ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘रॉम कॉम’

हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘रॉम कॉम’

गेले काही दिवस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजतंय. कधी राजकीय वर्तुळात तर कधी नेटकऱ्यांच्या पोस्टमध्ये.. महिनाभर चांगलंच गाजलेलं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येतंय.. पण, ते मराठी चित्रपटसृष्टीतून.. कारण हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायचं निश्चित केलं आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 

(वाचा : बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील ‘सर्वात सेक्सी आशियाई पुरूष’)

27 डिसेंबर प्रदर्शित होणार सिनेमा

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्मस् यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. संदीप बाळकृष्ण बांगर, सुनील दिगंबर वाळुंज फिल्म प्रस्तुत करणार आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवांजन फिल्म्स हे डिस्ट्रिब्युटर्स आहेत.

(वाचा : शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग)

ADVERTISEMENT

चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा, हरी कोकरे, शाम भालेराव आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. राॅमकाॅम येत्या 27 डिसेंबरला पुन्हां एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे.

(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)

Tattad : लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय ‘तत्ताड’ सिनेमा

रॉमकॉम व्यतिरिक्त आणखी नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेब विश्वात सक्रीय असलेल्या प्राइम फ्लिक्सने आता चित्रपट प्रस्तुतीमध्ये पदार्पण केलं आहे. ‘तत्ताड’ या चित्रपटाची प्राइम फ्लिक्सद्वारे निर्मिती करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2020ला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाद्वारे एका वादकाची कथा पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. पेंडिंग लव्ह, भाडखाऊ, ठरकीस्तान, घोस्ट लीला अशा वेब सीरिजची निर्मिती प्राइम प्लिक्सनं केली आहे. या वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही लाभला आहे. त्यामुळे आता एक पाऊल पुढे जात प्राइम फ्लिक्स चित्रपट निर्मिती क्षेत्रात दाखल होत आहे. मराठी चित्रपट हा सध्याचा ‘बझ वर्ड’ आहे. अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत, अनेक चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत आहेत. अशा उत्तमोत्तम चित्रपटांना प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचं काम प्राइम फ्लिक्सद्वारे केलं जाणार आहे. अतिशय आगळंवेगळं नाव असलेला ‘तत्ताड’ हा प्राइम फ्लिक्स प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट ठरणार आहे. 21 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
05 Dec 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT