‘प्रेम पाहावं करुन’ असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण इतरांच्या प्रेमाबद्दल ऐकणे आणि स्वत: प्रेमात पडणं यात खूप फरक आहे. प्रेमात पहिल्यांदा पडल्याचा आनंद वेगळाच असतो. सगळं जग अचानक फार वेगळं वाटू लागतं. इतरवेळी वाटणाऱ्या क्षुल्लक गोष्टी अगदी हव्याहव्याशा वाटू लागतात. वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत रचनाला प्रेम असे कधी कोणावर झालेच नाही. पण ज्यावेळी कोणावर प्रेम झाले आहे असे वाटू लागले त्यावेळी मात्र तिचं सगळं जग बदलू लागलं. पहिल्या प्रेमाे तिला बदलून टाकलं. आज जाणून घेऊया रचनाची ही लव्हस्टोरी… कदाचित तुमच्यासोबतही असे झाले असेल कधीतरी
#Mystory: लग्नाआधीच त्याच्याबद्दल कळलं म्हणून बरं झालं
कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी रचना अगदी लहानपणापासून टॉम बॉय. शाळेत असताना कधी तिला मुलींसारख्या आवडीनिवडी नव्हत्या. घरातल्यांना फार काही वाटायचे नाही कारण ती बाकी सगळ्यात फारच निपुण होती. कॉलेजमध्ये आल्यानंतरही तेच. इतर मुली साडी डे, रोझ डे किंवा अशा काही तत्सम डेसाठी काय लुक करायचा याच्या विचारात असायच्या तर हीचं मात्र काहीतरी भलतंच सुरु असायचं. मुलींसारखे आयब्रोज करणे किंवा लिपस्टिक लावणे असे तिला काही जमतच नव्हते मुळी.
कॉलेज संपल्यानंतर तिच्यात फार काही फरक पडेल असे काही वाटले नव्हते. तरीही तिने घरातल्यांच्या सांगण्यावरुन स्वत:मध्ये अनेक बदल केले. ज्यावेळी तिच्या आजूबाजूला तिच्या मैेत्रिणींचे रिलेशनशीप सुरु असायचे त्यावेळी मात्र ती त्यापासून लांबच असायची. असं नाही की, तिला कोणत्या मुलामध्ये रस नव्हता. पण त्यावेळी तिच्या डोक्यात या गोष्टी नसायच्या. तिने Single असा टॅग लाईन घेऊन अनेक वर्ष काढली. पण आजुबाजूला होणारी लग्नं, घरात होणारा लग्नाचा विषय यामुळे ती थोडी काळजीत पडू लागली. अनोळखी व्यक्तीसोबत संसार कसा करायचा? आपल्याला कधी प्रेम का झालं नाही? माझ्यामध्ये काही कमी आहे का? असा न्यूनगंड तिच्या मनात निर्माण होऊ लागला.
#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती
लग्नासाठी ती तयार होती कारण तिचे कोणावर प्रेमच नव्हते. अनेक विवाहमंडळात तिचे नाव तिच्या पालकांनी नोंदवले होते. मुलं पाहण्याचा कार्यक्रमही सुरु होता. पण अचानक तिच्या आयुष्यात एक मुलगा आला. एकाच क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ते एकमेकांशी बोलू लागले. हे बोलणे प्रोफेशनल लेव्हलपर्यंत न राहता आता ते फारच खासगी होऊ लागले. एकमेकांविषयी माहीत करुन घेणे त्यांना आवडू लागले. रचनासाठी या गोष्टी फारच नव्या होत्या. एरव्ही आल्यावर बॅग भिरकवणारी रचना आता त्यातील फोन काढून स्वत: जवळ ठेवू लागली. त्याचा मेसेज येईल फोन येईल यासाठी ती फोन जवळच ठेवू लागली. या आधी कधीही तिच्यासोबत असे काही झाले नव्हते. प्रेमात पडल्यानंतर सगळं काही बदलून जातं याचा अनुभव तिला पहिल्यांदा आला होता. सुंदर दिसणं, फ्रेश वाटणं किती गरजेचं आहे याची जाणीव तिला होऊ लागली होती. म्हणूनच ती स्वत:कडे अधिक लक्ष देऊ लागली. तिच्यातील हा बदल इतका विलक्षण होता की, तो इतरांच्या लक्षात येणं अगदीच स्वाभाविक होतं. आता प्रेम म्हणजे काय ? आणि या प्रेमाची जादू काय ती कळून चुकली होती.
सध्या तरी त्यांची लव्हस्टोरी नुकतीच बहरु लागली आहे. पण आता यापुढे काय होईल ते आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.