ADVERTISEMENT
home / Dating
MyStory: त्या अपघातानंतर मला मिळालं माझं प्रेम

MyStory: त्या अपघातानंतर मला मिळालं माझं प्रेम

अपघात हे नेहमी वाईटच असतात असं नाही. काही अपघातानंतर आपल्याला आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती मिळूही शकते. अशीच आहे आजची #mystory, ज्यामध्ये झालेल्या अपघातानंतर तिला मिळालं तिचं खरं प्रेम. नक्की वाचा ही माय स्टोरी काही माहीत तुमच्याही आयुष्यात असा सुखद अपघात घडला तर.

तीन वेळा डिप्रेशन अटॅक आणि पाच ब्रेकअप्सनंतर तुम्हाला प्रत्येक पावलावर साहजिकपणे सल्ला मिळतोच. ज्यामध्ये ‘बापरे’ पासून ते अगदी ‘आई गं’ आणि एवढंच नाहीतर तू कशाला 5 जणांना डेट केलंस हेही ऐकावं लागतंच. हे सगळं मी सहन केलं आहे. प्रत्येक प्रतिक्रियेने माझ्या आयुष्यात मात्र काहीच फरक पडला नाही आणि तुम्हालाही कळलं असेलच माझ्या तीन वेळा डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण. या मागे होती माझी पाच वेळा फसलेली लव्हस्टोरी.

एका ब्रेकअपनंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा डेटींग करू लागता तेव्हा रिबाऊंड थिअरीशिवाय हा प्रश्न पडतो की, प्रत्येक प्रेमकहाणीचा अंत इतका वाईट का झाला. हाच विचार माझ्याही मनात पाच वेळा आला. ब्रेकअपनंतर पुन्हा ब्रेकअप झाल्यामुळे मी भावनिकरित्या कोलमडले आणि जास्त संवेदनशील झाले. प्रेमाचं भावनिक वादळ पाच वेळा सहन केल्यानंतर मी ठरवलं की, माझ्या डेटींग लाईफस्टाईलमध्ये बदल करायचा. एकटंच राहायचं आणि आयुष्य अगदी शांततेत आणि मजेत जगायचं. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण जेव्हा असं काही ठरवतो ना. नेमकं आयुष्यात त्याच्या उलटच होतं.

ADVERTISEMENT

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

तरीही मी माझ्यापरीने प्रयत्न सुरू केला. एकटं राहायला सुरूवात केली आणि माझ्या आजूबाजूला अदृश्य अशी भिंतच निर्माण केली. माझ्या पद्धतीने आयुष्य जगू लागले. वाचून बरं वाटलं ना. मलाही खूप फरक जाणवत होता. पण एखाद्या रात्री एकटेपणा खूप अंगावर यायचा आणि कोणाकडे तरी मन मोकळं करावंस वाटायचं. मग रात्र जागण्यात जायची आणि सकाळी उठल्यावर चिडचिड व्हायची. अशाच मूडमध्ये मी एका दिवशी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि नेमकं माझ्या गाडीने एका रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला धडक दिली. मी घाबरून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. उतरले आणि त्या माणसाला पाहायला गेले. हा काही चित्रपट नव्हता ना. ज्यात लोकं गाडीने माणसांना उडवून निघून जातात. त्या माणसाला मी उठायला मदत केली आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्या पायातून रक्त येतं होतं. पण आश्चर्य म्हणजे एवढं होऊनही त्या माणसाने मला एकदाही काही सुनावलं नाही की, चिडचिड केली नाही. मी त्याच्याकडून त्याचा फोन नंबरही घेतला. त्याला नंतरही काही खर्च आला तर देण्यासाठी. तो दिवस संपला. मला वाटलं झालं हे प्रकरण इथेच संपलं. पण दैवाने काहीतरी वेगळाच विचार केला होता.

#MyStory : त्या वन नाईट स्टँडने मला…

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या माणसाचा मला कॉल आला आणि त्यानेच माझी माफी मागितली. तसंच त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याबद्दलही आभार मानले. पण एवढं झाल्यावरही आम्ही बोलतच होतो आणि बोलताबोलता कधी रात्रीचे बारा वाजले कळलंच नाही. त्याचवेळी मला थोडी भीतीही वाटली की, पुन्हा मला कोणाबद्दल तरी ओढ जाणवतेय आणि तेही एका अनोळखी व्यक्तीबाबत. मी लगेच तो कॉल थांबवला. तो व्यक्ती खरंच दिसायला खूप छान होता. पण माझ्या केसमध्ये याने काहीच फरक पडणार नव्हता. तरीही म्हणतात भावना तुम्ही जितकं जास्त रोखाल तेवढा त्या बेफाम होतात. मला पुन्हा त्याच्याशी बोलावंस वाटू लागलं. आमचं हे बोलणं नंतर डेट प्लॅनमध्ये रूपांतरित झालं.

#MyStory: अखेर मी त्याला होकार दिला

ADVERTISEMENT

या व्यक्तीमध्ये इतकं काय खास होतं की, मी त्याच्याकडे चुंबकाप्रमाणे खेचले जात होते. पण हेही खरं होतं की, त्याने मला माझ्या सर्व भूतकाळासोबत आणि वाईट गोष्टींसोबत स्वीकारलं होतं. त्याने मलाही जाणीव करून दिली की, माझ्या डिप्रेशनने मला अजूनच सुंदर बनवलं आहे. त्याच्यासोबत काही काळ वेळ घालवल्यानंतर मलाही तो कळू लागला. आता अशा व्यक्तीपासून दूर राहणं कसं शक्य होतं. मग काय मी पुन्हा प्रेमात पडले. मी माझ्या भावना त्याच्याकडे कबूल केल्या आणि माझ्या आयुष्यातील चांगल्या आणि प्रेमळ पर्वाला सुरूवात झाली.

20 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT