एकमेकांवर जीवापाड प्रेम करुनही कधी कधी नात्यात दुरावा येऊ लागतो. अनेक जण अशा परिस्थितीत आले की नाते संपवायचा निर्णय घेतात. पण नेमकी चूक काय होते ते जाणून घ्यायचा विचार ही करत नाही. पूर्वी आमच्या नात्यात असे होत नव्हते. पण आता तू खूप बदललास. असे म्हणणारे आपल्यात झालेला बदल टिपायला बघत नाही. दुसरा कसा आणि किती चुकला याची घाई त्यांना इतकी झालेली असते की, भांडतानाही ते जरासुद्धा विचार करत नाही. जय आणि मीरा यांची कहाणी अशीच काहिशी आहे. लग्नाच्या काहीच वर्षात त्यांना एकमेकांबद्दल काहीही वाटणे बंद झाले. आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करणे ही त्यांनी सोडून दिले. पण त्यांनी काय चुका केल्या. त्यातून ते कसे बाहेर आले त्यावरुन तुम्हीही काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. जाणून घेऊया त्यांचीच ही गोष्ट
My Story : …आणि पुन्हा जुळून आल्या रेशीमगाठी
कामावरुन येऊन घरची सगळी कामं करणं तिला आवडतं होतं. नवऱ्याला सगळं काही वेळच्या वेळी मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. मीरा तशी बिझनेस वुमन पण तिला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला खूप आवडायचे. पण असे करताना ती त्यामध्ये अधिक गुंतत चालली होती याची जाणीव मीराला होत नव्हती. जयलाही ती घरात रमली. चांगलं काम करते असे म्हणून तोही तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिला. त्यांचं रोजचं रुटीन बदलत होतं. ती ऑफिसमधून येत होती काम करत होती. तोही काम करत होता. तिने बनवलेलं चांगलं खाऊन तो पुन्हा आपल्या कामाला लागत होता. त्यांच्यात भांडणं होत नव्हती. पण त्यांच्यामध्ये संवाद कमी होत चालला होता.
चांगली गृहिणी आणि परफेक्शनिस्ट होताना तिने केवळ घर स्वच्छ ठेवणे आणि सजवणे यामध्ये स्वत:ला इतके झोकून दिले होते. त्यामुळे ती तासनतास किचन आणि घरातील सगळ्या गोष्टीमध्ये ती खूप वेळ घालवू लागली. तिच्या या सवयीमुळे जयने स्वत:ला काही वेगळ्या कामात गुंतवून ठेवले. त्यालाही मीराची सवय आता कमीच झाली होती. मीराला-जयची सवय कमी झाली होती. एकमेकांना फोन करणे,रात्री जेवणानंतर फिरणे किंवा एकमेकांना वेळ देणे याचा विसर त्यांना पडत चालला होता. पण तरीही या दोघांना त्याची जाणीव होत नव्हती.
या सवयी तशाच सुरु होत्या. त्यांना एकमेकांची आठवणही येणे बंद झाले होते. पण जशी मीराला याची जाणीव होऊ लागली तसे तिचे जयशी खटके उडू लागले. जयला मीराची सवय नसल्यामुळे तिला त्याचे बोलणे कटकट वाटू लागले. तिच्यापासून दूर जाण्यासाठी तो प्रयत्न करु लागला. मीरावर त्याचे प्रेम होते. पण तरीसुद्धा त्याला भांडण आणि संवाद नको होता. एकमेकांशी आता काय बोलायचे? असा प्रश्न पडल्यामुळे त्यांच्यामध्ये दिवसागणिक भांडणं होऊ लागली. एकमेकांचे तोंड पाहणे त्यांना नकोसे झाले. घरात आल्यानंतर सतत कटकट करणे आणि वाद घालणे हे होऊ लागले.
पण त्यांची सतत होणारी भांडणं पाहता आता दोघांनाही एकमेकांना समजून घेण्याची वेळ आली. नाते टिकवण्यासाठी आता एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे झाले.
मीरा आणि जय यांनी एकमेकांकडून होणाऱ्या चुकांचा पाढा वाचायला सुरुवात केली आणि त्यांना आपली चूक कळली.
एकमेकांना वेळ देणे नात्यात खूप गरजेचे असते. असे झाले तरच सुसंवाद टिकून राहतो. तुम्हीही तुमचा वेळ चुकीच्या ठिकाणी घालवत असाल आणि जोडीदाराला वेळ देत नसाल तर नक्कीच ते करा.