चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करे. जेव्हा आपण धान्याचे नाव घेतो, तेव्हा नाचणी (ragi in marathi) आणि नाचणीचे सत्व (nachni satva benefits in marathi) आपण नक्कीच महत्त्वाचे मानतो. नाचणीचे फायदे अनेक आहेत. नाचणीचे (nachni in marathi) शरीरासाठी विविध फायदे होतात. हेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे जाणणे महत्त्वाचे आहे. रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे (Nutritional Value) आपल्याला आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून शरीराला मिळतात. जाणून घेऊया आरोग्यासाठी नाचणीचे फायदे (nachni benefits in marathi).
Table of Contents
- हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे (Ragi Benefits In Marathi For Bones)
- वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त (Weight Loss)
- जास्त प्रमाणात मिळते फायबर (High Fibre)
- मधुमेहावर गुणकारी (Diabetes)
- अनिमियावर उपयुक्त (Anemia)
- मेंदूसाठी ठरते फायदेशीर (For Brain)
- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी (For Blood Pressure)
- नाचणी सत्वचे फायदे (Nachni Satva Benefits In Marathi)
- ग्लूटन फ्री (Gluten Free)
- त्वचेसाठी ठरते फायदेशीर (For Skin)
- स्तनपानासाठी अधिक उपयुक्त (Nursing Mothers)
- नाचणीचा वापर अथवा साठा कसा करावा? (How To Consume Or Use Ragi/Nachni?)
- प्रश्नोत्तरे (FAQ’s)
हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे (Ragi Benefits In Marathi For Bones)
रागीचा अर्थात नाचणीचा (ragi in marathi) हाडांसाठी खूपच चांगला उपयोग होतो. वास्तविक रागीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूती देते. एका शोधानुसार, नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेत 30 पट जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून सहजपणाने मिळते. तसंच हाडांचा विकास करण्यासाठी कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व समजण्यात येते. त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी नाचणीचा फायदा होतो. यातील कॅल्शियममुळेच लहान मुलांना आणि अगदी गरोदर असणाऱ्या महिलांनाही नाचणीचे सत्व (nachni satva benefits in marathi) देण्यात येते. कॅल्शियमची कमतरता असल्यास, कॅल्शियमयुक्त डाएटमध्ये नाचणीचा समावेश करून घेणे हा उत्तम पर्याय आहे.
वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त (Weight Loss)
अनेक जण वजन कमी करण्यासाठीही (ragi benefits for weight loss) याचा उपयोग करतात. एका शोधानुसार, वजन नियंत्रणात राखण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. यामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरीत भूक लागत नाही आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो. तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास असेल तर वजन कमी करण्यासाठी जेवणामध्ये नाचणीचा समावेश करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात मिळते फायबर (High Fibre)
तांदळाच्या तुलनेत नाचणीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. तुमच्या शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि अन्न पचविण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. तसंच नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन भूक लागत नाही. शरीरातील चरबीपासूनही त्यामुळे सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते. त्यामुळे जेवणात किमान एक वेळ तर नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा. जेणेकरून तुम्ही तुमचे आरोग्य अधिक चांगले ठेऊ शकता.
मधुमेहावर गुणकारी (Diabetes)
बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल अगदी लहान वयातदेखील टाईप – 2 मधुमेह अनेकांना झालेला दिसून येतो. मधुमेहाची समस्या असेल तर त्यावर नाचणी हा उत्तम उपाय आहे. यामधील अँटीडायबिटीक गुणामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते आणि वाढलेले वजनही नियंत्रित होते. तसंच नाचणी हा एक लो ग्लायसेमिक खाद्यपदार्थ आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी रागी अर्थात नाचणी (ragi in marathi) एक वरदानच ठरते. ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे त्यांनी आपल्या जेवणात पोळीऐवजी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा आणि काही दिवसातच त्यांना मधुमेहावरील त्याचा परिणाम दिसून येईल.
अनिमियावर उपयुक्त (Anemia)
नाचणीमध्ये (ragi in marathi) लोहाचा चांगला स्रोत आहे. अनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रूग्णांना आपल्या आहाराच नाचणीचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते. हे एखाद्या घरगुती उपचाराप्रमाणेच आहे. नाचणी खाल्ल्याने शरीरात विटामिन सी ची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते. तुम्हाला हवं तर तुम्ही नाश्त्यामध्ये रागी उपमा, रागी डोसा याचाही समावेश करून घेऊ शकता. तुम्हाला सतत भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर अनिमियावर उपाय म्हणून तुम्ही रागीच्या इतर पदार्थांचा उपयोग करून घेऊ शकता.
मेंदूसाठी ठरते फायदेशीर (For Brain)
नाचणीचे सत्व (nachni satva benefits in marathi) अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते. नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. तसंच मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते. ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून तुम्हाला व्यवस्थित झोप लागण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमची स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचे कामही नाचणीचे सत्व करते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी (For Blood Pressure)
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही नाचणीचा (ragi in marathi) आपल्या आहारात समावेश करून घेऊ शकता. नाचणीचे तुम्ही नियमित सेवन करत असाल तर तुम्ही या त्रासापासून दूर राहता आणि स्ट्रोकचा धोकाही टळतो. त्यामुळे आपल्या आहारात किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा.
नाचणी सत्वचे फायदे (Nachni Satva Benefits In Marathi)
लहान मुलांना नेहमीच नाचणीचे सत्व (nachni satva benefits in marathi) देण्यात येते हे आपण पाहतो. पण त्यामागील कारण म्हणजे मुलांची पचनशक्ती फारच नाजूक असते. पचनाला अधिक चांगले बनविण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. जेणेकरून मुलांना गॅसची समस्या होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये यासाठी नाचणीचे सत्व देण्यात येते. इतकेच नाही तर मुलांच्या हाडांचा चांगला विकास व्हावा यासाठीही नाचणीचे सत्व देण्यात येते. नाचणीत असणारे कॅल्शियम लहान मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आईचे दूध सोडवून खाण्याची सवय लावण्यासाठी नाचणीच्या सत्वाचा चांगला उपयोग होतो.
ग्लूटन फ्री (Gluten Free)
सिलिएक रोग असणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट खाण्याचे पदार्थच लागतात. नाचणी हे ग्लूटन फ्री धान्य आहे. त्यामुळे तुम्हाला याचा उपयोग आरोग्यासाठी करून घेता येतो. यामुळे शरीराला कोणतीही बाधा होत नाही. लसमुक्त असे हे धान्य असल्यामुळे अनेक जण रागीचा अर्थात नाचणीचा आपल्या आहारात समावेश करून घेतात.
त्वचेसाठी ठरते फायदेशीर (For Skin)
नाचणीचे फायदे (Nachni Benefits In Marathi) केवळ आरोग्यासाठीच नाहीत तर त्वचेसाठीही होतात. वास्तविक रागीमध्ये असणारे फेरूलिक असिड हे युन्ही किरणांपासून होणाऱ्या त्वचेच्या त्रासापासून मुक्तता देते. तसंच यामध्ये असणारे अँटिएजिंग गुण तुमची त्वचा अधिक चमकदार बनविण्यास फायदेशीर ठरतात. एजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच रागीचा उपयोग फेसमास्क बनविण्यासाठीही करण्यात येतो. यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते.
स्तनपानासाठी अधिक उपयुक्त (Nursing Mothers)
ज्या माता स्तनपान करत आहेत त्यांच्यासाठी नाचणी (ragi in marathi) आणि नाचणीचे सत्व (nachni satva benefits in marathi) अत्यंत उपयुक्त ठरते. हिरवी नाचणी खाल्ल्याने स्तनपान देणाऱ्या मातेच्या दुधामध्ये वाढ होते आणि बाळाला या दुधातून अधिक पोषण मिळते. या दुधातून आवश्यक अमिनो असिड, लोह आणि कॅल्शियम हे बाळाच्या पोटात जाते. नाचणी हे स्तनपान देणारी माता आणि बाळ या दोन्हीसाठी आवश्यक आहे.
नाचणीचा वापर अथवा साठा कसा करावा? (How To Consume Or Use Ragi/Nachni?)
नाचणीचे फायदे (Nachni Benefits In Marathi) जाणून घेतल्यानंतर आता याचा उपयोग कसा करायचा आणि साठा कसा करायचा हे जाणून घेणेही गरजेचे आहे. नाचणीचा साठा करणे सोपे आहे. तुम्ही नाचणीतील खडे काढून एका एअरटाईट डब्यात हे ठेऊ शकता अथवा कोणत्याही स्टीलच्या डब्यात तुम्ही काही महिन्यांसाठी नाचणी ठेऊ शकता. याप्रकारे करावा रागी अर्थात नाचणीचा उपयोगः
- नाश्त्यासाठी रागी डोसा, रागी इडली अथवा रागीचा उपमा बनवणे
- नाचणीची भाकरी बनवून खाऊ शकता
- पराठ्यासाठीही तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून घेऊ शकता
- रागीची चकलीदेखील तुम्ही तयार करू शकता
- फेस मास्क बनवून तुम्ही रागीचा उपयोग करून घेऊ शकता
विशेष सूचना – वयानुसार याचे खाण्याचे प्रमाण बदलते. त्यामुळे किती प्रमाणात खायचे याचा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकता.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. नाचणीचे काही दुष्परिणाम आहेत का?
नाचणीचे फायदे अनेक आहेत यात काहीच शंका नाही. मात्र नाचणी खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते. यामध्ये कॅल्शियम जास्त असल्याने अधिक सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते. तसंच फायबर अधिक असल्याने, गॅस, पोट फुगणे आणि पोटात सूज येणेसारखा त्रासही होऊ शकतो. नाचणीची अलर्जी असेल तर अलर्जीची समस्याही होऊ शकते.
2. नाचणी खाल्ल्याने झोप येते का?
नाचणी ही अनिद्राच्या समस्येवर चांगला उपाय ठरते. त्यामुळे शरीराला आराम मिळून चांगली झोप मिळते. तुम्हाला अनिद्रेची समस्या असेल तर नाचणीचा समावेश आहारात करून घ्या.
3. रागीचे रोज सेवन करणे चांगले आहे का?
रागीचे सेवन रोज करण्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीन वेळा करणे अधिक चांगले. गव्हाच्या तुलनेत यामध्ये अधिक फायबर असते आणि कॅल्शियमदेखील. त्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक तत्व आठवड्यातून दोन ते तीन वेळा रागी खाऊन मिळू शकते.