माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Suvichar Marathi Madhe) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. असेच 100+ सुविचार मराठीतून (100+ Suvichar in Marathi) आम्ही या लेखात देत आहोत. एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही. असेच काही महत्त्वाचे मराठी सुविचार (Suvichar In Marathi) तुमच्यासाठी. आजकाल मराठी सुविचार स्टेटस (Marathi Suvichar Status) आणि व्हॉट्सअपसाठीही काही सुविचार (Whatsapp Suvichar Marathi) लागतात. असेच काही नवे सुविचार (New Suvichar In Marathi) तुम्ही वापरू शकता.
Table of Contents
मराठी सुविचार देतात बळ | Suvichar In Marathi
मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. असेच काही मराठी सुविचार खास तुमच्यासाठी.
1. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो
2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात
3. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका
4. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे !
5. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत कायम मनगटात ठेवा
6. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुम्हीही संकटांचा सामना करताना शांत राहा
7. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो
8. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं
9. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात
10. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायलाॉ काय हरकत आहे
11. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कोणत्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो
12. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
13. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही
14. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे
15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
सुंदर सुविचार मराठी | Beautiful Marathi Suvichar
सुंदर सुविचार मराठी (Suvichar In Marathi) हा तुमच्या आयुष्याचा पाया असतो. यामुळेच तुम्ही माणूस म्हणून घडत असता. खास करून हे विद्यार्थी मित्रांसाठी सुविचार लागू होऊ शकतात. तुम्हाला लहानपणापासून मनावर जे संस्कार देण्यात येतात त्याचप्रमाणे तुम्ही घडत असता. इतकंच नाही तर तुमच्यावर येणारी परिस्थिती काय आहे यानुसार तुम्ही वागता. तुमच्या मनात सुविचार पक्के रूतलेले असतील तर तुम्ही कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही याची तुमच्या आई-वडिलांनाही खात्री असते. शिकवण आचरणात आणावी यासाठीच काही सुविचार असातात. असेच काही सुंदर सुविचार मराठी अर्थात मराठी सुविचार तुमच्यासाठी.
1. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात
2. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका
3. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा
4. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण
5. जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा
6. ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं
7. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो
8. स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात
9. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा
10. आपण पाहत असलेली आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात
11. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात
12. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही
13. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
14. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा कारण ते जास्त महत्त्वाचं आहे
15. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरासाठी
मराठी सुविचार छोटे | Small Suvichar In Marathi
मराठी सुविचार छोटे जे तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये अथवा व्हॉट्सअपला आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. कधी कधी आपण उदास होतो आणि अशा वेळी प्रेरणेची आणि उत्साह देण्याची गरज असते. अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणींना असे मराठी सुविचार छोटे (Suvichar In Marathi) पाठवून त्यांचा उत्साह वाढवा आणि त्यांना बळ द्या.
1. कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.
2. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
3. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
4. गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं.
5. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
6. काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.
7. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
8. माणसाचं छोटे दु:ख हे जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला खरोखरीच सुखाची चव येते.
9. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
10. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
11. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
12. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे.
13. कलेची पारंबी माणसाला बळ देते.
14. काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात.
15. जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते.
आयुष्यावरील मराठी सुविचार | Life Marathi Suvichar
कोणाचेच आयुष्य हे सरळसोट नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हा असतोच. अशावेळी काही प्रेरणात्मक कोट्सची अथवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी विचारांची गरज असते. अशावेळी मराठी सुविचार नक्कीच तुमची मदत करतात.
1. जितका मोठा संघर्ष असेल तितकेच तुमचं यश शानदार असेल.
2. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
3. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.
4. प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवते आणि प्रत्येक शिकलेला धडा हा माणसाला बदलतो.
5. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे हाच आहे हे कायम लक्षात ठेवा.
6. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
7. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
8. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
9. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
10. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल हे खरं आहे.
11. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.
12. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे हेच समजा.
13. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही.
14. आयुष्यात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका.
15. स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
मराठी सुविचार स्टेटस | Marathi Suvichar Status
आजकाल आपण आपले विचार व्हॉट्सअप स्टेटसवरदेखील मांडत असतो. कोणत्याही नात्यामध्ये कधी कधी सरळ बोलता येत नाही तेव्हा स्टेटस ठेवला जातो. विश्वासाच्या नात्यावरील काही सुविचार स्टेटसमध्ये ठेवले जातात. तसंच अनेक परिस्थितीशी संबंधित मराठी सुविचार स्टेटस आपण ठेवतो. असेच काही मराठी सुविचार स्टेटस तुमच्यासाठी.
1. विश्वासच नसेल तर कोणतंही नातं टिकत नाही.
2. तुम्ही जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
3. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
4. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
5. परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
6. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
7. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
8. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
9. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते हे नेहमी लक्षात ठेवा आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही हेदेखील सत्य आहे.
10. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
11. तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
12. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण असते, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
13. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
14. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
15. यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
सुविचाराने तुम्हीही तुमचं आयुष्य समृद्ध करा. रोज सकाळी काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही अशाच सुविचाराचा विचार करून आपला दिवस अधिक चांगला करा. तुम्हाला आमचा हा मराठी सुविचार दर्शविणारा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.