#MyStory : त्या वन नाईट स्टँडने मला...

#MyStory : त्या वन नाईट स्टँडने मला...

जी कथा आज आम्ही #MyStory मध्ये सांगत आहोत. त्याला तुम्ही वन नाईट स्टँड असंच म्हणाल. आपल्याकडे दोन व्यक्ती शारिरीकरित्या तेव्हाच जवळ येतात जेव्हा ते प्रेमात असतात किंवा त्यांचं लग्न झालेलं असतं. पण या कथेत तसं काहीच नव्हतं. ना ते दोघं प्रेमात होते ना एकमेंकासोबत होते. या मायस्टोरीतील ‘ती’ ना असं नेहमी करणारी होती ना तिच्यासाठी हे नॉर्मल होतं. तिला फक्त स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडून असा अनुभव घ्यायचा होता. जो तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होता. कदाचित त्यालाच वन नाईट स्टँड असं म्हटलं जातं. 

ती संध्याकाळ...

Shutterstock

ती नव्या वर्षातील पहिली संध्याकाळ होती. मी माझ्या कझिनसोबत त्याच्या मित्राच्या घरी पार्टीसाठी गेले होते. ती पार्टी एका फार्महाऊसमध्ये होती. जे मी पहिल्यांदाच पाहत होते. तो एका कोपऱ्यातील बार टेबलजवळ उभा राहून व्हिस्की पीत होता. त्याने मला पाहिलं आणि आमच्या दोघांची नजरानजर झाली. त्याने मला पाहताच ग्लास उचलला आणि त्याने मला पाहून स्मित हास्य केलं. कदाचित त्याला तोच वन नाईट स्टँडचा इशारा तर वाटला नव्हता ना? तो मला टक लावून पाहत होता आणि माझ्या दिशेनेच येऊ लागला. त्याने एकदाही माझ्यावरून नजर हटू दिली नाही आणि मीही. जसं काही आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. अशा गोष्टी ज्या आम्ही एकमेकांशी अजून बोललोही नव्हतो. मी तुमच्यासाठी काही ड्र्रिंक आणू का, माझ्याजवळ येताच तो म्हणाला. त्याच्या आवाजात वेगळीच जादू होती. माझं एक ड्रिंक घेऊन झालं आहे, मी म्हटलं. आमची वन नाईट स्टँड स्टोरी सुरू होण्याआधीच संपली होती का, माझ्या मनात एक विचार येऊन गेला.

फुलपाखरू किस बद्दल देखील वाचा

तो क्षण...

पार्टी सुरूच होती, आम्ही एकत्र डान्स केला. मी आणि त्याने नाहीतर माझ्या कजिन्स आणि मित्रांनी एकत्र येऊन. डान्स करताना माझी नजर जितक्या वेळा त्या टेबलाकडे जायची. तेव्हा तो तिथेच असायचा. त्यालाही कळलं होतं की, मी त्याच्याकडे बघतेय ते. अखेर रात्रीचे 12 वाजले. मी वरच्या खोलीकडे जाऊ लागले. जिथे माझी बॅग होती. मला आईबाबांना फोन करून नव्या वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. माझ्या पाठीमागे तोही वर येऊ लागला. मी खोटं बोलणार नाही..पण मीही त्याची काही वेळ खोलीत वाट पाहिली. हे बघण्यासाठी की, तो खोलीत येतोय का? पण तो नाही आला. माझी बैचेनी अजूनच वाढली. जर त्याला खोलीत यायचं नव्हतं तर तो जिन्यावरून माझ्या पाठीमागे का आला. मी पाहिलं तो तिथल्याच गॅलरीत उभा होता. त्याच्या हातात सिगरेट होती. त्याने मला पाहिलं आणि तो माझ्या कडेच येऊ लागला...आणि त्याने मला भिंतीजवळ नेल. आम्ही दोघांनी एकमेकांना किस केलं. आम्हा दोघांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. बेडरूम तिथून जवळच होती. कदाचित म्हणूनच आमची पावलं तिकडे वळायला वेळ लागला नाही. माझ्यासोबत हे काय होत होतं ते मला कळतंच नव्हतं. आम्हा दोघांमध्ये वन नाईट स्टँड होणार होता.

Shutterstock

मी प्यायले होते पण शुद्धीत होते. त्या क्षणांनंतर तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. घडलेल्या क्षणांचे पुरावे मिटवण्यासाठी. मी बेडवरून उठले. पण याबाबत अनभिज्ञ होते की, पुढे काय होणार आहे. तो आला आणि मला काहीही न बोलता त्याने मला कपडे घालण्यासाठी मदत केली. माहीत नाही का...पण त्याचं हे वागणं हे मला आवडत होतं. कदाचित याआधी अनेक वेळा मी वाचलं होतं की, सेक्स करण्याआधी एकमेंकाचे कपडे काढायला पार्टनर्स मदत करतात. पण सेक्सनंतर फक्त आपले आपण कपडे घालतो. जे झालं त्यानंतर त्याच्या या स्वीट जेश्चरबद्दल माझ्या मनात अनेक विचार येत होते. याचा नक्की अर्थ काय असेल. त्याला मी आवडले होते का? जे काही घडलं होतं ते फक्त एक अपघात होता की, त्यापेक्षा काही जास्त? जे झालं ते योग्य झालं का? त्याने ही माझ्यासारखंच एन्जॉय केलं का? मी माझा वन नाईट स्टँड एन्जॉय केला का?त्याचं नाव काय आहे? आम्ही दोघंही काहीच बोललो नाही आणि तो खाली निघून गेला. मी पुन्हा पार्टीमध्ये सामील झाले. कोणीही नोटीसही केलं नाही की, मी पार्टीतून काही वेळासाठी गायब होते. सगळेच मस्तीत गुंग झाले होते. काहींनी जेवायला सुरूवात केली होती. मी पुन्हा माझ्या कझिनजवळ गेले आणि आम्ही शाळेच्या जुन्या दिवसांबद्दल बोलू लागलो. अचानक तोही परत आला आणि आमच्या ग्रुपमध्ये बसून बोलू लागला. ओह...हा समीर आहे. हे त्याचचं घर आहे. माझ्या कझिनने सांगितलं. मला हे ऐकून बरं वाटलं की, त्याचं नाव समीर आहे आणि ही रेशू आहे त्याची फियान्से आणि माझी चांगली मैत्रीण. असं सांगत माझ्या कझिनने त्या मुलीकडे बोट दाखवलं. जिच्याशी आम्ही बोलत होतो. काही सेकंदांसाठी माझा श्वास बंद झाल्यासारखं मला वाटलं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही माझ्याकडे पाहिलं आणि त्याने ग्लास उचलला व म्हटलं, ‘एका नव्या सुरूवातीसाठी’.   

Shutterstock

ज्यानेही या इंटिमेट रिलेशनला वन नाईट स्टँडचं नाव दिलं आहे ते योग्य आहे. कारण यामध्ये कोणतीच भावना अटॅच्ड नसते. आपल्या होणाऱ्या फियान्सेला धोका देणाऱ्या त्या व्यक्तीचे डोळे अजूनही माझ्यावर खिळलेले होते. आम्ही सगळ्यांनी त्यानंतर खूप डान्स केला आणि एन्जॉय केलं. कोणीही नोटीस केलं नाही की,मी एवढी गप्प का आहे. काही वेळानंतर माझ्या कझिनने म्हटलं की, तिला घरी जाण्याची इच्छा आहे. मी तिच्यासोबत बाहेर पडले. घरी आल्यानंतर मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. माझी इच्छा होती की, मी जोरात रडावं पण माझ्या डोळ्यात पाणीच नव्हतं. मी एकटक छताकडे पाहते आणि पंख्यावर पडणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाच्या सावलीवर माझी नजर होती. माझं मन एकदम सुन्न झालं होतं. मी प्यायले होते तरीही पूर्णतः शुद्धीत होते. मला खूप थकल्यासारखं वाटत होतं. कदाचित हा थकवा सेक्सनंतर येणारा थकवा असावा. वन नाईट स्टँडचा थकवा. त्याने मला कधीच फोन केला नाही. आम्ही कधीही परत भेटलो नाही. रेशूशी त्याचं लग्न झालं. ही होती माझ्या वन नाईट स्टँडची स्टोरी जिने मला खूप खोलवर ठेच लागली होती. 

तुम्हाला कशी वाटली आजची माय स्टोरी आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडेही अशी एखादी माय स्टोरी असेल तर आम्हाला लिहून पाठवा.