अजूनही गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जाण्याचा धक्का रसिकांना पचवता आलेला नाही आणि बॉलीवूड म्युझिक इंडस्ट्रीला दुसरा धक्का बसला आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी बप्पी लहिरी यांचे निधन झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून बप्पीदा यांची तब्बेत खराब होती. एका वृत्तानुसार बप्पी लहिरी यांना OSA अर्थात ऑब्सस्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया नावाच्या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो असं सांगण्यात येते. गेल्या एक महिन्यापासून बप्पीदा रूग्णालयात होते. सोमवारी तब्बेत ठीक असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मंगळवारी (15 February) त्यांची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यांचे निधन झाले. रात्री 11 वाजता त्यांच्या कुटुंबाने त्यांना रूग्णालयात भरती केले. मात्र 11.45 पर्यंत त्यांचे दुःखद निधन झाले. बॉलीवूडमधील डिस्को किंग म्हणून बप्पीदांची वेगळी ओळख होती. तर 80 च्या दशकात बप्पीदाच्या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
अधिक वाचा – माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री, कोण आहे जेसिका?
गेल्या एक वर्षापासून होते आजारी
क्रिटीकेअर रूग्णालयातील डॉ. दीपक नामजोशी हे बप्पी लहिरींवर उपचार करत होते. बप्पीदा यांना ओएसए आणि छातीचे इन्फेक्शन आजार होता. गेल्या एक वर्षापासून या आजाराशी बप्पीदा झुंजत होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास (Bappi Lahiri Death) घेतला. 2021 मध्ये बप्पी लहरी यांना कोरोनादेखील झाला होता. या दरम्यान त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. तर त्यातून बरे झाल्यानंतर आपल्या नातवाच्या म्युझिक अल्मबच्या प्रमोशनसाठी सलमान खान (Salman Khan) सह बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या सेटवर बप्पीदा यांनी हजेरी लावली होती.
अधिक वाचा – लग्न सासूचं, पुन्हा करवली सुनबाईच’- अग्गबाई सासूबाई आता कन्नडमध्ये
80 – 90 च्या दशकामध्ये जादू
80 – 90 च्या दशकामध्ये आपल्या संगीताच्या जादूने बप्पी लहिरी यांनी सर्वांनाच भुरळ घातली होती. अगदी आजची पिढीही बप्पीदाच्या गाण्यावर तितकीच नाचते. डिस्को डान्सर, शराबी, नमक हलाल सारख्या चित्रपटामधून बप्पीदा हे घराघरात पोहचले. अत्यंत सुपरहिट गाण्यांनी आपला असा एक वेगळाच थाट बप्पीदांनी निर्माण केला होता. 27 नोव्हेंबर, 1952 मध्ये पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडीमध्ये एका बंगाली ब्राम्हण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. मात्र त्यांनी संगीत क्षेत्रात आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवाय कायम सोन्याने मढलेले बप्पीदा हे सर्वांच्याच त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेही लक्षात राहतात. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून पश्चिम बंगालमधील श्रेरामपूर लोकसभेत त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते जिंकले नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बप्पीदांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी बप्पी लहरी यांचा फोटो शेअर करत लिहिले, ‘बप्पी लहरीजी यांचे संगीत सर्वांगीण होते, विविध भावना त्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हायच्या. अनेक पिढ्या त्यांच्या संगीतातील कार्याने जोडल्या गेल्या आहेत. त्यांचा उत्साही स्वभाव कायम सर्वांना लक्षात राहील. त्यांच्या निधनामुळे दुःखी आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती’. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर बप्पीदाच्या जाण्यामुळे झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही अशा स्वरूपात दुःख व्यक्त केले आहे. ‘कभी अलविदा ना कहना’ म्हणणाऱ्या बप्पीदाने अखेर जगाला ‘अलविदा’ केला आहे!
अधिक वाचा – अभिजीत आमकर आणि कयादू यांची जोडी ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून भरणार प्रेमाचे रंग
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक