुळे मुंग्या आल्य असतील तर तुम्हाला असा त्रास जाणवू लागतो.

13 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT