ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
नव्या वर्षात नवा लुक हवा असेल तर बजेटमध्ये करा हे बदल

नव्या वर्षात नवा लुक हवा असेल तर बजेटमध्ये करा हे बदल

नव्या वर्षासाठीचे नवे संकल्प तुम्ही आतापर्यंत नक्कीच केले असतील. या संकल्पांमध्ये जीमला जाणे, लवकर उठणे, फोनचा कमीत कमी वापर करणे, बचत करणे आणि बरेच काही तुमच्या या नव्या संकल्पाच्या यादीत असेल. या नव्या वर्षात तुम्ही तुमचा लुक बदलण्याचा विचार केला आहे का? जर तुम्हाला या नव्या वर्षात तुमचा लुक बदलायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही बजेट आयडियाज आणल्या आहेतय या आयडियाज तुम्हाला 2020 मध्ये बनवू शकतात #savage

हेअरस्टाईल (Hair style)

shutterstock

तुमच्या पर्सनॅलिटीला अगदी एका झटक्यात बदलण्याची ताकद असते ती एका हेअरकटमध्ये. तुम्ही तुमच्या त्याच त्याच केसांना वैतागला असाल तर हीच ती वेळ आहे की तुम्ही तुमच्या केसांमध्ये बदल आणू शकता. तुमचं बजेट अगदी 500 रुपयांचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये छान हेअरकट करता येईल. पण जर तुमचे बजेट खूप जास्त असेल तर तुम्ही केसांना एक नवा लुक देऊ शकता तुमचे केस सरळ असतील तर तुम्हाला छान बीच वेव किंवा केस कुरळे करता येतील. जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्हाला सरळ करता येईल. असे केल्यामुळे तुमच्यामध्ये एकदम लगेचच बदल झालेला तुम्हाला जाणवेल. 

ADVERTISEMENT

फॅशनस्टेटमेंट (Fashion statement)

shutterstock

जर तुम्ही तुमचे तेच तेच कपडे घालून आणि फोटो काढून कंटाळला असाल तर तुम्हाला तुमची स्टाईल बदलण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही जर पंजाबी ड्रेस सतत घालणारे असाल तर थोड्या हटक्या पद्धतीचे कुडते, पलाझो घालून बघा. जर तुम्ही जीन्स घालून कंटाळला असाल तर पलाझो आणि टिशर्ट, मॅक्सी ड्रेस असे काही पर्याय ट्राय करुन पाहा. म्हणजे तुमच्या लुकमध्ये तुम्हाला बदल झालेला जाणवेल

Woolen care tips: लोकरीचे कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

ADVERTISEMENT

फेशिअल मेंटेनंन्स (Facial maintenance)

shutterstock

जर तुम्ही गेल्या वर्षात तूमच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर तुम्ही नव्या वर्षात तुमचा  चेहरा चांगला दिसायचा असेल तर तुम्ही स्वत:ला थोडं मेंटेन करा. तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या स्किन ट्रिटमेंट घेतल्या तर तुम्हाला एक फ्रेश लुक मिळेल. आता फेशिअल मेंटेंनन्स म्हटल्यावर तुम्ही जर महिन्यातून एकदा फेशिअल  किंवा डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन या स्किनट्रिटमेंट घ्या. म्हणजे तुम्ही केलेले सगळे बदल तुमच्या फ्रेश लुकमुळे उठून दिसतील.

बॅगची बदला स्टाईल ( Bag for change)

ADVERTISEMENT

shutterstock

काही जणांना आपल्या पाठीवर सगळा संसार घेऊन फिरायची सवयच लागलेली असते. मोठमोठ्या बॅगा घेऊन ते प्रवास करतात. पण यंदा तरी तुम्ही स्टायलिश बॅग घेऊन फिरायचा विचार करा. तुमच्याकडे असलेली एक चांगली बॅग तुमची पर्सनॅलिटी चांगली करु शकते. त्यामुळे यंदा पाठीवरची बॅग ही घेणार असाल तरीसुद्धा ती जरा चांगली असू द्या. तुमचा बॅकपॅकमधील तो टिपिकल लुक तुम्हालाही नक्कीच कंटाळवाणा झाला असेल  (बॅकपॅक म्हणजे भरपूर सामान ठेवण्याची सोय असल्यामुळे खूप जण अंगापेक्षा भोंगा असलेल्या या बॅगा घेतात. पण त्या तुमचा लुक बोअर करतात) 

परफ्युम किंवा सेंट (Perfume or scent)

shutterstock

ADVERTISEMENT

तुम्हाला परफ्युम आणि सेंट लावायला आवडत असेल तर तुम्ही तुमचा रोजचा परफ्युम किंवा सेंट बदला म्हणजे तुम्हाला तुमच्यातच बदल झालेला जाणवेल. आता तुम्हाला माहीतच असेल की, तुमच्या परफ्युमची निवड तुमची पर्सनॅलिटी वेगळी दर्शवते. आता तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी हॅपनिंग दाखवायची अेसल तर तुम्ही तसे फ्रेश आणि फ्रुटी फ्रॅग्न्ंस निवडा. 

आता हे काही बदल तुम्हाला अगदी सहज करता येतील. त्यामुळे नव्या वर्षात तुम्हाला तुम्हीच नवे हवे असाल तर तुम्ही हे बदल नक्की करुन पाहा. 

हिवाळ्यात करू शकत नसाल व्यायाम, तर वजन कमी करा आल्याच्या पाण्याने

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

ADVERTISEMENT
27 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT